scorecardresearch

“शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

त्याने शेअर केलेल्या या अनुभवामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

“शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कलाकारांना कास्टिंग काऊचची समस्या सतावत आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर, अनेक अभिनेत्यांनाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. काहींनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं तर काहींनी या गोष्टी जगासमोर आणल्याच नाहीत. पण आता नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

‘मॅडम सर’ फेम अभिनेता इमरान नाझीर खान याने नुकत्याच त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी एका मुलाखतीत शेअर केल्या. यावेळी करिअरच्या सुरुवातीच्या काळात चांगले रोल देण्याच्या बदल्यात एका दिग्दर्शकाने त्याच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा त्याने आता केला आहे.

आणखी वाचा : नेहा मलिकने टॉवेलवर केलं फोटोशूट, अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज व्हायरल

‘कोईमोई’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं, “करिअरच्या सुरुवातीला जेव्हा मी ऑडिशन द्यायला जायचो तेव्हा मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. हे करणारे समन्वयक आणि कास्टिंग डायरेक्टर होते. त्यांनी मला सांगितलं होतं की मला चांगले रोल तेव्हाच मिळतील जेव्हा मी त्यांच्याबरोबर शरीरसंबंध ठेवेन. मी त्यांना स्पष्टपणे तेव्हा नकार दिला. मला असं वाटतं स्त्री असो वा पुरुष या क्षेत्रात नवीन येणाऱ्या प्रत्येकालाच अशा प्रसंगाला सामोरे जावं लागतं.”

हेही वाचा : Photos: विद्या बालन ते कंगना रानौत, बॉलिवूडच्या ‘या’ यशस्वी अभिनेत्रींनाही करावा लागला आहे कास्टिंग काऊचचा सामना

पुढे तो म्हणाला, “अशा अनुभवांमुळे अनेक चांगल्या भूमिका माझ्या हातून निसटल्या. अनेक कास्टिंग डायरेक्टर्स आहेत ज्यांची प्रसिद्ध निर्मात्यांशी चांगली ओळख आहे, ते नवीन येणाऱ्या कलाकारांचा फायदा घेतात. आतापर्यंत आयुष्मान खुराना, रणवीर सिंग यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव खुलेपणाने सांगितला आहे. मला असं वाटतं की काही ऑडिशन्स अशाही असल्या पाहिजे ज्या फक्त टॅलेंटला प्राधान्य देतील.” आता त्याने शेअर केलेल्या या अनुभवामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 11:55 IST

संबंधित बातम्या