अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिवसेंदिवस त्याच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतचं या चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा- “माझे फोटो झूम करून…”; हुमा कुरेशीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव, म्हणाली…

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा व्यवसाय केला आहे. कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. कार्तिकने या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये या चित्रपटाने जगभरात १०० कोटी कमावल्याचे लिहिले आहे. कार्तिकने ही पोस्ट करत चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सत्यप्रेम की कथा ने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींचा व्यवसाय करत जबरदस्त सुरुवात केली होती. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसून येत होती. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत ७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ६८.०६ कोटींची कमाई केली आहे.

सत्यप्रेम की कथा’ कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा हा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर ही जोडी ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक आणि किरायाराचा दुसरा हिट चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा- “चंदेरीत पुन्हा ‘स्त्री’ची दहशत…”, ‘स्त्री २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, श्रद्धा कपूरने शेअर केला थरारक व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्स यांनी केलं आहे. चित्रपटात कार्तिक-कियाराव्यतरिक्त सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत व शिखा तलसानिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.