सगळीकडे सध्या शाहरुख खानच्या ‘जवान’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला असून रविवारी दमदार कमाई केली आहे. अपेक्षेप्रमाणेच वीकेंडच्या दोन्ही दिवसात चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले. चित्रपटाच्या रविवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘गदर २’ च्या यशानंतर सनी देओल चित्रपटांसाठी घेणार ५० कोटी? अभिनेत्याने केला खुलासा म्हणाला….

‘जवान’ने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींचे कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली होते, चित्रपटाने ५३ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ‘जवान’ने ७७.८३ कोटींची कमाई केली. रविवारी चौथ्या दिवशी चित्रपटाने तिन्ही दिवसांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ८० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे.

Video : अभिनेत्री शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक अंदाज; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘जवान’ने तब्बल ८१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘जवान’ची चार दिवसांची एकूण कमाई आता २८७.०६ कोटींवर पोहोचली आहे. चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास शाहरुखच्या ‘जवान’ने त्याच्याच ‘पठाण’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. यासह ‘केजीएफ २’, ‘गदर २’, ‘बाहुबली २’ अशा अनेक चित्रपटांना मागे टाकलंय. ‘पठाण’ने चौथ्या दिवशी ५१.५ कोटी, ‘केजीएफ २’ ने ५०.३५, ‘बाहुबली २’ ने ४०.२५ तर ‘गदर २’ ने ३८.७ कोटी कमावले होते.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जवान’ला प्रेक्षक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. हा चित्रपट पाहायला सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाने अवघ्या चार दिवस २८७ कोटी कमावले आहेत. त्यामुळे याच गतीने चित्रपटाची कमाई सुरू राहिली तर या आठवड्याच्या शेवटपर्यंत चित्रपट ४०० कोटींचा टप्पा सहज ओलांडून ५०० कोटींच्या दिशेने वाटचाल करेल. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट एकूण किती कमाई करेल, हे येत्या काळात कळेल. पण सध्या तरी त्याचाच बोलबाला असल्याचं दिसून येतंय.