Mumbai Pune Nagpur News Updates : डॉ. प्रीती अदाणी यांनी वर्ध्यामधील सावंगी येथे सहज भेट देण्याची ईच्छा दर्शविली. तेव्हा, असे सहज येण्यापेक्षा कार्यक्रमास या अशी विनंती मेघे समूहाने केल्याचे समजले. म्हणून आता विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहचे औचित्य साधून त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. डॉ. प्रिती अदानी मंगळवारी येणार म्हणून आजपासून मेघे विद्यापीठ परिसर हाय अलर्टवर मोडवर आला आहे. डॉ. प्रिती यांना झेड सेक्युरिटी कव्हर आहे.  तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळांवर, कसा पाहता येईल याबाबतची माहिती तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 05 May 2025

20:14 (IST) 5 May 2025

वाशीमच्या मिताली काबराला ९९ टक्के गुण; राज्यात टॉपर? अमरावती विभागात वाशीम जिल्हा अव्वल

९७.०५ टक्के मुली, तर ९४.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ...वाचा सविस्तर
20:04 (IST) 5 May 2025

विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती

समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क, आवश्यक ते समुपदेशन करणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
20:00 (IST) 5 May 2025

वाढत्या वायुप्रदुषणामुळे बालदम्याच्या रुग्णांमध्ये वाढ ! जागतिक दमा दिन - ६ मे

दमा हा हवामानातील बदल, श्वसन संसर्गांमुळे होऊ शकतो, परंतु वायू प्रदूषणासारखे पर्यावरणीय घटक देखील यास तितकेच कारणीभूत ठरत आहेत. ...सविस्तर वाचा
19:19 (IST) 5 May 2025

मुंबईच्या निकालात काकणभर वाढ, विभागाचा निकाल ९२.९३ टक्के

मुंबई पश्चिम उपनगरने ९३.१८ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. पश्चिम उपनगरातील ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...सविस्तर बातमी
19:19 (IST) 5 May 2025

‘हाऊस अरेस्ट’च्या एजाज खानवर आणखी एक गुन्हा; स्पर्धक अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप

हाऊस अरेस्ट मधील अश्लील कृत्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी त्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 5 May 2025

दहिसर ते काशीगावदरम्यान पहिल्यांदाच धावणार मेट्रो; शनिवारी विद्युत प्रवाह कार्यन्वित होणार, त्यानंतर गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार

हा विद्युत प्रवाह कार्यान्वित झाल्यानंतर चार-पाच दिवसांत या मार्गिकेवर मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता लवकरच दहिसर ते काशीगावदरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावणार आहे. ...अधिक वाचा
19:18 (IST) 5 May 2025

मुंबईत तूर्तास पाणीकपात नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

धरणांमध्ये उपलब्ध असलेला २२.६६ टक्के पाणीसाठा येत्या ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे नियोजन पालिकेच्या जल अभियंता विभागाने केले आहे. ...सविस्तर वाचा
19:09 (IST) 5 May 2025

VIDIO : बुलढाण्यात अवकाळीचे थैमान, वीज पडून जनावरे ठार; गारपीट पावसाने वऱ्हाड्यांची दैना

पावसाच्या तुलनेत वाऱ्याचा वेग जास्त होता. या दरम्यान बीबी व लगतच्या गावात बोरी एवढ्या आकाराच्या गार पडल्या. ...सविस्तर बातमी
19:04 (IST) 5 May 2025

चंद्रपूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ४.७२ टक्क्यांनी घसरला; यंदाही मुली अव्वल

उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी ९८.३७ तर मुलांची ९७.३३ टक्के आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.८८ टक्के लागला आहे. ...वाचा सविस्तर
18:38 (IST) 5 May 2025

भंडारा जिल्ह्यात पुन्हा मुलींची बाजी

भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध करत विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक आणि तांत्रिक अशा पाचही विद्या शाखांमधून एकत्रित पहिल्या तिन्ही स्थानांवर त्यांच्या विद्यार्थिनींनी त्यांचे नाव कोरले. ...सविस्तर वाचा
18:17 (IST) 5 May 2025

शंभर टक्के निकाल असलेली महाविद्यालये किती? काहींचा तर शून्य…

बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. अमरावती विभागातील २८३ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...सविस्तर बातमी
18:04 (IST) 5 May 2025

नागपूरकर डॉक्टरकडून संयुक्त अरब अमिरातीत अवयवदान जनजागृतीचा जागर… डॉ. अभय पांडे…

नागपूरकर असलेले व येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शिकलेल्या डॉ. अभय पांडे यांच्याकडून संयुक्त अरब अमिरात (यू. ए. ई.) येथेही नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अवयवदानव जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जात आहे. ...सविस्तर वाचा
17:45 (IST) 5 May 2025

वयाच्या पन्नाशीनंतर अंधत्व, कर्णबधिरतेचा धोका कशामुळे?

वयाच्या ५० ते ६० वर्षात दिव्यांगत्वाचा धोका वाढतो. या वयातील कोणत्याही व्यक्तीला अंधत्व, कर्णबधिरता, कम्पवात, स्मृतीभ्रंश ही समस्या असेल तर त्यांनी ती माहिती सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येणाऱ्या महापालिकेच्या आशा सेविकांना द्यावी, असे आवाहन नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
17:09 (IST) 5 May 2025

ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर ‘फुले’ चित्रपटास नागपुरात झुंबड

या चित्रपटात ब्राह्मणांची प्रतिमा मलिन केल्याचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला होता. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. ...सविस्तर वाचा
16:47 (IST) 5 May 2025

महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा परिणाम, आज गारपीट

मागील आठवड्यापासूनच राज्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात पाऊसच नाही तर वादळीवारा आणि गारपिटीचा फटका देखील बसला आहे. विदर्भातही वेगवेगळ्या ठिकाणी वादळीवारा आणि गारपीटीचा फटका बसला आहे. ...वाचा सविस्तर
16:39 (IST) 5 May 2025

बारावीचा निकाल जाहीर, मात्र जिल्हानिहाय माहिती अभावी शाळांमध्ये गोंधळ ; "एनआयसी" च्या वेबसाईटवर डाटाच नाही….

जिल्हा निहाय एकूण परीक्षार्थींची संख्या, उत्तीर्णांची टक्केवारी, टॉपर विद्यार्थ्यांची यादी, विषयवार आणि लिंगनिहाय निकाल, ती माहिती अद्याप उपलब्ध न झाल्याने अनेक शाळांना निकालाचे विश्लेषण करण्यात अडचणी आल्या. ...सविस्तर बातमी
16:33 (IST) 5 May 2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन रांगेत चोरी, दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड

माधुरी संतोष डुकरे-घाडगे (वय ३०), काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. यवत रेल्वे फाटकाजवळ, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ...वाचा सविस्तर
16:30 (IST) 5 May 2025

विदर्भाचा सिंचन अनुशेष कधी भरणार? १२७ मंजूर सिंचन प्रकल्पांपैकी केवळ…

वनक्षेत्रात सिंचन प्रकल्प राबवण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वनविभागाची मंजुरी आवश्यक असते, मात्र ही परवानगी न मिळाल्यामुळे आतापर्यंत मंजूर प्रकल्पांपैकी केवळ ४६ प्रकल्प पूर्ण करता आले आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल शपथपत्रात दिली. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 5 May 2025

संरक्षण राज्यमंत्री समकक्ष दर्जाप्राप्त सैन्याधिकारी, करणार डी.एससी पदवी प्रदान यांना …

दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉ. आरती सरीन भारताच्या सर्जन अँडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. ...सविस्तर बातमी
16:24 (IST) 5 May 2025

'कॉपी मुक्त' अभियान: बुलढाणा जिल्हा विभागात द्वितीय, ९५ टक्के निकाल

इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने ९५. १८ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला  आहे ...अधिक वाचा
16:12 (IST) 5 May 2025

मुलुंडमध्ये भरधाव मोटारगाडीची सहा ते सात वाहनांना धडक

भरधाव वेगात असलेल्या एका मोटारगाडीने सहा ते सात वाहनांना जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. ...अधिक वाचा
16:07 (IST) 5 May 2025

नोकरीची संधी……कृषी विद्यापीठातील पदभरतीला दुसऱ्यांदा मुदतवाढ….गट क व ड संवर्गातील ६८० पदांसाठी आता…..

राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क आणि ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे त्याच कृषी विद्यापीठातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिली. ...अधिक वाचा
16:07 (IST) 5 May 2025

पुणे: घरकामास ठेवलेल्या महिलेकडून २६ लाखांचे दागिने लंपास, बाणेरमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्ग यांनी आरोपी स्नेहल फाळके घरकामास ठेवले आहे. ...वाचा सविस्तर
15:56 (IST) 5 May 2025

पीओपी मूर्तींना परवानगी देणे शक्य, विशेष समितीच्या शिफारशींचा दाखला देत सरकारचा दावा, शिफारशींबाबत निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे सीपीसीबीला आदेश

पीओपी मूर्तींवरील बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी यावर न्यायालयाने यापूर्वी भर दिला होता. तसेच, नागरिकांनी मातीपासून तयार केलेल्या मूर्ती खरेदी करण्याची इच्छाशक्ती बाळगली पाहिजे. ...सविस्तर बातमी
15:48 (IST) 5 May 2025

राज्यमंत्र्यांची सासूरवाडीत बॅटिंग…..मनसोक्त चेंडू टोलवत..

सालेकसात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर जयस्वाल यांनी उद्घाटन सामन्यातील खेळाडूंची ओळख केल्यानंतर पहिला सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात उतरत क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. ...सविस्तर वाचा
15:43 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीचा निकाल यंदा का घटला?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागला. ...सविस्तर बातमी
15:02 (IST) 5 May 2025

बारावीच्या निकालात दरवर्षी मुले मागे का पडत आहेत? यंदा किती घट झाली बघा…

नागपूर विभागाच्या निकालात २०२३-२४ मध्ये मुलांची टक्केवारी ८९.८५ टक्के होती ती यंदा ८७.४१ टक्के झाली आहे. म्हणजे मुलांच्या निकालात २.४ टक्क्यांनी घट झाली आहे. ...वाचा सविस्तर
14:20 (IST) 5 May 2025

लग्नसराईत सोन्याचे दर घटत असतांनाच वाढली चिंता… हे आहे आजचे दर…

नागपूरसह सर्वत्र हल्ली लग्नसराईसह इतरही कार्यक्रमाची रेलचेल वाढली आहे. या कार्यक्रमासाठी अनेक कुटंबात सोने- चांदीचे दागिने खरेदी केले जात असल्याने हल्ली सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी आहे ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 5 May 2025

अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९१.४३ टक्के…उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात जे स्थान मिळाले ते बघून तर…

निकालाच्या टक्केवारीत विभागात गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही वाशीम जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.६६ टक्के, बुलढाणा ९५.१८, अमरावती ९१.०५, यवतमाळ ९०.६३ तर अकोला जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ८४.२८ टक्के लागला आहे. ...सविस्तर वाचा
13:47 (IST) 5 May 2025

डॉ. प्रीती अदाणी येणार, देशी- विदेशी सुरक्षारक्षकांनी घेरले मेघे विद्यापीठास

डॉ. प्रीती गौतम अदाणी वर्धेसारख्या छोटया गावात येणार म्हटल्याने भुवया उंचावणारच. ...सविस्तर बातमी

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे