scorecardresearch
Live

Entertainment News Live : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Entertainment News Updates : मनोरंजन क्षेत्रातील अनेक महत्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

Entertainment News Live in Marathi, Bollywood big breaking in Marathi
Entertainment News Marathi Headlines , Entertainment News Live in Marathi

Entertainment News Live Updates 14 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या सीमा सचदेवा आणि सोहेल खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. तर या चित्रपटावरुन राजकारण रंगण्यासही सुरुवात झाली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी यावरुन टीका केली आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या आगामी ‘विक्रम’ या चित्रपटातील ‘पत्थला पत्थाला या गाण्याद्वारे केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates

Entertainment News Headlines: चित्रपट, मालिकासह आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी

19:42 (IST) 14 May 2022
“यावर तुझं नियंत्रण नाही…” लेक सुहानासाठी शाहरुखनं लिहिलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच दिग्दर्शक झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लोकप्रिय कॉमिक बुक ‘द आर्चीज’चं देसी व्हर्जन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

16:54 (IST) 14 May 2022

Photos: 'छोटी बहू'ची गोवा टूर, स्विमिंग पूलमधील बिकिनी लूक व्हायरल

'बिग बॉस १४'च्या पर्वाची विजेती 'छोटी बहू' फेम अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.

पाहा फोटो

16:53 (IST) 14 May 2022
“पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी एकटी पडले होते अन्…” मुमताज यांचा धक्कादायक खुलासा

एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चर्चेत होत्या. अलिकडेच त्या रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आपण एका गंभीर आजाराशी लढा देत आहेत. पण आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत त्यांनी स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

14:55 (IST) 14 May 2022
“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

14:53 (IST) 14 May 2022
‘धर्मवीर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

14:26 (IST) 14 May 2022
“मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही…” रणवीर सिंगचं टीकाकारांना सडेतोड उत्तर

रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. सोशल मीडियावरही या दोघांचं अनेकदा कौतुक होताना दिसतं तसेच त्यांचा पोस्ट देखील व्हायरल होताना दिसतात. पण त्यासोबतच या दोघांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13:57 (IST) 14 May 2022

Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीची ऑस्ट्रेलिया सफर; फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पाहा खास फोटो

13:56 (IST) 14 May 2022

Photos: एकनाथ शिंदे पुन्हा एकदा झाले ‘आनंद दिघें’चे सारथी; थेट बुलेटवरुन घेतली एन्ट्री

बहुप्रतीक्षित 'धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट १३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

पाहा फोटो

13:38 (IST) 14 May 2022
Video: सुहाना खानच्या डेब्यू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13:00 (IST) 14 May 2022
“हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा सीन व्हायरल

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासोबतच चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यात झालेला संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12:58 (IST) 14 May 2022
बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. काल १३ मे रोजी ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद दिघे यांचं कुटूंब राजकारणात सक्रिय नाही असे म्हटले आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यसाठी येथे क्लिक करा

12:54 (IST) 14 May 2022
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा झाले ‘आनंद दिघें’चे सारथी; थेट बुलेटवरुन घेतली एन्ट्री

बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. काल (१३ मे) रोजी ठाण्यात या चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास लोकग्रहास्तव चित्रपटामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याच्यासोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेतली.

सर्व फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

12:52 (IST) 14 May 2022
हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव निघाले ‘छुपेरुस्तम’? काय आहे नेमकी भानगड?

लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही प्रांतात मुशाफिरी करत अभिनेते हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांनी आजवर प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले आहे. सध्या मात्र नाट्यवर्तुळात हे दोघेही छुपे रूस्तम असल्याची चर्चा रंगली आहे? या दोघांना छुपे रूस्तम का म्हटंल जातय? नेमकी कोणती भानगड या दोघांनी केली आहे? या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे रोजी होणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12:50 (IST) 14 May 2022
दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांचा 'विक्रम' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटातील एका गाण्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. या चित्रपटातील 'पत्थला पत्थाला' या गाण्याचे बोल वादग्रस्त असून यामुळे केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली जात आहे, अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12:47 (IST) 14 May 2022
“मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केलं…” जेव्हा सोहेल खानबद्दल बोलली होती सीमा सचदेवा

सीमा सचदेवा आणि सोहेल खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. दरम्यान सीमा खाननं ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ शोच्या एका एपिसोडमध्ये सोहेल खानसोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12:46 (IST) 14 May 2022
मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीसोबतचा पहिला फोटो

‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही नुकतंच आई बनली आहे. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. नुकतंच मिनाक्षीने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

 

Web Title: Entertainment news live updates manoranjan news marathi cinema bollywood hollywood news today 14 may

ताज्या बातम्या