scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI: हार्दिक पांड्याने स्मिथला बाद करत रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसराच गोलंदाज

IND vs AUS 3rd ODI Updates:तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या दरम्यान हार्दिक पांड्याने स्टीव्ह स्मिथला बाद करत एक विक्रम केला आहे.

IND vs AUS 3rd ODI Match Updates
भारतीय संघ (फोटो-ट्विटर)

India vs Australia, Hardik Pandya: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि सामना खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताना २७० धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात हार्दिक पांड्याने स्टिव्ह स्मिथला गोल्डन डकवर बाद करत एक खास कारनामा केला आहे.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर बाद करून मोठा विक्रम केला आहे. खरं तर, आदिल रशीदनंतर पांड्या आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. चेपॉक येथील सामन्यात पंड्याने पहिल्याच चेंडूवर स्मिथला बाद केले. पांड्याच्या बाहेर जाणारा चेंडू खेळत असताना, चेंडू स्मिथच्या बॅटची बाहेरची किनार घेऊन यष्टिरक्षक केएल राहुलच्या हातात गेला.

या विकेटसह हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला वनडेत सर्वाधिक वेळा बाद करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. पंड्याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये स्मिथला पाच वेळा बाद केले आहे. दुसरीकडे, पांड्यापेक्षा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद याने स्मिथला वनडेत ६ वेळा आपला बळी बनवले आहे.

हेही वाचा – IND vs PAK : ‘मला बदला घ्यायचा आहे…’ २०११च्या आठवणींना उजाळा देताना शोएब अख्तरने केले मोठं वक्तव्य

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६१ धावांची भर घातली. मात्र, हेड ३३ धावा करून बाद झाला. मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधआर), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या