बॉलीवूड गायक अमाल मलिकने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीतील भीषण वातावरणामुळे सुशांतला आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले. अमालने सांगितले की, सुशांतबरोबर जे घडले, तेच आता कार्तिक आर्यनबरोबरही घडत आहे. कार्तिकला या समस्यांना आनंदाने सामोरे जाण्यासाठी त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.