करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रानं २५ हजार कोटींचं विशेष पॅकेज मंजुर करावं, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2020 रोजी प्रकाशित
Coronavirus: करोनाला टाळण्यासाठी स्वत:हून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन घेऊ नका, ICMR चा सल्ला
करोनानं देशात अनेकांचा बळी घेतला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 01-04-2020 at 07:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in india lockdown all live update breaking news death infected numbers
निजामुद्दीनसारखे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मरकजमुळे करोनाचे रुग्ण वाढले. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात महाराष्ट्रातल्या विविध भागातले लोक या मरकजला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे मरकजसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रात कोणत्याही जाती, धर्माचे सण किंवा मेळावे होणार नाही याची काळजी घ्या, प्रसंगी मी स्वतः आयोजकांशी बोलेन असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. यावरच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगबाबतही चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची काय स्थिती आहे? काय उपाय योजता येऊ शकतात या संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
पुण्यात मागील 24 तासात तीन करोना बाधित रुग्ण आढळले. या तीन पैकी एकजण दिल्ली येथून आलेला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 26 जणांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून इतर व्यक्तींचा शोध सुरु आहे.
सध्या करोना व्हायरसवर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च करोनाची बाधा होऊ नये म्हणून हे औषध घेत आहेत. अशा लोकांना आयसीएमआरने पुन्हा एकदा सावधान केले आहे. सविस्तर बातमी वाचा.
करोना व्हायरस विरोधातील लढाईत लॉकडाउन एक महत्वाचा उपाय आहे. लॉकडाउनमुळे या व्हायरसचा मोठया प्रमाणावर होणारा फैलाव रोखता येतो. जगातील अनेक प्रमुख देशांनी करोना व्हायरसविरोधातील लढाईत हाच मार्ग अवलंबला आहे. भारतातही त्याचमुळे २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. पण शेजारच्या पाकिस्तानात अजूनही लॉकडाउन झालेले नाही. वाचा सविस्तर बातमी.
दिल्ली येथे झालेल्या सर निजामुद्दीन तब्लिगी ए जमातच्या धार्मिक संमेलनात 42 जणांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. यापैकी 28 जण हे रायगड जिल्ह्याबाहेरचे आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 14 जण या कार्यक्रमाला गेल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे. उरलेल्या 12 जणांची तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे. १४ रुग्ण मुंबईत तर १ रुग्ण बुलढाण्यात पॉझिटिव्ह आढळल्याने ३२० वरुन रुग्ण संख्या थेट ३३५ वर गेली आहे. करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. देशातली करोनाग्रस्तांची संख्या १६०० च्या वर गेली आहे. यामधले सर्वाधिक ३३५ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दहा वर पोहोचली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 41 रुग्णांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यापैकी 24 संशयित रुग्ण हे वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून16 संशयीत पालघर तालुक्यातील आहे.
मुंबईतले १९१ विभाग करोना प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागांमध्ये करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे भाग प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या भागांमध्ये नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच जे या भागांमध्ये राहतात त्यांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
करोनाने राज्यात थैमान घातलं असताना सर्व डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून सध्या रुग्णालयांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर तसंच आरोग्य क्षेत्रालील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारं एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या अशी विनंतीही केली आहे.
दिल्लीमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळल्याने कॅन्सर रुग्णालय बंद करण्याची वेळ आली आहे. हा डॉक्टर युकेवरुन आलेल्या आपल्या भावाची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेला होता. यावेळी त्याला करोनाची लागण झाली. डॉक्टरला करोनाची लागण झाल्याने रुग्णालय बंद करण्यात आलं आहे.
करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. सविस्तर बातमी वाचा.
करोना व्हायरसच्या रुग्णावर उपचार करताना, त्यांची काळजी घेताना कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हा त्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या सेवेचा आदर असेल असे केजरीवाल म्हणाले. वाचा सविस्तर बातमी.
दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील दोन रेसिडंट डॉक्टरांच्या करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
संपूर्ण जगासमोर आज करोना व्हायरसने आव्हान निर्माण केलं आहे. भारतात खासकरुन महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला आर्थिक मदतीची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. वाचा सविस्तर बातमी.
करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा काळ कदाचित वाढूही शकतो असेही संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. लोकांनी गर्दी केली नाही, बेजबाबदारपणे वागणं सोडलं नाही तर लॉकडाउन वाढूही शकतो. याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी आज मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक
विविध अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना लॉकडाऊनमधून सूट मिळावी यासाठी देण्यात आलेल्या भरमसाठ प्रवेशपत्रांमुळे गोंधळ वाढत असल्याचे चित्र आहे. उलट त्यामुळे रस्त्यांवर जास्त गर्दी व्हायला लागल्याने हे सर्व पास जप्त करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने आज (बुधवारी) घेतला. सविस्तर वृत्त वाचा
करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सोबतच अनेक सेलिब्रिटीही करोनाविषयीची जनजागृती करत आहेत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहनही करत आहेत. तसंच कलाकारांनी पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून आर्थिक मदतही केली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कलाकारांचे आभार मानले आहेत. पुढे वाचा ...
देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
करोनामुळे देशावर ओढावलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान केअर्स मदतनिधीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींना टॅग करुन मी केवळ ५०१ रुपयेच देऊ शकतो असं सांगत ऑनलाइन पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअऱ केला. त्यावर मोदींनी दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

करोना व्हायरसची लागण झालेल्यांवर प्रभावी उपचार करुन, त्या रुग्णांना लवकरात लवकर करोना मुक्त कसे करता येईल? यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. चीनमध्ये करोना व्हायरसवर एक नवीन उपचार पद्धती शोधून काढण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. भारतामध्येही २४ मार्च ते १४ एप्रिल अशी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याच लॉकडाउनदरम्यान व्हिडिओ कॉल करण्याचे प्रमाण प्रंचड वाढले आहे. याचा थेट फायदा एका नव्या अॅपला झाला असून या अॅपने व्हॉट्सअॅप, टीकटॉक आणि इन्स्ताग्रामसारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सला धोबीपछाड देत गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप म्हणून अव्वल क्रमांक पटकावला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
तेलंगणमधील एका काँग्रेसच्या नेत्याने पोलीस सामान्य नागरिकांना कशाप्रकारे मारहाण करत आहेत यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तीन जणांना पोलीस हवालदार काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. एक पोलीस मारहाण करत असताना दुसरा पोलीस अधिकारी मारहाण करण्यात येत असलेल्या व्यक्तीच्या हातावर पाय ठेऊन उभा असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे घरातील व्यक्तींसमोरच या लोकांना मारहाण करण्यात आली आहे. येथे क्लिक करुन पाहा व्हिडिओ
'इटली, अमेरिका, स्पेनमधील करोना बळींपासून धडा घेऊन जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं,' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. 'करोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने छोटया बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली बचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि रिकरींग डिपॉझिट खात्यांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी.
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील ९२ नागरिक सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्वांचा ठाव-ठिकाणा लागला असून यातील काही लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.
भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. त्यावर हरभजन आणि युवराज यांनी अशी काही कमेंट केली की त्यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले.
वाचा नक्की काय घडलं...
सध्या देशात करोनासारख्या आजारानं थैमान घातलं आहे. त्यातच सरकारकडूनही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण सध्या यावरूनही राजकारण तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं. तसंच दंडुका पडल्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही, असं संपादकीयमधून नमूद केलं होतं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी हल्लाबोल केला आहे. 'संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत,' असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संताप व्यक्त केला आहे. तबलिगी जमातच्या बेजबाबदार वागण्यामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्तार अब्बास नकवी यांनी टीका करताना तबलिगी जमातचा हा तालिबानी गुन्हा आहे. त्यांचा हा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही असं म्हटलं आहे.
"देशातील सरकारनं भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैर असलेलेच काही कट्टरपंथी मुस्लीम त्या निर्णयाला विरोध करत आहेत," असं वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्याद्वारे संदेश दिला आहे.
सुरेश रैनाने पंतप्रधान सहायता निधी (PM Cares Fund) मध्ये ३१ लाख तर उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची रक्कम दिली. करोनाविरोधातील लढ्यात आपण सर्वांनी आपल्याला जमेल तितकी रक्कम दान करावी असं रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी झकास रिप्लाय दिला.
वाचा सविस्तर - रैनाने दिला मदत निधी, त्यावर पंतप्रधान मोदी म्हणतात…
करोनाचा धोका वाढत असल्याने देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हे तुमच्या सुरक्षेसाठी असून या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका, कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यासंदर्भात एक पुस्तिका सरकारने ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे, यामधून हे आवाहन करण्यात आलं आहे. अधिक वृत्त वाचा
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात बाहेरील राज्यातील अनेक नागरिक मुंबईत अडकले आहेत. यात आंध्र प्रदेशमधील काही कुटुंबांचा समावेश असून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली असून मुख्यमंत्र्यांनीही मदत करु, असं आश्वासन दिलं आहे. पुढे वाचा ...
मंगळवारी रात्री ९ वाजता आणखी एका करोनाबाधीत व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या व्यक्तीच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या असून भोसरी येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, या व्यक्तीला दोन आठवडे होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शहरात आत्तापर्यंत १० जण करोनामुक्त झालेले आहेत, तर दोघांवर उपचार सुरू आहेत.
करोना व्हायरसचा आणखी एका कलाकाराला फटका बसला आहे. ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅक यांचा करोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी सर्रे या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. वाचा सविस्तर बातमी..
१८ मार्च रोजी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घऱी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्यानं त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. दरम्यान, या कार्यक्रमात सामिल झालेल्या बडोद्यातील पाच जणांना शोधण्यात यश मिळालं आहे.
सविस्तर वाचा -
जगातील इतर देशांप्रमाणेच रशियातील स्थिती करोनामुळे चिंताजनक बनत चालली आहे. रशियाच्या संसदेनं देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे अधिकार दिलेले असतानाच रशियाच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या आठवड्यात व्लादिमीर पुतीन यांना करोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात फिरवून माहिती देणाऱ्या डॉक्टरलाच करोनाचा संसर्ग झाला आहे. लक्षणं दिसून आल्यानंतर डॉक्टरची तपासणी करण्यात आली. यात त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांनी या व्हिडीओमध्ये करोनाचा गुणाकार समजावताना एक महत्त्वाचं उदाहरण दिलं आहे. लॉकडाउनदरम्यान एक व्यक्ती नियम मोडून मुंबईहून जुन्नरला आली. त्यानंत १७ मार्च रोजी ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यातच २७-२८ मार्चदरम्यान या व्यक्तीला करोना झाल्याचं आढळून आलं, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं आहे.
सविस्तर वाचा
पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेणारी एक महिला आणि भारती हॉस्पिटलमधील ४१ वर्षीय अंगणवाडी सेविका या महिलेची दुसरी करोना चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे. या दोघींना पुढील १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत पुण्यात ९ बाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.