पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास अपुरा पोहोचल्याबद्दल इंग्रज व काही स्वकीयांना दोष दिला. त्यांनी बाजीरावांच्या युद्धनीतीचे दाखले दिले आणि मराठा नायकांवर अन्याय झाल्याचं सांगितलं. मोदींच्या नेतृत्वात इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.