लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू व्यक्तींसाठी देव-दूत बनला होता. गरजू लोकांसह, स्थलांतरीत मजुरांना प्रत्येक वेळेस सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. याच सोनू सूदला मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. जुहूमधील रहिवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर करुन त्यात बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी सोनूला ही नोटीस पाठवण्यात आली. यापूर्वी १५ नोव्हेंबरला पालिकेकडून सोनूला याबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. यावेळी त्याला या हॉटेलचे रुपांतर सहा मजली निवासी इमारतीत करावे, असे सांगण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय?

या वर्षाच्या सुरुवातीला पालिकेने सोनू सूदला एक नोटिस पाठवली होती. यावळी पालिकेने सोनू सूदला त्याच्या जुहू येथील हॉटेलला पुन्हा निवासी इमारतीत रूपांतरित करण्यास आणि इमारतीतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यास सांगितले होते. यानंतर सोनूने मुंबई उच्च न्यायालयात स्वत: या इमारतीचे नूतनीकरण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सोनूने अद्याप या इमारतीचे नूतनीकरण केलेले नाही, असे बीएमसीच्या नव्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीचं मोठं पाऊल

पालिकेने नोटीसमध्ये काय म्हटलं आहे?

मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नुकतंच सोनू सूदला नवीन नोटीस पाठवली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदच्या जुहूमधील रहिवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत राहणे/ खाणे बंद केले आहे. मात्र याचा वापर हा रहिवाशांकरिता केला जाईल, असे सांगण्यात आले होते.

त्यासोबतच तुम्ही यापूर्वी नमूद केले होते की, जोडणी/बदली/पुनर्स्थापनासाठी आवश्यक काम प्रगतीपथावर आहे. मात्र नुकतंच पालिका कार्यालयाने २० ऑक्टोबर २०२१ रोजी जागेची पाहणी केली आहे. मात्र आपण मंजूर आराखड्यानुसार काम सुरू केले नसल्याचे दिसून येत आहे., असे पालिकेने या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते गणेश कुसामुलू यांनी सोनू सूदवर आरोप केले होते. या हॉटेलचे मुलींच्या वसतिगृहात रूपांतर केल्याचा आरोप गणेश कुसामुलू यांनी केला होता. त्यामुळे ही इमारत पाडण्यात यावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदने इमारतीचे नूतनीकरण केले आहे. त्यांनी बीएमसीला याबाबत माहिती दिली आहे. या इमारतीत कोणतेही बेकायदेशीर बांधकाम होणार नसल्याचे सोनूने म्हटले आहे.