Video : ‘केबीसी’च्या सेटवर कतरिना कैफचा प्रश्न, बिग बीही गोंधळले

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनत्री कतरिना कैफ हे उपस्थित होते.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. नुकतंच या शो मध्ये सूर्यवंशी चित्रपटाच्या टीमने प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावली. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनत्री कतरिना कैफ हे उपस्थित होते. या खास भागाचे काही प्रोमो नुकतंच समोर आले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांना कतरिनाने असा प्रश्न विचारला, जो ऐकून तेही थक्क झाले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आज ५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतासह अनेक देशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. जवळपास ५ हजार २०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि कतरिनाने केबीसीच्या सेटवर हजेरी लावली. याचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यातील एका प्रोमोत अमिताभ बच्चन हे कतरिनाला “केबीसी १३ मध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणती तयारी केली आहे?”, असा प्रश्न विचारतात.

त्यावेळी कतरिना उत्तर देताना म्हणाली, “मी या शो मध्ये सहभागी होण्यासाठी थोडासा इतिहास, भूगोल याचा अभ्यास केला आहे. तसेच गुगलवरही काही गोष्टी वाचल्या असून ही सर्व माहिती एकत्र केली आहे.” यानंतर बिग बी हाच प्रश्न अक्षयलाही विचारतात. त्यावेळी अक्षय म्हणतो, “मला ज्या गोष्टी माहिती आहे, त्याच आधारे मी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.” यानंतर अक्षय गमतीमध्ये कतरिनाकडे इशारा करत “ही इथे फक्त पैसे जिंकायला आली आहे,” असे बिग बींना सांगतो.

यानंतर कतरिना अमिताभ बच्चन यांना एक प्रश्न विचारते. कतरिनाचा हा प्रश्न ऐकून बिग बी देखील थोडे गोंधळतात. या व्हिडीओत कतरिना अमिताभ बच्चन यांना विचारते की, “शो मध्ये ज्या लाईफलाईन दिल्या आहेत, त्या आपण एकदा वापरु शकतो की प्रत्येक प्रश्नानंतर वापरता येतात?” असा प्रश्न विचारते. हा प्रश्न ऐकून बिग बी गोंधळून कतरिनाकडे बघत बसतात. यानंतर अक्षय बिग बींची गंमत करतो. “सर तुम्ही इतक्या वर्षापासून हा शो होस्ट करत आहात, पण असा प्रश्न तुम्हाला कोणीही विचारलेला नसेल,” असे अक्षय म्हणतो.

आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर आज ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kaun banega crorepati 13 katrina kaif asks question about lifeline to amitabh bachchan watch video nrp