News Flash

‘चुलबुल पांडे’ला घरी घेऊन गेलो तर आई कानशिलात लगावेल, सलमान खानचा खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने हे सांगितले आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा उद्या १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानची पोलिस अधिकाऱ्याची सगळ्यात गाजलेली भूमिका म्हणजेच ‘दबंग’ या चित्रपटातील चुलबुल पांडे. तर, सलमानला विश्वास आहे की जर तो खऱ्या आयुष्यात या भूमिके सारखा असता तर त्याच्या आई-वडिलांनी त्याला मारले असते.

नुकतीच सलमानने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत यावर चर्चा केली. “अजुनही कोणता चित्रपट पाहिला की त्यात असलेल्या हीरोसारखे व्हायची माझी इच्छा होते. त्या हीरोने केलेल्या चांगल्या कामांमुळे मी इतका प्रभावित होतो की मला त्या भूमिकेला घरी घेऊन जाण्याची इच्छा होते. अगदी मी करतो त्या चित्रपटातील भूमिका देखील. चुलबुल हे एक पात्र आहे, पण त्या पात्राला घरी घेऊन जाऊ शकत नाही. राधे देखील एक पात्र आहे, पण मी त्यांच्यासारखा वागू शकतं नाही. मी माझ्या घरी आई-वडिलांसमोर चुलबुल पांडे सारखा फिरु शकतं नाही, असं केलं तर माझे वडील मला मारतील आणि आई कानशिलात लगावेल, तर भाऊ-बहिणीला लाज वाटेल. म्हणून मी घरी फक्त एक मुलगा आणि भावासारखाच वागतो,” असं सलमान म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानची ‘दबंग’ या चित्रपटातील चुलबुलची भूमिका प्रचंड लोकप्रिय आहे. त्यावर तो म्हणाला, “मी रोमॅंटिक, अॅक्शन सारख्या कोणत्याच भूमिका घरी घेऊन जाऊ शकतं नाही. मला माहित आहे की हे सगळं माझ्यात नाही. मी काय करु शकतो आणि माझी क्षमता काय आहे हे मला माहित आहे, परंतु या भूमिकेतील चांगल्या गोष्टी मी माझ्यासोबत नक्कीच घेऊन जाऊ शकतो.”

आणखी वाचा : देवीचा फोटो असलेले कपडे परिधान केल्याने प्रियांका ट्रोल

दरम्यान, ‘राधे’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. तर ज्या ठिकाणी करोनामुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत तिथे हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:57 pm

Web Title: my dad would hit me my mom would slap me if i behave like chulbul pandey at home says salman khan dcp 98
Next Stories
1 ‘मोदीजी पुढचे आणखी १० वर्ष पंतप्रधान रहावेत, कारण मला भक्तांना…’, अभिनेत्याचं देवाला साकडे
2 घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद ; राखी सावंतच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
3 लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता २’ ; पुन्हा अंकिता लोखंडे बनणार अर्चना देशमुख
Just Now!
X