गोरेगाव (पूर्वे) येथील एका ३० वर्षीय महिलेने तिच्या प्रियकराचा गळा दाबून खून करण्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आरे पोलिसांनी तिला अटक केली.

हेही वाचा – ‘चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत भुरट्या चोरांची हातसफाई ; ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरेगाव (पूर्व) येथील तपेश्वर मंदिराजवळ शनिवारी दुपारी आरोपी महिलेने प्रियकराचा गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर तिने प्रियकराचा मृतदेह रिक्षात ठेवला आणि तिने पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती तिने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराची सतत भांडणे होत होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे आरे पोलिसांनी सांगितले.