Maharashtra Budget Session, 23 March 2023: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणातून महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर परखड भाष्य केलं. त्यांनी केलेल्या आरोपांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!
ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्याच्या आधीही तिथे इतर पक्षांचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाच आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं. ठीक आहे. जसं स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्षं कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते. तर मग अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल – उद्धव ठाकरे
गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता. – राज ठाकरेंच्या भाषणावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
राज्यस्तरीय न्यायालयीन प्रकरणे, करोना टाळेबंदी व विविध कारणामुळे प्रलंबित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश मंगळवारी २१ मार्चला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला धडकला आहे
नागपूर : नामिबिया येथून आणलेल्या ‘एल्टन’ आणि ‘फ्रेडी’ या दोन चित्त्यांना बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील खुल्या जंगलात सोडण्यात आले. यापूर्वी ‘ओबान’ आणि ‘आशा’ या दोन चित्त्यांना सोडण्यात आले होते. कुनोतील वनरक्षक आणि इतर वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने चित्त्यांवर नजर ठेवली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुय्यम कर्जाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्यात येत आहे.
धुळे: गुंगीकारक आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधांचा साठा केल्याने तीन जणांविरूद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत औषधांसह ९८ हजार ७०० रुपयांची सामग्री जप्त केली आहे.
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा जलबोगदा ठाणे शहरातील किसननगर भागातून जात असून याठिकाणी बोरवेल खोदकामामुळे जलबोगद्याला गळली लागली आहे. पाच महिने उलटूनही या दुरुस्तीच्या कामामुळे दुर्लक्ष केले जात असून यामुळे दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वर्धा : शिवसेना सोडून दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोक शिंदे यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसची विचारसरणी आदर्श आहे, मात्र नेते नालायक आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले असून, मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे : पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाकडून ही सेवा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. असे असले तरी दोन्ही शहरांना जोडणारे एवढे पर्याय असताना थेट विमानसेवा का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याचबरोबर या विमानांच्या वेळेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबई आणि पुणे विमानतळांवरील उड्डाणांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असून, या थेट विमानसेवेमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. 'टीसीओसी' च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.
नाशिक : मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यास होणारे दहा फायदे सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी मांडले आहेत. सकल हिंदू समाजातर्फे येथे बुधवारी सायंकाळी आयोजित हिंदू हुंकार सभेत चव्हाणके यांच्यासह इतरही संत, महंतांनी मार्गदर्शन केले.
‘दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेतील महावीर मेट्रो स्थानक - पॅगोडादरम्यान रोप-वे बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.
ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्याच्या आधीही तिथे इतर पक्षांचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाच आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं. ठीक आहे. जसं स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्षं कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते. तर मग अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल - उद्धव ठाकरे
गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता. - राज ठाकरेंच्या भाषणावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
उरण: खारकोपर ते उरण रेल्वे मार्गवरील रेल्वेने दिलेल्या रांजणपाडा स्थानकाला धुतुम नाव द्या या मागणीसाठी गुरुवारी धुतुम ग्रामस्थांनी स्थानकात मोर्चा काढला. रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून खारकोपर ते उरण रेल्वेचे काम सुरू आहे. मात्र येथील स्थानिक व महसूल गावाच्या हद्दी ऐवजी इतर गावांची नावे देण्यात आली आहेत.
मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीतील कोकरूड पोलिसांनी नोंदवलेल्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळण्याचा इस्लामपूर सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला.
जर ही जोडे मारायची पद्धत सुरू झाली, तर उद्या अजून कुणाच्या फोटोला जोडे मारले, तर आम्हालाही ते पटणार नाही. विधिमंडळाच्या परिसरात अशा प्रकारे राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याचं काम झालंय. कोणत्याही विधानसभा वा परिषदेच्या सदस्यांकडून असं कृत्य घडू नये यासाठी अध्यक्षांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पावलं उचलायला हवीत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. रस्त्यावर कोण काय करतं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण विधिमंडळ परिसरात असं घडता कामा नये - अजित पवार
पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हाट्स ऍप'वरून संशयास्पद संदेश पाठविल्या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे चार वाजता 'एनआयए'च्या पथकाने नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात छापा घातला.
राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. यावर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केलं.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावेळी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न द्या असं म्हटलं होतं, त्या भूमिकेवर तुम्ही अजून ठाम आहात का? असा सवाल संजय शिरसाट यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला असून भद्रावती तालुक्यात मांगली या गावातील जगन्नाथ बाबा मठ येथे दानपेटी चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना आजी माजी नेत्यांनी घेरले. तेव्हा काही खास वगळता कोणीही त्यांच्या बाजूने जोरकस बाजू मांडत नसल्याचे चित्र राज्याने पाहले. पक्ष विरहित समाजकारण करणारे तर दूरच.या पार्श्वभूमीवर सदैव आंदोलनाच्या भूमिकेत राहणाऱ्या युवा परिवर्तन या स्वयंसेवी संघटनेने ठाकरे समर्थनार्थ यात्राच काढली आहे.
माहीममधील बांधकामावर कारवाई ही उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी उचललेलं पाऊल होतं, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज ठाकरेंचं महत्त्व वाढलं तर आपोआप उद्धव ठाकरेंचं महत्त्व कमी होईल, या गणितातून हे सगळं चाललंय, असा दावाही जलील यांनी केला आहे.
सांगली: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील वादग्रस्त प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर जागेबाबत प्रांत कार्यालयामध्ये बैठक सुरु आहे.
माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई करून हटवले. पोलीस बंदोबस्तात आणि पालिकेच्या पथकाची मदत घेऊन ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.
डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गुरुवारी सकाळी मिलापनगर, सुदर्शननगर मधील अनेक सोसायट्या, बंगल्यांना पाणी न आल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
शौचालयात चप्पल घालून जाण्यावरून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांच्या गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन कैद्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.जिल्हा कारागृहात मंगळवारी शुल्लक कारणावरून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली.
भारतात दरवर्षी १.५० लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. महाराष्ट्राचा देशात रस्ते अपघातात तिसरा क्रमांक लागतो. राज्यात दरवर्षी जवळपास १५ हजार लोकांना जीव गमवावा लागत आहे.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. "संबंधित मंत्री मला वर पायऱ्यांवर भेटले", असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यापाठोपाठ दीपक केसरकरांनी आपली बैठक असल्याचं कळवल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यावर "तुम्हीच त्यांना सवलत देत आहात", असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!