Maharashtra Politics Updates महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे. मात्र अद्याप याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं. मुंबईत भाजपाची बैठक होईल या बैठकीनंतर इतर चर्चा होऊन निर्णय होईल असं सांगितलं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जे मिळेल ते त्यांना पदरात पाडून घ्यावं लागणार आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यासह सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली नजर आजच्या ब्लॉगमधून असणार आहे.
Maharashtra Breaking News Live Updates मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग
वसईत एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
वसई- वसई विरार शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहे. शुक्रवारी वसईत दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या इसमांनी रस्त्यावरून चालणार्या महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पळ काढला आहे. या दोन्ही प्रकरणात वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: पतीने केली प्रेयसीची हत्या; पत्नीने आणि मेहुण्याने मृतदेहाची लावली विल्हेवाट
पिंपरी-चिंचवडमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेप्रकरणी आरोपी दिनेश ठोंबरे याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
Kashedi tunnel : बंद करण्यात आलेला कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला
दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर बोगदा भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन व एल अँड टी प्रशासनाकडून कशेडी बोगदा मार्गे शनिवारी दुपारी अडीज वाजताच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र बोगदा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
पुणे: गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रुईयात ‘वारसा महाराष्ट्राचा : प्रवाह आणि संधी‘ प्रमाणपत्र अभ्यासक्रम
मुंबई : महाराष्ट्राला ऐतिहासिक वारशाची समृद्ध व वैभवशाली परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा हाच मूर्त व अमूर्त वारसा, त्याचा इतिहास, त्यातील नवीन प्रवाह आदी विविध गोष्टींबाबत सखोल माहिती देणारा ‘वारसा महाराष्ट्राचा : प्रवाह आणि संधी’ (हेरिटेज ऑफ महाराष्ट्र : ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या रुईया प्रोफेशनल डेव्हलपमेंट सेंटर आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे.
नागपूर: रानडुकराने धडक दिल्यानंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली.
Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया शिवशाही बस अपघात : मृतकांची संख्या ११, आणखी वाढण्याची शक्यता
गोंदिया : सडक/अर्जुनी, कोहमारा मार्गे गोंदियाला जात असलेल्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या ११ वर गेली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने घवघवीत यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करतील. मात्र, या यशानंतरही जिल्हा भाजपमध्ये सत्तासंघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. मंत्रिपदी वर्णी आणि संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
Paithani thief arrested Yeola : येवल्यात पैठणी चोरणारा ताब्यात
नाशिक - येवला येथील लक्कडकोट पैठणी दुकान फोडून पैठणींसह साड्यांची चोरी करणाऱ्यास १२ तासाच्या आत पोलिसांनी गजाआड केले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी सामानाचा वाहतुकीला अडथळा
डोंबिवली : येथील पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील नवीन रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर अनेक दिवसांपासून वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्यावर लोखंडी खांब, लोखंडी पट्ट्या आणून ठेवण्यात आहेत. रिक्षा उभ्या करण्याच्या ठिकाणी हे सामान ठेवण्यात आल्याने रिक्षा चालक आणि प्रवाशांची याठिकाणी घुसमट होत आहे.
कल्याण पूर्व टाटा नाका येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
कल्याण : कल्याण पूर्व येथील आडिवली ढोकळी भागातील रहिवासी असलेल्या दोन अल्पवयीन मुली रविवारी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका येथून बेपत्ता झाल्या आहेत. या दोन्ही मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार या मुलींच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या मुलींचा शोध सुरू केला आहे.
ठाण्यात अल्पवयीन मुली वेश्याव्यवसात
ठाणे : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींना फूस लावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये दोन महिलांचा सामावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून एक अल्पवयीन मुलगी आणि आठ महिलांची सुटका केली आहे.
गोंदियात एसटी बस उलटून मोठा अपघात, आठ मृतदेह बाहेर काढले
विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. इतरही प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट घासत गेली. या घटने बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतलं आहे. मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
मुंबई: शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दहा वर्षांच्या दोन, तर १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली.
विमानतळबाधितांच्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण, सरकार आणि सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष
navi mumbai international airport : उरण : वारंवार आंदोलन अर्ज, चर्चा करूनही नवी मुंबई विमानतळ बाधितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ७ ऑक्टोबरपासून प्रकल्पग्रस्तांनी सिडको कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण झाले आहेत.
nd studio ‘एन डी’ स्टुडिओचा ताबा अखेर शासनाकडे; महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाकडे व्यवस्थापनाची जबाबदारी
मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ अखेर शासनाच्या ताब्यात आला आहे. या स्टुडिओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोरेगाव येथील चित्रनगरीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.
नवी मुंबईत ५२७ धोकादायक इमारती
navi mumbai municipal corporation : नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहरात ५२७ धोकादायक इमारती असून ३१ मार्च २०२५ पूर्वी या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करुन अहवाल पालिकेला सादर करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे संबंधित इमारतीमधील नागरीकांना करण्यात आले आहे.
तोतया पोलिसांकडून डोंबिवली पलावातील सेवानिवृत्ताची ७४ लाखाची फसवणूक
डोंबिवली : आपल्या आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून अन्य इसमाने काही गैरव्यवहार केले आहेत. आपण ऑनलाईन मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमवले आहेत. आपण गुन्हेगार आहात, अशा धमक्या देत मुंबईतून बोलणाऱ्या दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या एका ६९ वर्षाच्या सेवानिवृत्ताची ७४ लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
कळवा-खारेगावातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन प्रारुप विकास आराखड्याच्या माध्यमातून कळवा-खारेगाव भागातील अधिकृत जुन्या इमारतींचा पुनर्विकास रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केला.
देवेंद्र फडणवीस सुडाचं राजकारण करणार नाहीत अशी अपेक्षा-विजय वडेट्टीवार
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीने आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग गेला सात आठ वर्षात पूर्ण झाला नाही, आता अपेक्षा आहेत्यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट जा कुबड्या आहेत त्या फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस सुडाचं राजकारण करणार नाहीत अशी अपेक्षा आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नागपूर: अपघातग्रस्त बस, पीयूसी केंद्राची नोंदणी रद्द…'आरटीओ'कडून…
नागपूर : सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी अपघातग्रस्त बस आणि या बसला नियमबाह्य पीयूसी देणाऱ्या केंद्राची नोंदणी रद्द करण्याबाबत गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नोटीस बजावण्यात आली.
वाढते प्रदूषण आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या आसपास होणारे बांधकाम यामुळे प्रामुख्याने डोंबिवली येथील विविध ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची यंदाही संख्या कमीच आढळून आली आहे.
जळगाव : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा जवळपास सुटलेला असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात माजी गुलाबराव पाटील यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत.
लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष मोबाइलचा बेसुमार वापर; मैदानी खेळांचा कंटाळा
मुंबई : मोबाइलचा बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रूची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टिदोष (मायोपिया) निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे.
खारघर, सीवूडसारख्या उपनगरात सिडकोने उभारलेली आणि गेल्या दहा वर्षांपासून विक्रिविना पडून असलेली घरे विकली जावीत यासाठी सिडकोने घरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर, डॉ. अतुल भोसले यांच्या मंत्रिपदासाठी अभिषेक
कराड : भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागावी आणि ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी कराडमधील प्रसिध्द श्री रत्नेश्वरास भाजप कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला. कराडच्या कृष्णाबाई घाटावरील श्री रत्नेश्वर मंदिरातील या अभिषेक विधीस भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रणजित शिंदे, अजित शिंदे, संजय शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलाही उपस्थित होत्या.
नवी मुंबई : पुरेशी रहदारी नसतानाही नवी मुंबईत काही आडवाटेला असलेल्या चौकांच्या परिसरातील रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे हाती घेत वादात सापडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पावसाळा संपला तरी बऱ्याचशा चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज हंगामातील सर्वात थंड दिवस बदलापुरात सर्वात कमी ११.९ अंश सेल्सिअसची नोंद
बदलापूर : शुक्रवार हा यंदाच्या हिवाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. शुक्रवारी बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास बदलापुरात ११.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
सावधान ! सरकारी पाहुणे येत आहेत, सरबराईच्या तयारीला लागा …
नागपूर : राज्यात महायुतला प्रचंड बहुमत मिळाल्यावरही त्यांना मागील चार दिवसांपासून मुख्यमंत्री ठरवता आला नाही. दिल्ली-मुंबईत बैठकांवर बैठका सुरू आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाशी आहे. या सर्व धावपळीतही नागपुरात अधिवेशनाच्या तयारीने गती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे बंगले यांची देखभाल दुरुस्ती सुरू झाली आहे. ज्या भागात अधिवेशन होणार आहे त्या सिव्हील लाईन्सकडे जाणारे सर्व रस्ते गुळगुळीत केले जात आहे.
तलाक, तलाक, तलाक… म्हणत पत्नीला घराबाहेर काढले महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ठाणे : भिवंडी येथे तिहेरी तलाकचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका व्यक्तीने तीन वेळा ‘तलाक’ म्हणत त्याच्या पत्नीला घराबाहेर काढले. या घटनेनंतर महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे.