Deepika Padukone with Baby Girl Dua : अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तिचे फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. आई झाल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. ती कॉन्सर्टमध्ये दिलजीतच्या लोकप्रिय गाण्यांवर थिरकली होती. कॉन्सर्टनंतर आता दोन दिवसांनी दीपिका मुंबईला परत आली आहे.

दीपिका पादुकोण मागील बऱ्याच दिवसांपासून माहेरी होती. अखेर ती तिची लाडकी लेक दुआला घेऊन मुंबईला परतली आहे. मुंबईतील खासगी विमानतळावर ती लेक दुआला घेऊन पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. वूम्प्ला या पापाराझी अकाउंटवरून दीपिकाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत लाल रंगाचा ड्रेस घातलेली दीपिका लेकीला घेऊन कारमध्ये बसताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…

पाहा व्हिडीओ –

h

दीपिका व तिची लेक दुआ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहते व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत. या व्हिडीओत पहिल्यांदाच दुआ व दीपिका एकत्र दिसून आल्या.

हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले. दीपिकाने तीन महिन्यांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणवीर व दीपिका यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ पादुकोण सिंह असं ठेवलं आहे. दुआच्या नावाची घोषणा करताना दीपिकाने तिच्या पायांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच दीपिका लेकीला घेऊन प्रवास करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.