बॉलिवूडचा ‘लेटेस्‍ट हार्टथ्रोब’ अभिनेता कार्तिक आर्यनचे सध्या वाईट दिवस सुरू झालेत असंच म्हणावं लागेल. सुरवातीला करण जोहरने कार्तिक आर्यनला त्याच्या ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या किंग खानच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘फ्रेडी’मधून बाहेर काढलं. त्यापाठोपाठ आता आणखी तिसऱ्या बड्या बजेटच्या चित्रपटातून सुद्धा कार्तिक आर्यनला आऊट करण्यात आलंय. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या हातून एका मागोमाग एक चित्रपट निसटत चालले आहेत.

फिल्‍ममेकर आनंद एल राय यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला एका अनटाइटल्‍ड गॅंगस्‍टर फिल्‍मसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र आता तो या चित्रपटाचा हिस्सा बनू शकणार नाही. या चित्रपटासाठी कार्तिकची फिल्ममेकर आनंद राय यांच्यासोबत शेवटच्या टप्प्यातील बातचीत सुरू होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकने वाचली होती. परंतू चित्रपट साईन करण्यापूर्वीच होत्याचं नव्हतं झालं. अभिनेता कार्तिकला या चित्रपटातून बाहे करण्यामागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. परंतू करण जोहरने कार्तिकला त्याच्या ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं त्यानंतर बॉलिवूडमधील इतर दिग्दर्शकांनी देखील त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचा हा तिसरा चित्रपट आहे ज्यातून त्याला बाहेर काढण्यात आलं.

कार्तिक आर्यन आणि फिल्ममेकर आनंद राय हे एकत्र एक फिल्म करणार असल्याचं गेल्या फेब्रूवारीमध्येच जाहीर केलं होतं. कित्येकदा तर कार्तिकला आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं.

कार्तिकच्या ऐवजी चित्रपटात आयुष्यमानची वर्णी ?
आनंद राय यांच्या चित्रपटातून कार्तिकला बाहेर करण्यात आल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेता आयुष्यमान खुरानाची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी आयुष्यमानच्या नावावर चर्चा सुरू केली आहे. यापुर्वी आनंद राय आणि आयुष्यमान खुराना यांनी एकत्र ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात काम केलेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन कार्तिकच्या जागी आयुष्यमान खुरानाचं नाव जरी जाहीर झालं तरी जास्त आश्चर्य वाटणार नाही.

कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढण्याचं काय आहे कारण ?
कार्तिक हा ‘दोस्ताना २’ आणि ‘फ्रेडी’ या चित्रपटाची स्क्रिप्ट बदण्यासाठी सांगत होतो म्हणून त्याला करण जोहर आणि शाहरूख खानने काढून टाकलं असल्याचं बोललं जातंय. परंतू हे दोन्ही चित्रपट साईन करताना कार्तिकने चित्रपटांच्या स्किप्टवर ना हरकत दर्शवली होती.