Mumbai Rain News Updates 26 May 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन ते चार तास काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाने त्यात लक्ष घातल्याचे दिसले नाही.’, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबई व मुंबई उपनगर तसेच पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates
21:14 (IST) 26 May 2025

उन्हाळी कांदा, कडधान्ये, आंबा मातीमोल जिल्हानिहाय, पीकनिहाय नुकसान किती ?

राज्यभरात मे महिन्यात झालेल्या वळीव, पूर्वमोसमी पावसामुळे सुमारे ३४ हजार ८४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...वाचा सविस्तर
21:13 (IST) 26 May 2025

नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूवर पोलिसांकडून परस्पर अंत्यसंस्कार, प्रशासनाकडून न्यायालयाची दिशाभूल

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस तसेच नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याच्यासह इतर मृत नक्षलवाद्यांवर नारायणपूर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याने कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. ...सविस्तर बातमी
20:12 (IST) 26 May 2025

लोहखनिज वाहतूक जिवावर उठली, गडचिरोलीत असंतोष; आमदार डॉ. नरोटेंसह सर्वपक्षीय नेत्यांचा…

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...अधिक वाचा
20:05 (IST) 26 May 2025

टँकरचालकाशी वाद; बीपीसीएलमधून दोन तास इंधन वाहतूक ठप्प

मनमाड येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीत इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाला अपमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी प्रवेशद्वाराजवळच ठिय्या दिल्याने प्रकल्पाचे कामकाज प्रभावित झाले. ...सविस्तर वाचा
20:03 (IST) 26 May 2025

फलटणमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद; जाणून घ्या, राज्यात किती ठिकाणी पडला अति मुसळधार पाऊस

सातारा, पुणे आणि अहिल्यानगरमधील १४ ठिकाणी शंभर मिलीमीटरहून जास्त म्हणजे अति मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १६३.५ मिमी पाऊस पडला आहे. ...सविस्तर बातमी
18:24 (IST) 26 May 2025

भारताने पाकिस्तानला दिलेले उत्तर संयमी व योग्यच, अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांचे मत

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-अमेरिका संबंधांवर मुंबई मराठी पत्रकार संघाने विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. ...वाचा सविस्तर
18:12 (IST) 26 May 2025

कल्याणमध्ये उद्योजकाकडे खंडणी मागणाऱ्या दोन जणांना अटक, खंडणीची तक्रार केली म्हणून समर्थकांचा उद्योजकाच्या घरावर हल्ला

कोळसेवाडी पोलिसांना यासंदर्भातची माहिती दिली. ...सविस्तर बातमी
18:07 (IST) 26 May 2025

शिक्षकांच्या बदल्या संचमान्यतेनुसारच! प्रक्रिया मात्र तळ्यात-मळ्यात…

जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी २०२३-२४ की २०२४-२५ ची संचमान्यता गृहीत धरायची? हा पेच अखेर सुटला आहे. ...सविस्तर वाचा
18:06 (IST) 26 May 2025

दुचाकीच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
18:01 (IST) 26 May 2025

आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या छताला गळती, गळतीमुळे पावसाचे पाणी कार्यालयात

छतातून थेंबथेंब पाणी गळत असून अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन पथकाला काम करावे लागत आहे. ...सविस्तर बातमी
17:54 (IST) 26 May 2025

उल्हास नदी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोहिली गावातील तीन गोपालकांची सुटका

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी याबद्दल माहिती दिली. ...वाचा सविस्तर
17:45 (IST) 26 May 2025

मुंबई जलमय झाल्याने राजकीय आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी, आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात वाकयुद्ध

भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ...सविस्तर बातमी
17:34 (IST) 26 May 2025

वरच्याबर्थवरील बालकाची लघवी अंगावर पडल्याने रेल्वेत हाणामारी

उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्न सोहळे यामुळे कुटुंबासह रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जात आहे. मुलबाळ सोबत असल्याने प्रवासात विशेष काळजी घ्यावे लागते. ...वाचा सविस्तर
17:18 (IST) 26 May 2025

पहिल्याच पावसात ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात गळती

मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही महिन्यांपूर्वीच ते भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. ...अधिक वाचा
16:43 (IST) 26 May 2025

बदलापूर,अंबरनाथच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम; बॅरेज बंधाऱ्यातील वीजपुरवठा खंडीत, गढुळताही वाढली

मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उल्हास नदीवर असलेल्या आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर झाला आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 26 May 2025

पुण्याहून बसगाडीने ठाण्यात आणला १० किलो गांजा, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने केली दोन महिलांना अटक

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रेणुका आणि संगीता यांना अटक केली आहे. ...सविस्तर वाचा
16:32 (IST) 26 May 2025

यंदा पावसाळी आजार वाढण्याची भीती!

पावसाळी आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. ...सविस्तर बातमी
16:14 (IST) 26 May 2025

खडपोली येथे मासेमारी करायला गेलेले तिघे नदी पात्रात अडकले, तब्बल चार तासानंतर रेस्क्यू टीमने केली सुटका

रविवारी रात्री उशिरा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने चार तासांच्या थरारक बचावकार्यानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. ...सविस्तर बातमी
16:00 (IST) 26 May 2025

पुढचे ४ दिवस पावसाचे..., हवामान विभागाने दिला 'या' भागात पावसाचा अलर्ट

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
15:56 (IST) 26 May 2025

डोंबिवलीजवळ पलावा खोणी ते तळोजा रस्त्यावर पाणी तुंबले

पहिल्याच पावसाने खोणी पलावा ते तळोजा रस्ता, काटई - बदलापूर रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. ...सविस्तर बातमी
15:56 (IST) 26 May 2025

अमित शहा नागपूर दौरा : भुजबळांनंतर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दीड दिवसांचा नागपूर दौऱ्यावर आले असून त्यांनी रविवारी रात्री स्थानिक नेत्यांसोबत खलबते झाल्याची माहिती आहे. ...सविस्तर वाचा
15:41 (IST) 26 May 2025

Mumbai Metro Station Rain Updates: पावसाचा ‘मेट्रो ३’ला फटका… आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानक जलमय…

मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. ...अधिक वाचा
15:39 (IST) 26 May 2025

Ajit Pawar: ५१ वर्षांच्या इतिहासात बारामतीत पहिल्यांदाच एवढा पाऊस; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पहाटेपासून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या ५१ वर्षांत जेवढा पाऊस झाला नाही. तेवढा पाऊस बारामतीत झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. ...अधिक वाचा
15:25 (IST) 26 May 2025

पश्चिम रेल्वे सेवा विलंबाने

त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 26 May 2025

नवी मुंबईतील सीबीडीत भरले पाणी ! सेक्टर ४,५,६ पाण्यात, दुकाने व घरात शिरले पाणी

सीबीडी हा परिसर सखल भागात असल्याने सेक्टर १२ येथे असलेल्या पंपिंग स्टेशन वरून या विभागातील पाणी उचलून खाडीत सोडले जाते. ...सविस्तर वाचा
15:16 (IST) 26 May 2025

कार्यकर्त्यांनी इच्छा अन् आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले रिक्षाचे सारथ्य; ठाणे महापालिका मुख्यालयात आव्हाड आले रिक्षा घेऊन

राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सोमवारी सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयात जनसंवाद अभियान राबविण्यासाठी जात असताना, पालिका मुख्यल्याजवळील सर्कल येथे थांबलेल्या एका कार्यकर्त्याने आव्हाडांची भेट घेतली. ...अधिक वाचा
15:15 (IST) 26 May 2025

मिठी नदी गाळ गैरव्यवहाराप्रकरण, अभिनेता डिनो मोर्याची मुंबई पोलिसांनी केली चौकशी

अभिनेता डिनो मार्या शिवसेनेचे (ठाकरे गट) युवानेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. ...वाचा सविस्तर
15:12 (IST) 26 May 2025

डोंबिवलीत पीडित बालिकेला गर्भपाताचे कारण सांगून पती-पत्नीकडून घरात वेश्या व्यवसाय

कुटुंबीयांबरोबर असलेल्या ओळखीतून डोंबिवलीतील एका विवाहित तरूणाने या कुटुंबातील एका १५ वर्षाच्या बालिके बरोबर आपले प्रेमसंबंध वाढविले. ...वाचा सविस्तर
15:07 (IST) 26 May 2025

कल्याणमध्ये पेट्रोल पंपावरील रक्कम कामगारानेच चोरली

कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या बाजुला असलेल्या हिंद ऑटोमोबाईल पेट्रोल पंपावरील ५९ हजार रूपयांची ग्राहक सेवेतून जमा झालेली रक्कम याच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कामगारानेच चोरून नेली आहे, अशी तक्रार पेट्रोलपंप व्यवस्थापकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. ...अधिक वाचा
15:05 (IST) 26 May 2025

नवी मुंबई : उलवे येथील कोपर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन, सिडकोकडून होणाऱ्या तोडक कारवाईला विरोध

ग्रामस्थांची पारंपरिक स्मशानभूमी हटवून ती चार किलोमीटर अंतरावर नेण्यात येणार आहे. याला येथील नागरिकांचा विरोध आहे. ...सविस्तर वाचा

Mumbai Rain News Live Updates

मुंबईत जोरदार पावसाचा इशारा