वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतासाठी सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषविण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीने ६१ कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने ६० सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने २७ कसोटी सामन्यात विजय, तर १८ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दुसरीकडे कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने ३६ कसोटी सामन्यात विजय, तर १४ कसोटी सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाऊस आणि वातावरणाचा अंदाज घेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने हा निर्णय घेतला. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

‘लेडी सेहवाग’ शफाली वर्माचा पदार्पणाच्या कसोटीत धावांचा पाऊस!

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणला. साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्याचा राखीव दिवसही वापरला जाणार आहे. म्हणजे जर हवामान चांगले असेल तर सामना संपूर्ण पाच दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ खेळला जाईल.

“मिल्खा सिंग आमच्यासाठी काय होते, हे आमची पिढी कसं सांगणार?” आनंद महिंद्रांचं भावनिक ट्वीट!

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.