मुंबई : छटपूजा, दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जतात. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ९४४ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. आता आणखी १८२ रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छटपूजा, दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवरून एकूण १,१२६ विशेष रेल्वेगाड्या धावतील.

एका महिन्यावर दिवाळी येऊन ठेपली असून, प्रवाशांनी नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची तिकीटे आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवेत वाढ केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – सावंतवाडी रोड – एलटीटीदरम्यान आठ विशेष रेल्वेगाड्या धावतील.

गाडी क्रमांक ०११७९ एलटीटी – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी एलटीटी येथून सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री ९ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८० सावंतवाडी रोड – एलटीटी साप्ताहिक विशेष सेवा १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी सावंतवाडी रोड येथून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथे थांबा असेल.

एलटीटी – दानापूर द्विसाप्ताहिक विशेष ४० फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१०१७ रेल्वेगाडी २७ सप्टेंबर ते १ डिसेंबरपर्यंत प्रत्येक सोमवार आणि शनिवारी एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१८ रेल्वेगाडी २९ सप्टेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान प्रत्येक सोमवार आणि बुधवारी दानापूर येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहचेल.

विशेष फेऱ्या

  • एलटीटी – मऊ द्विसाप्ताहिक विशेष ४० फेऱ्या,
  • एलटीटी – बनारस द्विसाप्ताहिक विशेष ४० फेऱ्या,
  • एलटीटी – करीमनगर साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या,
  • एलटीटी – तिरुवनंतपूरम साप्ताहिक विशेष २० फेऱ्या,
  • पुणे – अमरावती साप्ताहिक विशेष १६ फेऱ्या,
  • पुणे – सांगानेर साप्ताहिक अतिजलद विशेष ६० फेऱ्या,
  • पुणे – गोरखपूर विशेष १३० फेऱ्या,
  • पुणे – हजरत निजामुद्दीन साप्ताहिक अतिजलद विशेष ५६ फेऱ्या,
  • कोल्हापूर – सीएसएमटी साप्ताहिक विशेष २० फेऱ्या,
  • लातूर – हडपसर विशेष ७४ फेऱ्या,
  • सीएसएमटी – गोरखपूर विशेष १३२ फेऱ्या,
  • दौंड – कलबुरगी विशेष १३६ फेऱ्या,
  • नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष २० फेऱ्या,
  • नागपूर – समस्तीपूर साप्ताहिक विशेष २० फेऱ्या,
  • एलटीटी – दानापूर दैनिक विशेष १३४ फेऱ्या,
  • एलटीटी – नागपूर साप्ताहिक अतिजलद विशेष २० फेऱ्या,
  • पुणे – दानापूर विशेष १३४ सेवा फेऱ्या,
  • एलटीटी – लातूर साप्ताहिक विशेष २० फेऱ्या.