बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान पठाण या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. या चित्रपटाचा टीझर २ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुखला पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. पण, अभिनेता कमाल आर खानने शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच खूप खराब असणार असे घोषित केले आहे.
केआरकेने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाविषयी ट्वीट केले आहे. यात केआरके म्हणाला, “आता अक्कीच्या देशभक्तीचे भूत एसआरकेवरही चढले आहे, त्यामुळे आता शाहरुख देश वाचवणार. तुम्ही गंमत करत आहात का? जर शाहरुखला देशाची सुरक्षा करायची आहे तर त्याने थिटरमध्ये हे खोटं ज्ञान देण्यापेक्षा सीमेवर जाऊन चिनी सैन्याशी लढावे.”
आणखी वाचा : आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’, नागराज मंजुळेंची स्तुती करत म्हणाला…
शाहरुखला ट्रोल होताना पाहून त्याच्या चाहत्याने केआरकेला ट्रोल केले आहे. “तू खूप नकारात्मक व्यक्ती आहेस. पठाण प्रदर्शित झाल्यावर तुमचा रिव्ह्यू नकारात्मक असेल पण हा चित्रपट ३०० कोटींचा गल्ला करेल. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडेल. फक्त थोडी प्रतिक्षा करा,” असे तो चाहता केआरकेला म्हणाला.
आणखी वाचा : पुष्पाची एण्ट्री होताच श्रेयस तळपदेला आली चक्कर, पाहा Video
यावर उत्तर देत केआरकेने आणखी एक ट्वीट केले आहे. “गेल्या ९ वर्षांपासून शाहरुखचे भक्त हेच सांगत आहेत आणि शाहरुख एका पाठोपाठ एक वाईट चित्रपट देत आहे. यावेळीही काही वेगळे होणार नाही. ‘पठाण’ हा आणखी एक चित्रपट आहे जो डब्यात जाणार.”
आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य
शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. सिद्धार्थ यांनी या आधी ‘वॉर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात शाहरुख एका रॉ एजेंटची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.