बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांची मैत्री जगजाहीर आहे. लोक त्यांच्या मैत्रीची उदाहरणे देतात. मात्र, एकदा शाहरुख खान करण जोहरला एवढा ओरडला होता. त्याचा रागाला घाबरुन करण ढसाढसा रडायला लागला होता. ‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली होती. खुद्द करण जोहरने स्वतः हा किस्सा शेअर केला आहे.

हेही वाचा- रणवीर सिंगच्या अभिनय कारकिर्दीला लागणार ब्रेक; YRF ने सोडली साथ, अभिनेत्यासह चित्रपट करण्यास नकार

करण जोहर एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये याबाबत खुलासा केला आहे. कल हो ना हो चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सैफ अली खान आणि प्रिती झिंटा सेटवरचे त्यांचे संवाद वारंवार विसरत होते. हे पाहून शाहरुख खानला आपला राग आवरता आला नाही आणि तो करण जोहरला सगळ्यांसमोर ओरडला. शाहरुख खान करण जोहरला खडसावत म्हणाला, “ही काय चेष्टा आहे, तू सगळ्यांना बिघडवलं आहे, कुणीही त्यांच काम नीट करत नाहीये. शाहरुख खान रागात म्हणाला होता की, असे काम केल्याबद्दल मला नाही तर यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळेल”. शाहरुख खानच्या त्या ओरडानंतर करण जोरजोरात रडू लागला.

हेही वाचा- कतरिना कैफला घ्यायचा होता जॉन अब्राहमचा बदला; खुद्द सलमान खानने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “तिने सरळ..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘कल हो ना हो’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३८.५५ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड केले होते. त्याच वेळी, त्याचे जगभरातील कलेक्शन ५३.५४ कोटी रुपये होते. या चित्रपटात शाहरुख, सैफ आणि प्रिती व्यतिरिक्त जया बच्चन, दारासिंग, सतीश कौशिक, झनक शुक्ला, सोनाली बेंद्रे, डेलनाज इराणी, राजपाल यादव आणि संजय कपूर यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.