लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहरातील रस्ते तसेच नालेसफाईच्या कामांची पोलखोल केल्यानंतर भाजपने आता ढोकाळी परिसरातील शौचालये, आरोग्य केंद्र आणि पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाल्याची बाब उघडकीस आणली आहे. राज्य सरकारकडून निधी मिळूनही शौचालयांची दुरावस्था असल्याच्या मुद्द्यावरून भाजपने पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करत याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, सुशोभिकरण अशा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने पालिकेला निधी दिला आहे. या कामांपाठोपाठ शौचालयांचे नुतनीकरण आणि दुरुस्ती कामांसाठी राज्य सरकारने पालिकेला निधी दिला आहे. तरिही शहरात शौचालयांची दुरावस्था असल्याची बाब पुढे येत आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटसवरील धारदार सुरे तरुणाला पडले महाग

नालेसफाईच्या कामांची पोलखोल केल्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह गुरूवारी ढोकाळी परिसराचा दौरा केला. यामध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे त्यांना आढळून आले असून याच मुद्द्यावरून त्यांनी पालिकेच्या कारभारवर संताप व्यक्त केला आहे. ढोकाळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असून पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झाल्याची बाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारतीत व्यायाम शाळा सुरू करण्याचा प्रयत्न, पालिकेचा फौजदारी कारवाईचा इशारा

ढोकाळी गावातील दीड हजार लोकवस्तीसाठी दोन शौचालये आहेत. बांधकाम धोकादायक झाल्याने एक शौचालय बंद करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली असून तेही वापरायोग्य नाही. दरवाजे, कडी-कोयंडे आणि भांडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने रहिवाशांची विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे, अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली.

हेही वाचा… Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

शौचालयाच्या दुरावस्थेबाबत रहिवाशांनी प्रशासनाबाबतच्या संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी फोनवरून याबाबत चर्चा केली. यानंतर धोकादायक शौचालय पडून नवीन शौचालय बांधण्यात येईल तर, दुसऱ्या शौचालयाची दुरुस्ती ४८ तासात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. तसेच शौचालयासाठी निधी उपलब्ध असताना प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव का केला नाही, अपघाताची वाट पहात होते का असे प्रश्न उपस्थित करत या सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.