पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. मागील चोवीस तासांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५५ मिली मीटर पाऊस चिंचवडमध्ये झाला आहे. शहरात शनिवारी जोरदार पाऊस झाला होता. रविवार आणि सोमवार दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी थोड्या सरी कोसळल्या. सायंकाळी सात पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.

रात्री आठ ते नऊ एक तास मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मागील चोवीस तासात चिंचवडमध्ये सर्वाधिक ५५ मिली मीटर पाऊस पडला आहे. त्याखालोखाल तळेगावमध्ये ५०.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले. रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. परिणामी, वाहतूक संथ गतीने झाली आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच

हेही वाचा : चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले

दरम्यान, पवना धरण १०० टक्के भरल्याने रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. १४०० क्युसेक्सने नदीत पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण पाहता धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader