भारताचा ग्रँड मास्टर गुकेशने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. झॅग्रेबमध्ये झालेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया २०२५ स्पर्धेत गुकेशने कार्लसनला रॅपिड अँड ब्लिट्झ प्रकारात हरवले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कार्लसनने गुकेशला कमजोर खेळाडू म्हटले होते, परंतु गुकेशने आपल्या खेळातून त्याला सडेतोड उत्तर दिले.