लोकसत्ता, प्रतिनिधी

नवी मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतेमधील मानांकनात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्यासह स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नवी मुंबई स्वच्छतेत अग्रभागी राहिलेली आहे. स्वच्छ शहर अभियानात गेल्यावर्षी नवी मुंबई शहराने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. पालिकाही करोडो रुपये खर्च करुन शहर स्वच्छतेसाठी आणि शहर सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न करत असते.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

असं असतांना नेरुळ विभागात याच शहर स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. नेरुळ सेक्टर १८ परिसरात असलेल्या स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यान तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाच्याभोवती असलेल्या लोखंडी कंपाऊंडवर चक्का कपडे सुकत घातले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा घालणाऱ्या अशा गोष्टींकडे पालिकेचे, अधिकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत नेरुळ विभागाचे विभाग अधिकारी प्रबोधनकार मावडे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

हेही वाचा… भाजप पक्ष प्रवेशासाठी हत्येच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसाचा खळबळजनक आरोप

नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुभोशीकरणासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. तर दुसरीकडे नागरीक शहर सौंदर्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत असून माझे शहर स्वच्छ शहर या भावनेतून शहराच्या सौंदर्यात बाधा येणार नाही याबाबत नागरीकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.