‘क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर’ ही वेब सीरिज अत्यंत रंजक अशी झाली आहे. मुंबईतील सर्जन डॉ. राज नागपालच्या कुटुंबातील गुंतागुंतीच्या घटनांवर आधारित ही वेब सीरिज आधारित आहे. मोहम्मद झिशान अय्युब, श्वेता बासू प्रसाद, पंकज त्रिपाठी, सुरवीन चावला यांच्या अभिनयाने सजलेली ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज सत्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते.