World Cup 2023, India vs Australia Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, भारतीय संघाने आपल्या पहिल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला १९९ धावांत गारद केले, परंतु प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाचे तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले. या सामन्यात भारताने २ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ होती, जेव्हा दोन्ही सलामीचे फलंदाज शून्यावर बाद झाले. यापूर्वी १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध असे घडले होते. दरम्यान या सामन्यात पहिले विकेट्स घेणाऱ्या मिचेल स्टार्कने लसिंथ मलिंगाचा विक्रम मोडला.

इशान-रोहित पाठोपाठ श्रेयस अय्यरही शून्यावर बाद –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात शुबमन गिलच्या जागी इशान किशनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र तो गोल्डन डकवर बाद झाला. इशान किशनचा एकदिवसीय विश्वचषकातील हा पहिलाच सामना होता, मात्र या सामन्यात तो आपली क्षमता सिद्ध करू शकला नाही. तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने ६ चेंडूंचा सामना केला आणि जोस हेझलवूडच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला, तर श्रेयस अय्यर तीन चेंडूंचा सामना करत शून्यावर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

मिचेल स्टार्कने विश्वचषकात घेतल्या सर्वात जलद ५० विकेट्स –

या सामन्यात मिचेल स्टार्कने इशान किशनला बाद केले. यानंतर तो एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी डावात ५० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. स्टार्कने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला, ज्याने अवघ्या २५ डावात ही कामगिरी केली होती. मिचेल स्टार्कने हा पराक्रम अवघ्या १९ डावात केला.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया कोणत्या रंगाची जर्सी परिधान करणार भगव्या की निळ्या? बीसीसीआयने केले स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिलसीय विश्वचषकात सर्वात जलद ५० विकेट्स घेणारे गोलंदाज –

१९ डाव – मिचेल स्टार्क
२५ डाव – लसिथ मलिंगा
३० डाव – ग्लेन मॅकग्रा
३० डाव – मुथय्या मुरलीधरन
३३ डाव – वसीम अक्रम