GT vs MI Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातने हातातून गेलेला सामना जिंकला. प्रथम खेळताना गुजरातने २० षटकांत १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १३ षटकांत २ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या. मुंबई हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीने सामना फिरवला. मुंबईचा संघ केवळ ९बाद १६२ धावाच करू शकला.

Live Updates

Gujarat Titans vs Mumbai Indians Highlights, IPL 2024 : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने बलाढ्य हार्दिक पंड्याच्या मुंबईला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं. त्याचबरोबर या सामन्यात ६ धावांनी विजय नोंदवत १७व्या हंगामाचा विजयाने श्रीगणेशा केला आहे.

23:41 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरातने मुंबईचा सहा धावांनी पराभव केला

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२४ च्या पाचव्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला. गुजरातसाठी उमेश यादवने शेवटच्या षटकात १९ धावाचा बचाव करताना दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यात हार्दिक पंड्याचाही समावेश होता. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूत १० धावा करून सामना जवळपास मुंबईच्या खात्यात टाकला होता, मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर उमेशने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

एका क्षणी गुजरात सामना हरेल आणि मुंबई सहज जिंकेल असे वाटत होते. गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांचा वेसन घालत विजय मिळवून दिला. आयपीएलच्या सलग १२व्या हंगामातील पहिला सामना मुंबईने गमावला आहे. २०१३ नंतर पहिल्याच सामन्यातील पराभव मुंबईची पाठ सोडत नाहीये.

https://twitter.com/IPL/status/1771961565853384951

मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना मुंबईची सुरूवात विकेटने झाली. मुंबईनेही खातेही उघडले नव्हते आणि इशान किशन ओमरजाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने एकाच षटकात १९ धावांची लूट केली पण त्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि रोहित शर्मा ने मुंबईचा डाव उचलून धरला आणि त्यांनी संघाची धावसंख्या १०० पार नेऊन पोचवली. रोहितने बाद होण्यापूर्वी २९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. साई किशोरच्या गोलंदाजीवर पायचीत झाल्याने त्याचे अर्धशतक हुकले.

तसेच विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसचेही अर्धशतक हुकले. त्याने ३८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४६ धावा करत मोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्माच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली. गुजरातने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला. तिलक वर्मा (२५), टीम डेव्हिड (११) मोठी धावसंख्या करू शकले नाहीत ज्याचा फटका संघाला बसला. हार्दिकने १ षटकार आणि १ चौकार लगावत संघाला विजयाच्या जवळ आणले पण बाद झाल्याने विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. त्याच्यानंतर आलेला पीयुष चावलाही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ज्यामुळे गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केला.

23:13 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : टीम डेव्हिड पाठोपाठ तिलक वर्माही बाद

मुंबईची सहावी विकेट तिलक वर्माच्या रूपाने पडली. तिलक वर्मा १९ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. संघाला विजयासाठी ९ चेंडूत २० धावांची गरज आहे.

https://twitter.com/criminal_rn/status/1771955851999297671

23:10 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : टीम डेव्हिड ११ धावा करून बाद

टीम डेव्हिडच्या रूपाने मुंबईला पाचवा धक्का बसला. १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहित शर्माने त्याला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. हार्दिक पंड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

https://twitter.com/imraaz85/status/1771955184354144521

23:06 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : राशिद खानने १७ व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या.

राशिद खानने १७ व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या. मुंबई इंडियन्सची धावसंख्या आता ४ विकेटवर १३३ धावा आहे. मुंबईला विजयासाठी १८ चेंडूत अजून ३६ धावा करायच्या आहेत. तिलक वर्मा १९ आणि टीम डेव्हिड तीन धावांवर खेळत आहेत.

https://twitter.com/1_tataipl2024/status/1771954175489822738

22:56 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : मुंबई इंडियन्सला चौथा धक्का! रोहित शर्मानंतर डेवाल्ड ब्रेविसचेही हुकले अर्धशतक

मोहित शर्माने १६व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद करून गुजरातला सामन्यात परत आणले. ज्युनियर एबी ३८ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. मुंबईला विजयासाठी २५ चेंडूत अजून ४० धावा करायच्या आहेत. टिम डेव्हिड आता तिलक वर्मासह क्रीजवर आहे.

https://twitter.com/Johnny__007/status/1771951403965051032

22:46 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ३ विकेटवर १२१ धावा

१४ षटकांत मुंबईची धावसंख्या ३ विकेटवर १२१ धावा. मुंबईला आता ३६ चेंडूत ४८ धावा करायच्या आहेत. डेवाल्ड ब्रेविस ३४ चेंडूत ४६ धावांवर खेळत आहे. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. त्याच्याबरोबर तिलक वर्मा १० धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/Film_Director_/status/1771949051551834161

22:35 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : रोहित शर्माचे अवघ्या ७ धावांनी हुकले अर्धशतक

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा २९ चेडूत ४३ धावा करुन एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. सध्या ज्युनियर एबीने ४२ धावांवर खेळत आहे आणि मुंबईने १२.१ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1771946343415652500

22:15 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : ज्युनियर एबीने राशिदच्या चेंडूवर ठोकला षटकार

ज्युनियर एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसने राशिद खानच्या षटकात पुढच्या बाजूला दमदार षटकार ठोकला. ८ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६४ धावा आहे. रोहित २६ धावांवर तर ब्रेविस १६ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये ३४ धावांची भागीदारी झाली आहे.

https://twitter.com/AdityaG71839694/status/1771941133465313314

22:10 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सने २ गडी गमावून केल्या ५२ धावा

पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सने दोन गडी गमावून ५२ धावा केल्या आहेत. मुंबईसाठी रोहित शानदार फलंदाजी करत आहे. तो १६ चेंडूत २४ धावांवर खेळत आहे. हिटमॅनच्या बॅटमधून ४ चौकार आणि एक षटकार आला आहे. दुसऱ्या टोकाला बेबी एबी सहा धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/VishnuTiwa29296/status/1771939932409389321

22:03 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : ४ षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २ बाद ४० धावा

४ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा आहे. उमेश यादवने दुसऱ्या षटकात १० धावा दिल्या. आतापर्यंत त्याने दोन षटकात १९ धावा दिल्या आहेत. रोहित शर्मा १० चेंडूत १८ धावांवर खेळत आहे. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे. बेबी एबी त्याच्यासोबत क्रीजवर आहे.

https://twitter.com/cricketverse_/status/1771938230813802678

21:57 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : मुंबईला दुसरा धक्का, नमन धीर २० धावा करून बाद

मुंबईला दुसरा धक्का ३० धावांवर बसला. इशान किशननंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीर २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. डेव्हॉल्ड ब्रेविस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. चार षटकांनंतर संघाची धावसंख्या ४०/२ आहे.

https://twitter.com/SoupHall/status/1771936794130448784

21:56 (IST) 24 Mar 2024
GT vs MI: ओमरजाईने दुसऱ्या षटकातही मिळवली विकेट

डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी ओमरजाई परत आला पण या षटकात मुंबईच्या नमन धीरने त्याची धुलाई केली. ३ चौकार आणि एक षटकार लगावत त्याने १९ धावा कुटल्या पण शेवटच्या चेंडूवर मात्र ओमरजाईने त्याला पायचीत केले. बादचे अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद दिले नाही. गिलने रिव्ह्यू घेतला आणि त्याला बाद घोषित केले.

21:37 (IST) 24 Mar 2024
GT vs MI: मुंबई इंडियन्सला पहिलाच धक्का

गुजरातचा पदार्पणवीर ओमरजाईच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सने विकेट गमावली आहे. धावफलकात एकही धाव न जोडता इशान किशन शुन्यावर बाद झाला. मुंबई इंडियन्स १ बाद २ धावा

21:24 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरातने मुंबईला १६९ धावांचे लक्ष्य दिले

गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. आता एमआयला विजयासाठी १६९ धावा कराव्या लागतील. या सामन्यात जसप्रीत बुमराहाने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात १४ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/cricketwinner_/status/1771928479149207868

21:16 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : नवा खेळाडू नमन धीरचे शानदार क्षेत्ररक्षण

गुजरात टायटन्सची सहावी विकेट २० व्या षटकात १६१ धावांवर पडली. राहुल तेवतिया १४ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. जेराल्ड कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

https://twitter.com/VishnuTiwa29296/status/1771926452499312884

21:07 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : ल्यूक वूडच्या षटकात तेवतियाची फटकेबाजी

मुंबईसाठी डावातील १८ वे षटक टाकणाऱ्या ल्यूक वुडने एकूण १९ धावा दिल्या, ज्यात एक नो बॉलचा समावेश होता. आता १८ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा आहे. क्रिजवर उपस्थित असलेल्या राहुल तेवतियाने १० चेंडूत १८ धावा केल्या आहेत आणि विजय शंकरने १ चेंडूत १ धावा काढल्या आहेत. तेवतियाने २ चौकार आणि २ षटकार लगावला आहे.

21:05 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : बुम बुम बुमराहच्या एकाच षटकात दोन विकेट

बुमराहच्या सातव्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला हार्दिक पांड्याकडून क्लीन बोल्ड केले. तर सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर साई सुदर्शनला ४५ धावांवर झेलबाद करत अजून एक मोठी विकेट मिळवून दिली.

20:41 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : १४ षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या ११४/३

१४ षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या ११४/३ अशी आहे. क्रीजवर उपस्थित असलेल्या साई सुदर्शनने ३२ चेंडूत ३६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि १ षटकार लागला आहे. याशिवाय त्याच्याबरोबर खेळत असलेल्या डेव्हिड मिलरनेही ४५ चेंडूत ४० धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Yamini_Kalyan/status/1771917757711601886

20:33 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरातला तिसरा धक्का, उमरझाई १७ धावा करून बाद, धावसंख्या १०० धावांच्या पार

गुजरात टायटन्सची तिसरी विकेट १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर १०४ धावांवर पडली. अजमतुल्ला उमरझाई ११ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. त्याला जेराल्ड कोएत्झीने झेलबाद केले.

https://twitter.com/CricLoverShanky/status/1771915524131127554

20:25 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरात टायटन्सची १० षटकांनंतर धावसंख्या २ बाद ८२ धावा

दहाव्या षटकात १३ धावा आल्या. १० षटकांनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ८२ धावा आहे. साई सुदर्शन १७ चेंडूत १८ धावांवर खेळत आहे. त्याच्याबरोबर अजमतुल्ला उमरझाई सहा चेंडूत सात धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/Popcorn_Offl/status/1771913719511208043

20:15 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! कर्णधार शुबमन गिल ३१ धावा करून बाद

गुजरात टायटन्सने आठव्या षटकात ६४ धावांवर दुसरा विकेट गमावला आहे. शुबमन गिल २२ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. पियुष चावलाच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो समोरच्या सीमारेषेवर बाद झाला.

https://twitter.com/Shreya_vk18/status/1771911065858871396

20:05 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर गुजरातची धावसंख्या १ बाद ४७ धावा

पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या एक बाद ४७ धावा आहे. शुबमन गिल १६ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. त्याच्याबरोबर साई सुदर्शन पाच चेंडूत चार धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/JassiBhardwaj9/status/1771906528481612265

19:56 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरात टायटन्सला पहिल धक्का

गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून देणारा वृद्धिमान साहा १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला जसप्रीत बुमराहने क्लीन बोल्ड केले. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाजाने चार चौकार मारले. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. पाच षटकांनंतर संघाची धावसंख्या ४३/१ आहे.

https://twitter.com/CricCrazyJohns4/status/1771906327797018917

19:49 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरात टायटन्सची वेगवान सुरुवात

मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्स संघाने अतिशय वेगवान सुरुवात केली आहे. शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा गुजरातकडू फलंदाजी करत आहेत. संघाने पहिल्या ३ षटकात एकही विकेट न गमावता २७ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/AvengerReturns/status/1771902011442634963

19:43 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरात टायटन्सचा डावाला गिल-साहाकडून सुरुवात

मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीसाठी सज्ज आहे. शुबमन गिल आणि रिद्धिमान साहा दमदार फलंदाजी करताना दिसत आहेत. हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर साहाणेने दमदार चौकार ठोकला. पहिल्या षटकात संघाने कोणतेही नुकसान न करता ११ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1771902670145773789

19:15 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), , रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चल्ला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.

इम्पॅक्ट सब: देवाल्ड ब्रुईस, रोमॅरियो शेफर्ड, विष्णू विनोद, नेहल वढेरा, मोहम्मद नबी.

https://twitter.com/mipaltan/status/1771891787205926924

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, उमेश यादव, साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.

इम्पॅक्ट सब: बीआर शरथ, मोहित शर्मा, मानव सुथार, अभिनव मनोहर, नूर अहमद

19:11 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुड या तीन विदे खेळाडूंसोबत मुंबई खेळताना दिसणार आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1771892583662293470

19:02 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : गुजरातला शमीची उणीव भासू शकते

गुजरात टायटन्सचा विचार करता, गेल्या दोन मोसमात संघातील सातत्य राखणे गिलसाठी आव्हान असेल. गिलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे, पण त्याआधी त्याला आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. गेल्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या गिलचा समावेश होता आणि कर्णधारपदाच्या जबाबदारीचा त्याच्या फलंदाजीवर विपरीत परिणाम होणार नाही अशी आशा त्याच्या संघाला असेल. टायटन्स संघाला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची उणीव भासणार आहे, जो टाचेच्या ऑपरेशनमुळे स्पर्धेला मुकला आहे. मात्र, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे.

https://twitter.com/gujarat_titans/status/1771892677509857763

18:46 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : खेळाडूंचा फिटनेस मुंबईसाठी अडचणीचा विषय

मुंबई संघ फिटनेसशी संबंधित समस्यांशी झुंजत आहे. त्यांचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला अद्याप खेळण्याची परवानगी मिळालेली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि दिलशान मदुशंका हे आधीच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत, तर नवोदित जेराल्ड कोएत्झी देखील स्नायूंच्या दुखापतीतून सावरत आहेत आणि सुरुवातीचे काही सामने गमावू शकतात.

https://twitter.com/mipaltan/status/1771887466066125144

18:32 (IST) 24 Mar 2024
GT vs MI : आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स: शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), बी साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई/केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा. इम्पॅक्ट प्लेयर: आर साई किशोर

https://twitter.com/gujarat_titans/status/1771883411562443032

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, रोमॅरियो मोहम्मद नबी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय/आकाश मधवाल. इम्पॅक्ट प्लेयर: डेवाल्ड ब्रेविस

IPL 2024 GT vs MI Live Cricket Score Updates in Marathi

Gujarat Titans vs Mumbai Indians Highlights, IPL 2024 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध जवळपास गमावलेला सामना जिंकून यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. शुभमन गिलच्या गुजरातने रोमहर्षक सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबईचा संघाचा ६ धावांनी पराभव केला.