माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवारांनी मारकडवाडीत लाँग मार्चला सुरुवात केली आणि ग्रामस्थांना संबोधित केले. महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला आणि ईव्हीएमविरोधात न्याय मागितला. शाळकरी मुलीनेही बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली.