Mumbai Maharashtra Today : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( २ ऑक्टोबर ) समोर आली. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासह राज्यातील विविध बातम्या जाणून घेणार आहोत…




Maharashtra Live News in Marathi : महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर…
‘बायको नामधारी, नवरा कारभारी’ ही म्हण लोकप्रतिनिधी स्त्रियांबद्दल हेटाळणीनं वापरली जाते. ग्रामीण भागातील पदांबाबत- विशेषत: महिला सरपंचपदाबाबत त्याचा आजवर अनेकदा उल्लेख झालेला दिसतो.
पनवेल: मागील चार दिवसांपासून पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणा-यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी मालडबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर येजा करणा-या हजारो प्रवासी अन्नपाण्याविना राहीले.
नाशिक – देवळाली कॅम्पजवळील नानेगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी बिबट्या जेरबंद झाला. नानेगावातील भवानी नगरमधील मनोहर शिंदे यांच्या शेतात बिबट्या आठवडाभर मुक्तपणे फिरत होता. बिबट्या वारंवार दिसत असल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती. सर्वांनाच जीव मुठीत घेवून काम करावे लागत होते.
नवी मुंबई: एपीएमसीमध्ये लिंबाची आवक कमी झाल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झालेली आहे. किरकोळीत ३ रुपयांना मिळणारे लिंबू आता ५ रुपयांना मिळत आहेत.
‘भाजपच अकोला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट चालवतो. जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या इशाऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे कार्य सुरू असते,’ असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
बुलढाणा: बुलढाणा सायबर पोलिसांनी चमकदार कामगिरी करीत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना दिल्ली येथून ताब्यात घेतले.
जिल्ह्यात १५७ कोतवाल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उच्च शिक्षित बेरोजगार देखील पुढे सरसावले आहे. बेरोजगारीची गंभीर समस्या व आकर्षक मानधनामुळे अंतिम मुदतीत मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची चिन्हे आहे
आठवडाभापूर्वी शहरातील महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर अचानक दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मध्यप्रदेशातून तस्करी होत असलयाचे पुन्हा एकदा उघड झाले असून शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर कंटेनर चालकासह ९० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सविस्तर वाचा…
वसई विरार महापालिकेतर्फे रस्त्यावरील गटारांना बसविण्यात येणारी झाकणे दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली आहेत. या झाकणांवर पालिकेचे नाव आहे. ही झाकणे दुकानात विक्रीला कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेने मात्र या झाकणांचा गैरवापर होत नसल्याचे सांगितले आहे. सविस्तर वाचा…
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची कामे करण्याऐवजी पालिकेच्या बांधकाम विभागातील चार अभियंत्यांनी विदेशी पर्यटन केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासनाला अंधारात ठेवत काहींनी वैद्यकीय रजेचे कारण देऊन हे विदेशी पर्यटन केल्याचीही चर्चा आहे. सविस्तर वाचा…
येथील पूर्व भागातील फडके रस्त्यावर चप्पल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याला एका व्यक्तीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. ‘चोरा’ अशी हाक मारल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
डोंबिवली: येथील यशराज कला मंचतर्फे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येथील पश्चिमेतील आधारवाडी तुरुंगाच्या तिन्ही बाजुने दोन वर्षापासून अधिक संख्येने बेकायदा बांधकामे वाढत आहेत. यामुळे तुरुंगाच्या सुरक्षितेतेला धोका निर्माण झाला आहे. ही बेकायदा बांधकामे तोडून टाकावी, अशी मागणी आधारवाडी तुरुंग प्रशासनाकडून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडे दोन वर्षांपासून केली जात आहे. सविस्तर वाचा…
पिंपरी – चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक केला असून त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर हत्येचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिक : मित्रांसोबत गावतळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे घडली. समाधान कोकाटे (१५) असे या मुलाचे नाव आहे. अवनखेड येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत समाधान शिक्षण घेत होता. मित्रांसोबत तो वाघदेवनगर वस्तीलगतच्या गावतळ्यावर पोहण्यासाठी गेला असताना पाण्यात उतरल्यानंतर अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वसई – वसई विरार शहरात रविवारी मोठा गाजावाजा करून एक तारीख एक तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नेत्यांपासून अधिकार्यापर्यंत सर्वांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही करवून घेतले. मात्र हे अभियान संपताच शहराची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आली. जागोजागी कचर्याचे ढिग पडलेले. यामुळे हे अभियान दिखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुणे : राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतरही सिटी टास्क फोर्स स्थापन न झाल्याने राज्य शासनाने महापालिकेला स्मरणपत्र पाठविले आहे.
जिल्ह्यातील एका नामांकित निवासी शाळेत आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. परंतु येथे मुलींना दररोज जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. जेवणात शिळे अन्न व भाजी ऐवजी चटणी दिली जात असल्याने विद्यार्थिनींनी भाजी मागितली म्हणून चक्क मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
आज, ३ ऑक्टोबर मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्यानं नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अजित पवार यांची तब्येत ठिक नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. वेगवेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पुणे: ऑनलाइन ॲपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. सविस्तर वाचा…
नाशिक – स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य शासन यांच्यातर्फे येथे मायटेक्स्पो २०२३ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात वेगवेगळ्या आस्थापनांचे तीनशेहून अधिक दालन राहणार आहेत. सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रदर्शनाची तयारी पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल.
नाशिक – सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. मौजे पांगरी येथील शेतकरी जनावरांना चारा व पाणी मिळावे ही मागणी घेऊन पांगरी येथे आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले होते. भुसे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन सोहळ्यात ध्वनिवर्धक, ढोल-ताशांचा दणदणाट झाला. सलग ३८ तासांपेक्षा जास्त वेळ ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि ढोल-पथकांच्या दणदणाटाला सामोरे गेलेल्या पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मंडळांवरील कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.
उरण: सप्टेंबर अखेरला रानसई धरणातील पाणीसाठा कायम असल्याने येत्या एप्रिल २०२४ पर्यंत पुरवठा करता येईल इतका साठा आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी चिंता मिटली आहे.
मुंबई : किमान १८ हजार रुपये वेतन, भविष्य निर्वाहनिधी आणि निवृत्तीवेतन यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेविकांना दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील चार हजार आरोग्य सेविकांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे: पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचवेळी केवळ वेळ घालवण्यासाठी मेट्रो स्थानकात येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही… अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!”, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुणे शहरातील १५ पैकी जेमतेम तीन ई-टाॅयलेट सुरू आहेत. मात्र, सुरू असलेल्या स्वच्छतागृहांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे : गणेशोत्सवानंतर दोन दिवसांत मंडप, कमानी काढण्याच्या हमीवर परवानगी घेतलेल्या सार्वजनिक मंडळांचे मंडप, कमानी आणि विसर्जन मिरवणुकीतील रथ रस्त्यावरच उभे आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, त्याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यास सुरुवात झाली आहे.
अमरावती: वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतातील तारांच्या कुंपणामध्ये जिवंत विद्युत प्रवाहित केल्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो.
कवींना कधी काय सुचेल सांगता येत नाही. म्हणूच ‘ जो ना देखे रवी, ओ देखे कवी!’ ही म्हण अस्तित्वात आली असावी. त्यामूळेच सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले आहे. या निर्णयाविरोधात सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शासनाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यात राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळा दत्तक देण्याचे घोषित केले.
हुंड्यासाठी विवाहितेचा झळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी विवाहितेने पतीपासून घटस्फोट घेत हुंड्यासाठी पती, सासू व सासऱ्यांनी छळ केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई: गव्हाणफाटा वाहतुक शाखेच्या – हददीतील चिरनेर फाटा ते दिघोडा या मार्गावरील चिरनेर ब्रिज हा धोकादायक झाला आहे. सदर ब्रिजचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे.
मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला. लहान मुलगी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसींच्या मागण्यांसाठी २० दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सरकारला ओबीसींच्या मागण्या मान्य करायला लावणारे टोंगे नेमके आहेत तरी कोण, ते काय करतात, याबाबत जाणून घेण्यास तुम्हालाही उत्सुकता असेलच.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज सोलापुरातील मोहोळमध्ये धनगर समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्याच्या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात.
कराड : पुण्याच्या खडकवासला परिसरातील बिबट्याच्या शिकारप्रकरणी वन विभागाने कराड शेजारील ओगलेवाडी-हजारमाची येथे संशयिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे यासह अन्य साहित्य मिळून आले.
उरण: न्हावा शिवडी सागरी (पारबंदर) पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सर्वात नजीकचे उपनगर म्हणून उरणच्या विकासाला वेग येणार आहे.
डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मिलापनगर भागातील एक बंगल्याच्या शेजारी विजेचा एक खांब गंजला आहे.
“नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली….!,” असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
बुलढाणा : शेतातील दैनंदिन कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पाईपातून फुस्स आवाज आला अन त्याची बोबडी वळली! भयभीत झालेल्या कास्तकाराने मग धावा केल्यावर घटनास्थळी आलेल्या ‘श्रीराम’ ने त्यांना संकटमुक्त केले.
देशभरासह राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कल्याण: महादेव कोळी अनुसूचित जमातीचे बनावट जात प्रमाणपत्र पालिकेत दाखल करुन त्या आधारे नोकरी मिळविणारे कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिसंख्य पदावरील (कंत्राटी) चार कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) साठी विविध विषयांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. शुल्क २९ ऑक्टोबरपर्यंत जमा केले जाईल.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. कधी रिमझिम पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कडक ऊन पडतं असल्याने सर्दी, ताप, खोकल्यासह साथरोग बळावले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे.
ठाणे: महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी केली जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
"वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील," असं विधान खासदार सुप्रिया सुळे केलं आहे.