Maharashtra News Update : नाशिकमध्ये शिवसेनेचं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे-पाटील यांचा पायी मोर्चा पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. यासह महाराष्ट्रातील राजकीय, क्राइम आणि विविध घडामोडी जाणून घेणार आहोत….

Live Updates

Maharashtra News Live Today 23 January 2024 : महाराष्ट्रातील विविध घडामोडी एका क्लिकवर...

18:41 (IST) 23 Jan 2024
चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, काँग्रेस जिल्हाध्यक्षांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने  शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणांविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…

18:10 (IST) 23 Jan 2024
गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मीरा रोडमध्ये पालिकेची कारवाई, नयानगरमधील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात

मिरा रोड येथील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी पालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेनेही ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे. सविस्तर वाचा…

17:54 (IST) 23 Jan 2024
नागपूर: तलाठी भरतीमध्ये आताची मोठी अपडेट, गैरप्रकाराबाबत हा आहे नवा खुलासा

सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो. अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क २१४ गुण मिळाले आहेत. सविस्तर वाचा

17:52 (IST) 23 Jan 2024
नाशिक: शासकीय नोकर भरती एमपीएससीमार्फतच करावी; ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय शिबिरात ठराव

ओबीसींसह इतर कोणत्याही आरक्षणाला हात न लावता सकल मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता व महाराष्ट्र सरकारने कंत्राटी तत्वावर कर्मचारी भरतीसाठी काढलेली अधिसूचना रद्द करून सरकारी सेवेत कायमस्वरुपी नोकरीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती करावी सविस्तर वाचा

17:49 (IST) 23 Jan 2024
नागपुरात झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचा खर्च किती कोटींच्या घरात होता? जाणून घ्या

जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेससंदर्भात मोठी माहिती वर्षभरानंतर समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 23 Jan 2024
राष्ट्रवादीची भाजपशी वैचारिक नव्हे राजकीय युती – नायकवडी

आम्ही महायुतीत सहभागी असलो तरी सहभागी सर्वच पक्षांची आपली स्वतंत्र विचारधारा आहे, असे नायकवाडी यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

17:47 (IST) 23 Jan 2024
मराठा सर्वेक्षणात सरकारचा नाकर्तेपणा – जयंत पाटील

मनोज जरांगे पाटील सरकारच्या दारात येऊ लागताच सामाजिक सर्वेक्षणाचे सरकारने आदेश देणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 23 Jan 2024
लोणावळ्यातील पितापुत्राने साकारला मनोज जरांगे पाटील यांचा मेणाचा पुतळा

लोणावळ्यातील कार्ला येथे पितापुत्राच्या जोडीने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब मेणाचा पुतळा साकारला आहे.

सविस्तर वाचा...

17:43 (IST) 23 Jan 2024
जरांगे पाटील यांच्या दिंडी मोर्चासाठी मराठा संघटनांची नवी मुंबईत जय्यत तयारी

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेला दिंडी मोर्चा मुंबईत २६ जानेवारीला धडकणार असून २५ तारखेला मुंबई पूर्वी शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यासाठी नवी मुंबई समन्वयकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

वाचा सविस्तर...

16:57 (IST) 23 Jan 2024
नाशिक : पळवलेल्या बाळाचा चार तासात शोध; भिकारी महिलेविरुध्द गुन्हा

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी रामभक्तांमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेत संशयित महिलेने चोरलेले बाळ पोलिसांच्या तत्परतेने तीन ते चार तासांच्या आत परत मिळाले. या प्रकरणात एका भिकारी महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

16:54 (IST) 23 Jan 2024
डोंबिवलीत व्यापारी गाळ्यावरून भाजप ग्रामीण महिला अध्यक्षा सुहासिनी राणे यांना मारहाण

आमची मालकी असताना आम्हाला न विचारता व्यापारी गाळा का उघडला, असा प्रश्न करून डोंबिवली पू्र्वेतील पी ॲन्ड टी कॉलनी येथे पाच जणांनी भाजपच्या एक महिला पदाधिकारी आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत आरोपींनी महिलेचा विनयभंग केला.

वाचा सविस्तर...

16:43 (IST) 23 Jan 2024
प्रेमविवाहानंतर संसार तुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, तीन हजार प्रेमीयुगुलांनी घेतली भरोसा सेलची मदत

प्रेमविवाहास सर्वाधिक उत्सूकता तरुणीकडूनच दाखवल्या जाते. अनेक प्रकरणांमध्ये प्रियकर प्रेमविवाहास टाळाटाळ करतो तर युवती थेट घरातून पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दर्शवते.

सविस्तर वाचा...

16:15 (IST) 23 Jan 2024
"प्रभू श्री राम एकवचनी होते, पण...", सुषमा अंधारेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

"प्रभू श्री राम एकवचनी होते. पण, आशिष शेलार यांचा नेता ७२ तासांच्या आतमध्ये ७० हजार कोटींचा आरोप कोणावर केला? नंतर परत त्या नेत्याला बरोबर घेतात. हे कसले एकवचनी आहेत?" असा सवाल उपस्थित करत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

16:15 (IST) 23 Jan 2024
प्रजासत्ताकदिनाला शिवरायांच्या राज्यकारभारावर आधारित चित्ररथ, यवतमाळच्या पाटणबोरीत साकारली शिल्पकृती

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 23 Jan 2024
नागपूर : बलात्काराच्या आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, हुडकेश्वर पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत

नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष गेल्यामुळे दुर्घटना टळली.

वाचा सविस्तर...

15:42 (IST) 23 Jan 2024
नागपुरात दोन गुन्हेगार जेरबंद; दोन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 23 Jan 2024
तमिळ भाषिक सफाई कामगारांना मराठा सर्वेक्षणाचे काम

मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वाचा सविस्तर...

15:28 (IST) 23 Jan 2024
नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक

आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये युवा मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्याची सुधारित मतदार यादी जाहीर केली.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 23 Jan 2024
डोंबिवली जवळील विकासकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना जन्मठेप

डोंबिवली जवळील दावडी गावातील एका विकासकाची नऊ वर्षापूर्वी पैशाच्या वादातून चार जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील चार जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. आर. अस्तुरकर यांनी जन्मठेपेची आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सविस्तर वाचा…

14:55 (IST) 23 Jan 2024
VIDEO : “लोकसभा निवडणूक लढणार का?”… या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकही शब्द न बोलता दिली भन्नाट प्रतिक्रिया…

राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते निवडून येतील, असा विश्वास देखील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी चेन्नीथला यांनी यावेळी व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

14:49 (IST) 23 Jan 2024
मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात दाखल : समाजबांधवांना आवाहन करताना म्हणाले, 'मराठा समाजाला ओबीसीतूनच...'

मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून या लढाईसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबईत यावे आणि मराठा समाजाने आपल्यातील एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मराठा आरक्षण क्रांती योद्धे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केले. सविस्तर वाचा

14:23 (IST) 23 Jan 2024
"काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा, पण...", संभाजीराजेंचं विधान

"महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे. पण, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे," असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

14:16 (IST) 23 Jan 2024
कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा

बारावे गावातील एका तरूणाने प्रभू रामचंद्रांवर तयार करण्यात आलेल्या गाण्यात छेडछाड करून त्यामध्ये दोन समाजात धार्मिक तेढ-तणाव निर्माण होईल असे शब्द टाकले.

सविस्तर वाचा…

14:08 (IST) 23 Jan 2024
"काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा, पण...", संभाजीराजेंचं विधान

"महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे. पण, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे," असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

13:38 (IST) 23 Jan 2024
मीरा रोडमध्ये पोलिसांचा फौजफाटा, शहरात तणावपूर्ण शांतता

श्रीराम मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 23 Jan 2024
पुण्यात पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी १४ वर्षांपासून छत्तीसगड, गडचिरोलीत होता सक्रिय; मिलिंद तेलतुंबडेचा अंगरक्षक….

पुण्यात पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी संतोष शेलार उर्फ पेंटर दोन वर्षांपूर्वी चकमकीत ठार झालेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक होता.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 23 Jan 2024
पुण्यात तीन ठिकाणी आगीच्या घटना; लष्कर भागातील मॉडर्न डेअरीला फटाक्यांमुळे आग

पुणे : शहरात तीन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. लष्कर भागातील मॉडर्न डेअरीत सोमवारी रात्री आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. पाण्याचा मारा करून वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.

वाचा सविस्तर...

12:57 (IST) 23 Jan 2024
वसई : रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची ठोकर लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा...

12:36 (IST) 23 Jan 2024
"शिवराय जन्मले नसते, तर श्री राम मंदिर उभे राहिले नसते," उद्धव ठाकरेंचं विधान

"छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर श्री राम मंदिर उभे राहिले नसते. मोदी आज अयोध्येला गेले, त्याआधी गेले नव्हते," अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील अधिवेशनात केली आहे.

12:30 (IST) 23 Jan 2024
पुण्यातील काँग्रेसमध्ये मनोमिलन नाहीच?… स्नेहभोजनाचा बेत रद्द

पुणे : काँग्रेसमधील वाढती अंतर्गत गटबाजी, रुसवे आणि फुगव्यांसह आपापसातील मतभेद आगामी लोकसभा निवडणुकीत घातक ठरण्याची शक्यता असल्याने शहर पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले मंगळवारचे स्नेहभोजन रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

वाचा सविस्तर...

supreme court rahul narvekar uddhav thackeray

जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच, शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.<br />