Dalbhaji In Vidarbha : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अनेक पदार्थ त्या भागाची ओळख सांगतात. आज आपण विदर्भातील अशाच एका खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत, ती म्हणजे विदर्भातील डाळभाजी. ही डाळभाजी तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात जेवणाच्या लिस्टमध्ये दिसेल. ही डाळभाजी अत्यंत चविष्ठ आणि तितकीच लोकप्रिय आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विदर्भातील डाळभाजी कशी बनवली जाते, या विषयी सांगितले आहे.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे-
१. एक मोठं पातेलं चुलीवर ठेवले .
२. त्यात थोडे तेल टाकले.
३. तेलामध्ये हळद, शेंगदाणे, मीठ आणि बारीक चिरलेले खोबरे टाकले.
४. त्यानंतर त्यात पाणी टाकले.
५. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली पालक टाकली आहे.
६. त्यानंतर त्यात थोडी कैरी टाकली.
७. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकली आहे.
८. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली चण्याची डाळ टाकली आहे.
१० त्यानंतर तडका देण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यात तेल घेतले त्यात जिरे, मोहरी, तिखट ठेचा, आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेले कांदे टाकले.
९. त्यानंतर त्यात टाकले आहे कढीपत्ता, मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेले टोमॅटो टाकले.
१०. त्यानंतर यामध्ये आधीच्या पातेल्यातील डाळ आणि पालकचे मिश्रण टाकले आणि विदर्भ स्टाइल डाळभाजी तयार झाली.
व्हिडीओत सांगतात की अशी डाळभाजी तुम्हाला फक्त विदर्भातील पंगतीत दिसून येईल.
हेही वाचा : VIDEO : एकही थेंब तेल न वापरता बनवा बटाट्याची चमचमीत भाजी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
पाहा व्हायरल व्हिडीओ
dabake_khao या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विदर्भातील पंगतीतील डाळभाजी, विदर्भ स्पेशल डाळभाजी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “मी पण विदर्भातील आहे.आम्ही घरी पण करतो पण अशी डाळभाजी पंगतीत किंवा भंडाऱ्यात दिसून येते. लय भारी असते.” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम मस्त वाटते, अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “तोंडाला पाणी सुटले राव”