scorecardresearch

आता आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणार रणवीर-दीपिकाची नवी टीम?

रणवीर-दीपिका ही जोडी आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

क्रिकेट आणि चित्रपटाचे नाते फार जुने आहे. सध्या सिनेसृष्टीत असे अनेक क्रिकटर्स आहेत ज्यांनी अभिनेत्रींची लग्न केले आहे. तर काही सेलिब्रेटींनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत आता बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचे नावही सहभागी होणार आहे. रणवीर-दीपिका ही जोडी आगामी आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएलमध्ये ८ ऐवजी एकूण १० संघाचा समावेश केला जाणार आहे. याचाच अर्थ येत्या आयपीएलमध्ये दोन नवे आयपीएल संघ असणार आहेत. हे संघ नेमकं कोणते असतील? त्यांची नावं काय? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे दोन संघ खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार असून यात अनेक मोठमोठे कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे. त्यांनी नुकतंच यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या टीमबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही.

यंदा खेळाडूंचा लिलाव

दरम्यान २ नव्या आयपीएल टीमसोबत यंदा खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहेत. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला तर ते जुही चावला, शाहरुख खान, प्रिती झिंटा यांच्या यादीत सहभागी होतील. यामुळे रणवीर आणि दीपिका आयपीएलमध्ये एक संघ खरेदी करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone ranveer singh set to bid for new ipl team for next year nrp

ताज्या बातम्या