Maharashtra Marathi News, 31 Oct 2022 : अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता या दोघांमधील वाद मिटणार की आणखी चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याच्या उद्देशाने तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रात थंडी अवतरली असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याने कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

Live Updates

Maharashtra Marathi News : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

19:29 (IST) 31 Oct 2022
“माझ्याशी समोरासमोर चर्चेला या,” आदित्य ठाकरेंचं पत्रकार परिषदेतून CM एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच वाढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

सविस्तर बातमी

18:38 (IST) 31 Oct 2022
“तुम्ही त्यांचं नाव सांगाच,” आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “दादागिरी फक्त…”

महाराष्ट्रात उद्योगासाठी योग्य वातावरण नाही असं टाटाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून त्या अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करण्यास सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अंबादास दानवे उपस्थित होते.

सविस्तर बातमी

17:24 (IST) 31 Oct 2022
चंद्रपूर: आठ वर्षात देशाची नाही, तर केवळ ‘गुजरात’ची उभारणी; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका म्हणाले “महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्य…”

जनतेने नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मात्र, आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी गुजरात राष्ट्राची उभारणी केली. पूर्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मेट्रो शहरांमध्येच व्हायचे. आता ते केवळ गुजरातमध्येच होतात. देशातील उद्योजकांवर प्रचंड दबाव असल्याने आज उद्योग गुजरात या एकमेव राज्यात जात आहेत.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 31 Oct 2022
पुणे: अकोले येथे किसान सभेचे राज्य अधिवेशन सुरू; ओला दुष्काळप्रश्नी तीव्र आंदोलनाचे नियोजन करणार

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे आज, सोमवारपासून अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ.जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून २३ जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

सविस्तर वाचा

15:33 (IST) 31 Oct 2022
ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळविल्याचा आरोप करत ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ठाणे नगर पोलिस हा पुतळा जप्त करीत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 31 Oct 2022
पहाटे गारवा, दुपारी मात्र घामाच्या धारा; मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर

परतीच्या पावसाला जाण्यास विलंब लागल्याने ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, ऑक्टोबर अखेरीस मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३५.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा केंद्राने सरासरी ३४.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले आहे.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 31 Oct 2022
‘कॅग’ चौकशीवरून आमदार प्रसाद लाड यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्र; म्हणाले, “मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी…”

करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सविस्तर वाचा –

13:59 (IST) 31 Oct 2022
MIDC भूखंडांत सुभाष देसाईंनी कोट्यवधींचा ‘मलिदा’ खाल्ला आणि उद्धव ठाकरेंनाही पोहचवला – रवी राणांचा गंभीर आरोप!

आपल्या विविध वक्तव्यांमुळे काय चर्चेत राहणारे बडनेराचे आमदार आमदार रवी राणा यांनी आता आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. रवी राणा यांनी राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुभाष देसाईंनी एमआयडीसीच्या भूखंडांमध्ये कोट्यवधींचा मलिदा खाल्ला आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनाही पोहचवला असल्याचे रवी राणा यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:49 (IST) 31 Oct 2022
पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजा उत्साहात, इंद्रायणी नदी घाटावर शेकडो भाविकांची गर्दी

पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व हे परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरे केले. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फा शेकडो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करत व्रत जोपासले.

सविस्तर वाचा…

13:29 (IST) 31 Oct 2022
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

मागील तीन महिन्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबससह तब्बल २२ प्रकल्प हे महाराष्ट्रामधून गुजरातसह इतर राज्यात गेल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मामलेदार कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 31 Oct 2022
नागपूर : शिक्षक आमदार निवडणूकीत काँग्रेस शब्द पाळणार का?

नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीला बारा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आसलेला शिक्षक मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि शिक्षक भारतीमध्ये छुपी युती झाल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 31 Oct 2022
“वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय; मला वाटतं पंतप्रधानांनी…” ; राज ठाकरेंच विधान!

राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. शिवाय पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं जात आहे. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीका-टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:18 (IST) 31 Oct 2022
शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांच्या दिलीगिरीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मागील अनेक दिवसांपासून अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटलेला होता. अखेर त्यांच्या या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली.. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता या दोघांमधील वाद मिटणार की आणखी चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज सकाळी आमदार रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांसमोर बच्चू कडूंवर ५० खोक्यांच्या केलेल्या आरोपाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र अद्याप बच्चू कडू यांनी या दिलगिरीवर नेमकी काय भूमिका घेणार हे जाहीर केलेले नाही. वाचा सविस्तर बातमी…

13:14 (IST) 31 Oct 2022
कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश

कळवा येथील मनिषानगर भागातील विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने व पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेला रूम बंद करण्यात आला असून, संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा

13:11 (IST) 31 Oct 2022
पूनम महाजन यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; भाजप नेत्यांनाही टोले

शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, असे वक्तव्य करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व माझीही लायकी नसल्याचे नमूद करत भाजप खासदार पूनम महाजन यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला. त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती, असे सांगून पूनम महाजन यांनी ज्येष्ठ भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 31 Oct 2022
नव्या वर्षात मुंबईत दोन मेट्रो मार्ग पुर्ण क्षमतेने, मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार असून हा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे दहिसर ते अंधेरी आणि दहिसर ते डी.एन.नगर असा थेट प्रवास मेट्रोने करण्यासाठी मुंबईकरांना जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सविस्तर वाचा

13:10 (IST) 31 Oct 2022
कल्याण डोंबिवली पालिका आक्रमक, कचरा विलगीकरण न केल्यास नागरिक, दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी घनकचरा विभागाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. यापुढे नागरिकांनी कचरा ओला, सुका करुन न ठेवल्यास, दुकानदार, फेरीवाल्यांनी उघड्यावर कचरा फेकल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 31 Oct 2022
मुंबई पालिकेची ‘कॅग’कडून चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती ‘कॅग’ने मान्य केली आहे. यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सत्ताधारी पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

12:44 (IST) 31 Oct 2022
“रस्ता आमच्या मालकीचा”, डोंबिवली रेल्वे स्थानकावर रिक्षा चालकांचा उर्मटपणा

डोंबिवली पश्चिम विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्या समोरील रेल्वे प्रवेशव्दारावर रिक्षा आडव्या लावून अनेक रिक्षा चालक दररोज सकाळी ते रात्री उशिरापर्यंत प्रवासी वाहतूक करतात. महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहन कोंडी होते. प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाताना अडथळे येत आहेत.

सविस्तर वाचा

11:57 (IST) 31 Oct 2022
नागपूर : नवीन संसद भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन नाव द्या – इंद्रेश गजभिये

नवीन संसद भवनाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जावे यासाठी या भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन असे नाव द्यावे, अशी मागणी डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री इंद्रेश गजभिये यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 31 Oct 2022
मुंबईः श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पवई पोलिसांनी २८ वर्षीय तरूणाला शनिवारी अखेर अटक केली. त्याच्याविरोधात अनैसर्गिक लैगिंक अत्याचार व प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वाचा

11:02 (IST) 31 Oct 2022
‘दोन जिवांचा नाहक बळी..’; पिंपरी पालिकेचा बेजबाबदार कारभार

दापोडीत भिंत पडून ठार झालेली वयोवृद्ध महिला आणि कासारवाडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेला दोन वर्षांचा मुलगा, या दोन स्वतंत्र ठिकाणी झालेल्या घटनांची महापालिकेने गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दापोडीत स्नेहलता गायकवाड (वय ६२) यांचा घराजवळीत भिंत अंगावर कोसळून काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

10:44 (IST) 31 Oct 2022
पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा

केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले सोमवारी (३१ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. कासारवाडी येथील ‘कलासागर’ हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी पक्षाच्या प्रदेश महिला आघाडीच्या वतीने राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 31 Oct 2022
पुणे राज्यात सर्वांत थंड; ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील दुसरे नीचांकी तापमान

मोसमी पाऊस माघारी फिरताच अवतरलेल्या थंडीचा कडाका पुणे शहरामध्ये वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत सातत्याने रात्रीच्या किमान तापमानाचा नीचांक नोंदविला जात असतानाच शहरात रविवारी (३० ऑक्टोबर) संपूर्ण राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुण्याची रात्र महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरली.

सविस्तर वाचा

10:28 (IST) 31 Oct 2022
Morbi Bridge Collapsed: मृतांची संख्या १३२ वर, १७७ जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य अद्यापही सुरु

गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. १०० वर्षं जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतून १७७ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:27 (IST) 31 Oct 2022
Morbi Bridge: ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय कंत्राटदाराकडून पूल पर्यटकांसाठी खुला, ‘ओरेवा’ समुहावर कारवाई होणार?

गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत १३२ हून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. या भीषण घटनेबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मच्छू नदीवरील हा पूल जवळपास सात महिन्यांआधी दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑक्टोबरला हा पूल मोरबी नगरपालिकेच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

सविस्तर बातमी वाचा…

10:26 (IST) 31 Oct 2022
Gujarat Bridge Collapsed: “काही तरुण मुद्दाम पूल हलवत होते, मग आम्ही…”, दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती

गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला.

सविस्तर बातमी वाचा…

10:18 (IST) 31 Oct 2022
पोलीस भरतीच्या निकषांमध्ये बदल? ; सर्व समाजघटकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न

करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील अधिकाधिक तरुणांचा समावेश करण्याच्या उद्देशाने तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. वाचा सविस्तर बातमी…

10:17 (IST) 31 Oct 2022
बच्चू कडू-रवी राणा वादावर CM एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य, म्हणाले “कुठेतरी २७ कोटी पकडले तर…”

अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. मात्र अद्यापही या वादावर तोडगा निघाला नसून वाद कायम असल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना या वादावर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:16 (IST) 31 Oct 2022
राज्यात थंडीचा मुक्काम ; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात अधिक गारवा

र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रात थंडी अवतरली असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याने कमी-अधिक प्रमाणात गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर बातमी…

र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रात थंडी अवतरली असली, तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्या भागांत पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.