पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबरोबर ‘सरदार जी ३’ चित्रपटात काम केल्याने दिलजीत दोसांझवर टीका झाली. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीतला पाठिंबा देत फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्यांनी स्पष्ट केले की, ही पोस्ट त्यांनी डिलीट केलेली नाही. शाह यांनी दिलजीतच्या बाजूने उभे राहत, त्याच्यावर होणाऱ्या आरोपांना विरोध केला. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.