Marathi School Viral Video: महाराष्ट्रात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या धोरणाला सध्या सर्व स्तरावरून कडाडून विरोध केला जात आहे. या निर्णयावर राज्यभरातील लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही सक्ती मागे घेण्यात आली. अशातच राज्यात हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला आपल्या मायबोली मराठीचा नक्कीच अभिमान वाटेल.
आजच्या काळात कुठे ना कुठे आपली मराठी भाषा लोप पावत चालली आहे, असं दिसून येतंय. पण जर मराठी भाषेचा वारसा आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्याची सुरूवात आपणच केली पाहिजे. अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मराठी शाळेपेक्षा इंग्रजी शाळेला प्राधान्य देतात. पण आता भारतात नव्हे तर चक्क अमेरिकेत मराठी शाळा सुरू झाली आहे.
मराठी शाळेचा व्हिडीओ व्हायरल (Marathi School Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भारतात नाही तर अमेरिकेत शार्लट नावाची एक मराठी शाळा आहे. यात वयोवृद्ध माणसं, पालक शाळेचा फेरफटका मारताना दिसतायत. तसंच व्हिडीओमध्ये मायमराठी भाषेची संपत्ती म्हणजेत इयत्ता पहिलीची मराठी पुस्तकं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक अशा अनेक गोष्टी दिसतायत. हा सुंदर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathiasmitaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ६ लाखांपेक्षा मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “अमेरिकेतील शार्लट नावाची मराठी शाळा. ज्यांना आपले मुलं मराठी शाळेत घालू वाटत नाहीत, त्यांना दाखवा हा व्हिडीओ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नाहीतर आपल्या भारतात जास्त महत्वाचं इंग्लिश करून ठेवलंय”, तर दुसऱ्याने “आधी सगळ्या शाळा मराठीमध्येच होत्या तेव्हा ही डॉक्टर कलेक्टर झालेले की” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आता मराठी शाळा बंद होण्याचं मोठं कारण सरकार आहे कारण सरकारने प्रत्येक गोष्टी प्रायव्हेट केल्या आहेत” तर एकाने “इंग्रजी शाळेसारखी सुविधा मराठी शाळेत द्या” अशी कमेंट केली.