छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात ३ स्पर्धकांची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले हे तीन स्पर्धक आहेत. रश्मी आणि देवोलीनाला तर सगळेच ओळखतात मात्र, अभिजीत कोण आहे? हे बऱ्याच लोकांना माहित नाही.

अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. शनिवारी ‘वीकेंड का वार स्पेशल’ला आलेले अभिनेते महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडचा भाईजान आणि ‘बिग बॉस १५’चा सूत्रसंचालक सलमान खानला अभिजीत विषयी सांगितले. त्यांनी सांगितलं की अभिजीतने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

अभिजीत हा साताऱ्याचा आहे. अभिजीतने महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. तो स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर म्हणवतो. अभिजीतची पत्नी ही सोशल वर्कर आहे.

आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस; जाणून घ्या कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत एकदा कारागृहातही गेला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून त्याला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी अभिजीत चेक बाऊन्सच्या प्रकरणात अडकला होता.