Mumbai News Updates: त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेईल, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती, ती आम्ही ऐच्छिक ठेवली. त्रिभाषा सूत्राबाबत ज्येष्ठ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल आल्यावर विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच ३० जून रोजी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 1 July 2025

20:07 (IST) 1 Jul 2025

मंत्रोच्चार आणि श्री सुक्तामुळे गडकरींच्या शेतात सोयाबीन उत्पादनात वाढ; पत्नी कांचन गडकरींनी सांगितला अनुभव

धापेवाडातील शेतीत आम्ही हा प्रयोग यशस्वी केल्याचा अनुभव केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितला. ...वाचा सविस्तर
19:41 (IST) 1 Jul 2025

औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख नि:शुल्क, उलट शासकीय प्रकल्पांसाठी १२५ रुपये…

नागपुरातील कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राख नि:शुल्क असून उलट शासकीय प्रकल्पासाठी या राखेच्या वाहतुकीसाठी १२५ रुपये खर्च महानिर्मिती देणार आहे. ...वाचा सविस्तर
19:27 (IST) 1 Jul 2025

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला 'आदेश', त्यांच्याकडून लगेच मान्यही….

मूळत: विदर्भातील रहिवासी असलेले न्या.गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले होते. ...सविस्तर बातमी
19:13 (IST) 1 Jul 2025

चर्चगेटमधील आयकर कार्यालयाजवळ भलामोठा खड्डा, वाहनचालकांची सुरक्षा वाऱ्यावर

चर्चगेट येथील आयकर कार्यालयानजिक महर्षी कर्वे मार्गावर गेल्या महिनाभरापासून वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. ...वाचा सविस्तर
19:02 (IST) 1 Jul 2025

घरपोच अन्न पदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधातील तक्रारीसाठी हेल्पलाईन

झेप्टो, स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या अन्न वितरण व्यवस्थेत अस्वच्छता व अपायकारक वस्तू आढळल्यानंतर ग्राहकांसाठी राज्य शासनाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन जाहीर केली जाणार आहे. ...सविस्तर बातमी
18:42 (IST) 1 Jul 2025

झाडी सापाचा मुंबईत अधिवास ?

तांबूस रंगाची पाठ असलेला झाडी सापाच्या (ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक) प्रजातीचा मुंबईत अधिवास असण्याची शक्यता एका संशोधनात वर्तविण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
17:55 (IST) 1 Jul 2025

पित्याने चटके देऊन अल्पवयीन मुलीला केली मारहाण

नशेच्या आहारी गेलेल्या पित्याने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर चटके देऊन बेदम मारहाण केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. ...अधिक वाचा
17:28 (IST) 1 Jul 2025

सुखडआंबा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

सुखडआंबा येथील घटनेनंतर तत्काळ ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचायत समिती मधील कंत्राटी कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले होते. ...अधिक वाचा
17:04 (IST) 1 Jul 2025

पालघरमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ठप्प; चालक संपावर, रुग्णांचे हाल

रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्यामुळे गंभीर रुग्णांचे व गर्भवती मातांचे हाल होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
16:59 (IST) 1 Jul 2025

चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांतर्फे तक्रारदारांना परत

नाशिक : नाशिक पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी परिमंडळ (दोन) अंतर्गत ३३ तक्रारदारांना चोरीस गेलेला पाच कोटी सात लाख ७२ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 1 Jul 2025

टिटवाळ्यात मुंबई-बडोदा महामार्गालगतच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई

या महामार्गालगतच्या सरकारी वन खात्याच्या जमिनी हडप करून तेथे बेकायदा चाळी उभारणीसाठी या भागातील भूमाफिया सरसावले आहेत. ...वाचा सविस्तर
16:47 (IST) 1 Jul 2025

समांतर वीज वितरण परवाना… टोरंट कंपनीच्या समर्थनार्थ गुजरातीमध्ये…

नागपूर : राज्यात समांतर वीज वितरण परवान्यासाठी टोरंटसह इतर एकूण तीन खासगी कंपन्यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. त्याला विद्युत क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून विरोध होत आहे. समाज माध्यमांवर टोरंट कंपनीच्या समर्थनार्थ मराठी, हिंदीसोबतच चक्क गुजराती भाषेतील पत्राचे नमुने प्रसारित केले जात आहेत.

सविस्तर वाचा...

16:36 (IST) 1 Jul 2025

आषाढी एकादशीला सेवेवरील एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्र्यांकडून जेवण… पंढरपुरमध्ये…

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आषाढी एकादशीच्या दिवशी सेवेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांकडून मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 1 Jul 2025

ग्रामीण भागात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठा बाबत बैठक; महावितरणकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत ३० जून रोजी महावितरणचे कार्यकारी, उपकार्यकारी अभियंता, ग्रामस्थ, सरपंच यांच्यामध्ये बैठक पार पडली. ...सविस्तर बातमी
16:04 (IST) 1 Jul 2025

मुंबईतील ११ हजार ५९९ घरांची जूनमध्ये विक्री, राज्य सरकारला १०३५ कोटी रुपये महसूल

मुंबईतील ११ हजार ५९९ घरांची जूनमध्ये विक्री झाली असून या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्क वसुलीच्या माध्यमातून राज्य सरकारला १०३५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. ...अधिक वाचा
15:55 (IST) 1 Jul 2025

डेटिंगवरील वादातून मुलीला ३१ व्या मजल्यावरून दिला धक्का, हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी

भांडुप येथील ३१ मजल्यावरील टेरेसवरून ढकलल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, तिच्या अल्पवयीन मित्राविरोधात भांडुप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर बातमी
15:49 (IST) 1 Jul 2025

साईबाबा पालखी सोहळ्यात ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास

सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...सविस्तर बातमी
15:43 (IST) 1 Jul 2025

गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा…

स्वच्छतेची जाणीव समाजात प्रबळ करण्यासाठी ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटात प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी खास गाणे गायले असून, हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ...अधिक वाचा
15:25 (IST) 1 Jul 2025

गणेशोत्सव काळात मुंबई-भुसावळ रेल्वे प्रवास होणार गतिमान

सप्टेंबरपर्यंत दादर-भुसावळ विशेष रेल्वेगाडी धावणार असून पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून भुसावळ गाठणे सोपे झाले आहे. ...वाचा सविस्तर
15:09 (IST) 1 Jul 2025

महापालिका बँक कर्मचाऱ्यांची आजपासून पेंशन बंद, काय आहेत कारणे?

नागपूर : महापालिकेच्या १२९ बँक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बँकेच्या संचालक मंडळाने १ जुलै २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आक्षेप घेतल्यानंतर संचालक मंडळाने त्यातून मार्ग न काढता थेट निवृत्ती वेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

13:43 (IST) 1 Jul 2025

“धनधान्य देणारी काळी आई हेच खरे शक्तिपीठ”, महामार्ग बांधकामावरून बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा, असा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. ...वाचा सविस्तर
13:41 (IST) 1 Jul 2025

“स्त्री सुक्त ऐकवल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढले”….कांचन गडकरी यांचा दावा….

नागपूर : धापेवाडातल्या शेतीत असाच प्रयोग करून, सोयाबीनला ‘स्त्री सुक्त’ ऐकवल्याने एकरी उत्पादन वाढले, असा दावा सेवा सदनच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी सोमवारी येथे केला.

सविस्तर वाचा...

13:10 (IST) 1 Jul 2025

योग्य निदान न झाल्याने क्षयरोगामुळे तीन मुलांचा मृत्यू…

१२-१६ वयोगटातील मुलांमधील क्षयरोगाच्या निदानास विलब होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक वेळा पालक वेळीच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेत नाहीत. ...अधिक वाचा
13:02 (IST) 1 Jul 2025

चोरीसाठी आंतरराज्यीय टोळीचा 'पंक्चर पॅटर्न'

यवतमाळ : बँकेतून काढलेली रक्कम लुटण्यात तरबेज असणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. लुटीची रक्कम घेऊन दारव्हा मार्गे पसार झालेल्या या भामट्यांना लाडखेड पोलिसांनी पाठलाग करून पकडले त्यांच्या अटकेसाठी विदर्भातील पोलिसांनी जंग पछाडले होते.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 1 Jul 2025

बाह्यवळण मार्गावर प्रवाशाला लुटणारे चोरटे गजाआड

तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील रोकड, मोबाइल संच, सोनसाखळी असा मुद्देमाल लुटून आरोपी पवार पसार झाले. ...सविस्तर बातमी
12:33 (IST) 1 Jul 2025

‘केसरी-२’ मधील सर सीएस नायर यांचे अमरावतीशी नाते काय? अक्षय कुमारने साकारली भूमिका

अमरावती : . ‘केसरी-२’ मध्ये अक्षय कुमारने एका कर्तबगार वकिलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या ‘ओटीटी’वर चांगलाच गाजत आहे. अक्षय कुमारने साकारलेले पात्र हे ब्रिटिश काळातील प्रसिद्ध वकील सर चेत्तूर शंकरन नायर यांचे आहे. त्यांचे महाराष्ट्रातील अमरावतीशी विशेष नाते आहे.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 1 Jul 2025

इस्रोचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे दीर्घ आजाराने सोमवारी अमेरिकेत निधन झाले. ...सविस्तर बातमी
12:28 (IST) 1 Jul 2025

एमपीएससी बळकट होणार! तीन नवीन सदस्यांची घोषणा, परीक्षा, नियुक्तीला गती

एमपीएससीतील तीन रिक्त सदस्यपदे अखेर भरल्याने स्पर्धा परीक्षांच्या निकाल आणि निवड प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ...अधिक वाचा
12:18 (IST) 1 Jul 2025

शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...अधिक वाचा
12:08 (IST) 1 Jul 2025

मालमत्ता कर भरणा अडचणीचा, नवी मुंबई महापालिकेची अद्ययावत यंत्रणाही कुचकामी ?

मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत अधिकाधिक सुलभता पालिकेने प्राप्त करून दिली आहे. परंतु ऑनलाइन बिल भरताना अनेक वेळा एरर दाखवला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ...सविस्तर बातमी

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे