Maharashtra Politics News Updates: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज ठाकरे व अमित शाह यांच्यातील बैठकीमुळे या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं गेलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या समावेशावरील प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर व प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूरच्या जागेवरून अहमहमिका निर्माण झाल्याचं दिसू लागलं आहे.

Live Updates

Maharashtra Live News Updates 20 March 2024: लोकसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:51 (IST) 20 Mar 2024
शिरोळ तालुक्यातील मात्तबर पाटलांच्या उमेदवारीच्या दाव्याने कृष्णाकाठचे राजकारण गतिमान

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा दावा केला असला तरी हातकणंगले पाठोपाठ शिरोळ तालुक्यातून उमेदवारीला नव्याने आव्हान दिले जात आहे.

सविस्तर वाचा..

18:12 (IST) 20 Mar 2024
दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

मुंबई : व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ४३ वर्षीय महिलेने अटल सेतूवरून उडी मारली. ही महिला दादर येथील रहिवासी असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस आला. नवी मुंबई पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा…

17:07 (IST) 20 Mar 2024
जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली होताच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना असा काही आनंद की…

धुळे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता सोनवणे व ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद आवारात पेढे वाटले.

सविस्तर वाचा…

17:06 (IST) 20 Mar 2024
पनवेलसह सिडको वसाहतींमध्ये पाणी येण्यासाठी अजून २४ तास लागणार

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मंगळवारपासून अचानक पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अचानक फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद पाळण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

17:04 (IST) 20 Mar 2024
“एकाही वरिष्ठ नेत्याने वर्धेची जागा काँग्रेसने लढावी म्हणून स्वारस्य दाखविले नाही,” कोण म्हणाले असे पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासमोर?

वर्धेची जागा काँग्रेसनेच लढावी म्हणून शेवटच्या टप्प्यात प्रयत्न झाले. मात्र आता ही जागा राष्ट्रवादी पवार गटाकडेच जाणार यावर अखेरचे शिक्कामोर्तब झाले आहे. सविस्तर वाचा…

16:56 (IST) 20 Mar 2024
नरेंद्र मोदी, अमित शहांमध्ये औरंगजेबी वृत्ती; उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले ‘यंदा देशात परिवर्तन अटळ’

सिंदखेडराजा, जि. बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उघडपणे गुजरातबद्धल विशेष ममत्व दाखवून राज्याराज्यांत शत्रुत्वाच्या भिंती उभे करीत असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपच्या ‘अब की बार चारसो पार’ घोषणेची खिल्ली उडवून ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. सविस्तर वाचा…

16:55 (IST) 20 Mar 2024
देवेंद्र फडणवीस – रवी राणांची विमानतळावर भेट, नवनीत राणांच्‍या उमेदवारीवर….

वर्धा आणि अकोला येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे बुधवारी दुपारी येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. सविस्तर वाचा…

16:42 (IST) 20 Mar 2024
जोरगेवार, पुगलिया, ॲड. चटप व ॲड.गोस्वामी यांचे पाठबळ कुणाला? भूमिकेकडे मतदारांचे लक्ष

लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, माजी खासदार नरेश पुगलिया, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष ॲड.पारोमिता गोस्वामी नेमकी काय भूमिका घेतात, कुणाच्या मागे पाठबळ उभे करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…

16:41 (IST) 20 Mar 2024
कार्यालयात आला आणि सर्वांची नजर चुकवून १० लॅपटॉप चोरी करून निघून गेला

नवी मुंबईतील वाशी स्टेशन परिसरात अरुणाचल भवन नावाच्या इमारतीतील ८ व्या माळ्यावर निग्रो बिझनेस नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. याच ठिकाणी १५ तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास एक व्यक्ती आला. सविस्तर वाचा…

16:11 (IST) 20 Mar 2024
उलवे नोडमध्येही कांदळवनावर भराव, सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

उरण : सध्या अनेक ठिकाणी माती, कचरा आणि राडारोडा टाकून खारफुटी (कांदळवन) मारली जात आहे. याकडे सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विकासकांच्या फायद्यासाठी अनेक ठिकाणच्या खारफुटीवर मातीचा, कचऱ्याचा भराव टाकून ती मारली किंवा नष्ट केली जात आहे.

सविस्तर वाचा…

15:59 (IST) 20 Mar 2024
पनवेल : सिडकोच्या जमिनीवर राडारोडा टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

नवेल : सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार विजय सिंघल यांनी घेतल्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि उलवे परिसरात राडारोडा टाकणाऱ्यांविरोधातील जोरदार मोहीम सिडकोच्या दक्षता विभागाने पुन्हा सुरु केली आहे.

वाचा सविस्तर…

15:58 (IST) 20 Mar 2024
पुष्पा चित्रपटातील आयडियाचा धुळे जिल्ह्यात असा वापर

धुळे – आलु अर्जुनचा पुष्पा चित्रपट त्याच्या वेगवान कथानक, गाणी, हाणामारी आणि त्यात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे चांगलाच गाजला. या चित्रपटातील कल्पनांचा वापर अनेक जणांकडून प्रत्यक्षातही केला जात आहे. धुळे जिल्ह्यात पोलिसांनी एका मालमोटारीची तपासणी केली असता पुष्पातील आयडियाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. ते पाहून पोलीसही चक्रावले.

वाचा सविस्तर…

15:41 (IST) 20 Mar 2024
‘… अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील’; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा

पुणे : ‘विद्यापीठे, महाविद्यालयांनी गुणवत्ता, नवसंशोधनात सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील,’ असा इशारा राज्यपाल रमेश बैस यांनी दिला.

सविस्तर वाचा…

15:38 (IST) 20 Mar 2024
मलबार हिल जलाशयाचा तिढा कायम, तातडीच्या दुरुस्तीची माजी अभियंत्यांची मागणी

मुंबई : मलबार हिल जलाशयाचा अंतिम अहवाल सादर होऊन १० दिवस लोटले तरी याविषयी अद्याप पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. या जलाशयाचा प्रस्तावित पुनर्बांधणी प्रकल्प तातडीने सुरू करून कमीत कमी वेळेत पूर्ण करावा, अशी मागणी माजी अभियंत्याची संघटना असलेल्या मुंबई विकास समितीने केली आहे. तर या जलाशयाच्या पुनर्बांधणीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवाद्यांची बुधवारी (२० मार्च) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी खुली चर्चा होईल.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 20 Mar 2024
नवी मुंबई : पाण्याच्या टाकीचे प्लास्टर कोसळले, नव्या इमारतींच्या ब्लास्टिंगमुळे रहिवासी चिंतेत, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नवी मुंबई : सीवूड्स विभागात सेक्टर ४६ येथील सोसायटीमधील इमारत क्रमांक ७ च्या टाकीखालील टेरेसचा भाग मोठ्या प्रमाणात कोसळला.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 20 Mar 2024
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० आरोपींवर ‘मोक्का’

पिंपरी : भोसरीमधील उजगरे आणि वाकडमधील आहिरराव टोळ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 20 Mar 2024
आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

मुंबई : अवघ्या मुंबापुरीला हादरवणाऱ्या गोकुळ निवास अग्नितांडवाला मे २०२५ मध्ये १० वर्षे पूर्ण होत असून या दुर्घटनेतून बोध घेऊन केलेल्या उपाययोजना केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 20 Mar 2024
धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी महाविद्यालयातील तरुणीसह, कॅन्टीनमधील एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 20 Mar 2024
देशात यंदा साखर मुबलक ? जाणून घ्या, किती साखर उत्पादनांचा अंदाज

पुणे : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण ३३० लाख टनांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सुनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनात वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 20 Mar 2024
शिमग्याच्या तोंडावर ‘राजकीय बोंबा’… उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊन ठेपली तरी भंडारा-गोंदियात उमेदवाराचा पत्ताच नाही…

भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊन ठेपली मात्र उमेदवारचाच पत्ता नाही, अशी गत झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:55 (IST) 20 Mar 2024
अरे बापरे…! सर्वेक्षण ‘बर्ड फ्लू’चे करायला गेले अन् सापडले करोनाग्रस्त! कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? वाचा…

नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील बर्ड फ्लू संक्रमणाबाबतची पाहणी व सूक्ष्म अभ्यास करून अखेर केंद्रीय पथक सोमवारी दिल्लीला रवाना झाले. पथकाच्या सूचनेवरून ३ किलोमीटरपर्यंत महापालिकेकडून झालेल्या बर्ड फ्लूच्या सर्वेक्षणात बरेच करोनाग्रस्त आढळल्याने चिंता वाढली आहे.

वाचा सविस्तर…

12:38 (IST) 20 Mar 2024
पुणे विद्यापीठात ११ प्राध्यापकांकडे ४० पदांचा अतिरिक्त कार्यभार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासह विविध पदांचे कामकाज अतिरिक्त कार्यभाराने करावे लागत आहे. त्यातही ११ प्राध्यापकांकडे चाळीस पदांची जबाबदारी असून, चार प्राध्यापकांकडे पाचपेक्षा जास्त पदे आहेत.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 20 Mar 2024
अशोक चव्हाण – डॉ. माधव किन्हाळकर तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र!

नांदेड : १९९०च्या दशकात एकाचवेळी राज्यमंत्री झालेले अशोक चव्हाण आणि डॉ. माधव किन्हाळकर हे बालमित्र गेल्या दशकांतील राजकीय कटुता आणि त्यातून झालेल्या व महाराष्ट्रभर गाजलेल्या कायदेशीर लढाईनंतर तब्बल २५ वर्षांनी ‘राम-राम’ म्हणत एकाच पक्षात एका व्यासपीठावर आले आहेत.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 20 Mar 2024
प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटर हवा ? ग्राहकांना निवड करू देण्याची जनहित याचिकेद्वारे मागणी

मुंबई : स्मार्ट प्रीपेड वीज मीटरच्या सक्तीच्या वापराला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तसेच, प्रीपेड की पोस्टपेड वीज मीटरबाबतचा पर्याय निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 20 Mar 2024
मृतदेहाची अवहेलना! रस्त्यावरच दहन, गावात तणाव; जाणून घ्या सविस्तर…

बुलढाणा : रस्त्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करून दहन केल्याप्रकरणी धोडप ( तालुका चिखली) येथील ३५ गावकऱ्यांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

11:56 (IST) 20 Mar 2024
फास्टफूड, जंकफूड खाल्ल्याने वडील रागावले, संतापाच्या भरात मुलीने…

नागपूर : पिझ्झा, नुडल्स आणि मंच्युरियन खाल्ल्यामुळे वडिलांनी मुलीवर आरडाओरड केली. वडिलांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे एकुलत्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रतापनगर हद्दीतील खामला येथे घडली.

वाचा सविस्तर…

11:55 (IST) 20 Mar 2024
शीतपेयात गुंगीचे औषधी टाकून शिक्षिकेवर बलात्कार, फेसबुकवरुन मैत्री करणे भोवली

नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून शिक्षिकेने युवकावर विश्वास ठेवला. त्याला मित्र समजून त्याच्यासोबत एका नोकरीच्या मुलाखतीला गेली. मात्र, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत शिक्षिकेच्या शितपेयात गुंगीकारक औषधी मिसळून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मित्राविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 20 Mar 2024
सनदी लेखापाल परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 20 Mar 2024
Maharashtra Live News Updates: मनसे नेते संदीप देशपांडेंचं खोचक ट्वीट!

अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला व्हिडीओ मुख्य कलाकार अर्थातच “नॉटी राऊत” – संदीप देशपांडे</p>

11:34 (IST) 20 Mar 2024
पुणे : मागासवर्ग आयोगाचे “गरज सरो आणि वैद्य मरो”, मराठा सर्वेक्षणाचे मानधन देण्यास टाळाटाळ

पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागांत आठ दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. तालुका, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामपातळीवर जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी अशा दहा हजार ६२८ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 20 Mar 2024
“मौसम टूटना नहीं चाहिए, विकास…” मुनगंटीवार असं का म्हणाले?

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत जास्त वाघ असणाऱ्या ताडोबाचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. आता जिल्ह्यातील वाघांचे प्रतिनिधित्व करीत, ‘आम्ही मागास नाही’, अशी डरकाळी लोकसभेत फोडायची आहे, असा निर्धार व्यक्त करीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

वाचा सविस्तर…

11:10 (IST) 20 Mar 2024
सावधान! महिलांना मसाज व अन्य सेवा देण्यासाठी ‘जिगोलो’ बनण्याचे आमिष, सायबर गुन्हेगारांचा अफलातून फंडा

नागपूर : ‘जिगोलो’ बनण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका युवकाला जाळ्यात ओढले. सुंदर महिलांचे छायाचित्र पाठवून त्याच्याकडून साडेचार लाख रुपये उकळले. फसवणुकीचा हा नवा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला.

वाचा सविस्तर…

11:05 (IST) 20 Mar 2024
दोन ठिकाणी मतदान करण्याचा प्लॅन असेल, तर सावधान !

पुणे : जिल्हा निवडणूक शाखेकडून शहरासह जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवसांपूर्वीपर्यंत नाव नोंदविण्याची मुभा आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 20 Mar 2024
पाण्याचे दुर्भिक्ष, घटत्या लपण क्षेत्राने बिबट्या वारंवार नाशिक शहरात

नाशिक : मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात बिबट्याच्या मुक्त संचाराची घटना ताजी असतानाच सावरकरनगरच्या गोदा काठावरील आसारामबापू आश्रम परिसरात बिबट्या दिसला. माहिती मिळताच पोलिसांसह वन विभागाच्या पथकाने धाव घेतली. परिसरात भ्रमंती करणाऱ्या नागरिकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 20 Mar 2024
पुणे : प्रेम प्रकरणातून शाळकरी मुलाचा खून, सिंहगड परिसरातील मणेरवाडीतील घटना

पुणे : प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घेरा सिंहगड परिसरातील मणेरवाडीत घडली. याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोन शाळकरी मुलांना ताब्यात घेतले असून, प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलाचा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 20 Mar 2024
नाशिकमध्ये मराठी विरुद्ध अमराठी, व्यावसायिकांमध्ये धुसफूस, वादात मनसेची उडी

नाशिक : शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी साहित्य व दुरुस्तीच्या बाजारपेठेत परप्रांतीय आणि स्थानिक मराठी व्यावसायिकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. घाऊक आणि किरकोळ स्वरुपात साहित्य विकणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांनी भ्रमणध्वनी दुरुस्तीतही शिरकाव केल्यामुळे हे काम आधीपासून करणाऱ्या मराठी तरुणांच्या रोजगारावर गदा आल्याचा आरोप होत आहे.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 20 Mar 2024
रायगड मतदार जागृतीसाठी विद्यार्थी वेठीला ? जाणून घ्या काय आहे नेमक प्रकरण….

अलिबाग : मतदार जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून त्यावर पालकांच्या सह्या घेण्याचे फर्मान रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असतांना विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यास शाळा संस्था चालकांनी विरोध केला आहे.

सविस्तर वाचा…

10:59 (IST) 20 Mar 2024
ठाण्यात इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; तीन जण जखमी

ठाणे : कळवा येथील मफतलाल कंपनी परिसरात बुधवारी इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८), लाल बादशाह (६६) आणि मेहबूबी लाल बादशहा (५६) अशी जखमींची नावे आहेत.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 20 Mar 2024
तडसांना उमेदवारी अन पक्षांतर्गत कुरबुर, फडणवीस व बावनकुळे घेणार आज झाडाझडती

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून खासदार रामदास तडस यांच्याच नावाची पुन्हा घोषणा झाली. अन् पहिल्याच यादीत नाव आल्याबरोबर पक्षांतर्गत विरोधकांचा पोटशूळ उठल्याचे चित्र पुढे आले.

वाचा सविस्तर…

10:44 (IST) 20 Mar 2024
Maharashtra Live News Updates: राज ठाकरेंना अमित शाह यांनी ‘त्या’ प्रश्नाचं उत्तर दिलं असेल – संजय राऊत

राज ठाकरेंनी एका भाषणात पुलवामा हत्येमागचं रहस्य उघड केलं होतं. त्यात ते म्हणाले होते, की पुलवामा हत्याकांडाच्या आधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर पुलवामा हत्याकांड घडलं का? असा प्रश्न त्यांना पडला होता. कदाचित कालच्या भेटीमध्ये अमित शाह यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल – संजय राऊत</p>

10:37 (IST) 20 Mar 2024
Maharashtra Live News Updates: राज ठाकरे-अमित शाह भेटीवर संजय राऊतांचा टोला!

राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं आहे. त्यांच्या मनातल्या संवेदना व खंत इतर कुणाहीपेक्षा मला जास्त माहिती असतात. देशातलं स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक मोदी-शाहांच्या हातून कसं फासावर लटकवलं जातंय, हे सांगणारं एक उत्तम व्यंगचित्र त्यांनी काढलं होतं. ते मला खूप आवडलं होतं. त्यांनी व्यक्त केलेल्या त्या देशाच्या भावना होत्या. त्यामुळे काल त्यांची नक्कीच मोदी-शाहांशी त्यावर चर्चा झाली असेल – संजय राऊत</p>

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे

Maharashtra Live News Updates 20 March 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!