scorecardresearch

Premium

Ganesh Visarjan 2023 : मुंबई-पुण्यात अजूनही मिरवणूक चालूच, गणेशभक्तांचा उत्साह कायम!

Mumbai Ganesh Visarjan 2023 Live : गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

lalbaugcha raja visarjan
लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर!

Maharashtra Anant Chaturdashi Live Updates, 29 September 2023 : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

youth lured a young woman
नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…
Fear of alienating importers regarding onion exports
कांदा निर्यातविषयक धरसोड वृत्तीने आयातदार दुरावण्याची भीती
Factory owners of Kolhapur and Sangli district will pay Rs 100 from last season says Hasan Mushrif
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मागील हंगामातील १०० रुपये देणार – हसन मुश्रीफ
Sindhi refugees in Sion Koliwada
सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास!
Live Updates

Mumbai Pune Konkan Maharashtra Ganpati Visarjan 2023 Live Updates : गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

07:53 (IST) 29 Sep 2023
२० तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक, थोड्याच वेळात होणार विसर्जन

“ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात काल (२८ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजा अद्यापही मिरवणुकीतही आहे. गेल्या २० तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असून आता थोड्याच वेळात राजाचे विसर्जन होईल. दरम्यान, समुद्राला भरती नसल्याने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपतीही रांगेत आहेत. त्यामुळे समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजासह सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन होईल.

23:56 (IST) 28 Sep 2023
मुंबई-पुण्यातील गणपतींचं विसर्जन, लालबागच्या राजासाठी भाविकांची गर्दी

भाविकांच्या भक्तीत आणि पावसाच्या सरींमध्ये न्हाऊन निघत मुंबई-पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपतींचं विसर्जन झालं आहे. तर, लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईतील रस्त्यांवरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना झाली आहे. लालबागच्या राजाची मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू असते. त्यामुळे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती विसर्जित झाल्यानंतर त्या मंडळाचे गणपती लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सामिल होतात. परिणामी, क्षणोक्षणी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी गर्दी वाढत आहे. तसंच, पावसाचीही रिमझिम सुरू आहे. दुसरीकडे गिरगाव चौपाटीवरही गर्दी वाढत आहे. त्यामुळे पहाटेपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर जल्लोष पाहायला मिळणार आहे.

23:45 (IST) 28 Sep 2023

https://x.com/mieknathshinde/status/1707453072971333678?s=20

22:33 (IST) 28 Sep 2023
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट मार्फत विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ठरलेल्या नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपामधून मिरवणुकीला सुरुवात झाली. सविस्तर वाचा

20:56 (IST) 28 Sep 2023
कोयता गँगचा बिमोड…गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट देखावाच साकारला!

गेल्या काही महिन्यांत पुण्यात कोयता गँगची मोठी चर्चा आहे. अनेक कोयता गँगवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. याच कोयता गँगचे प्रतिबिंब गणेश विसर्जन मिरवणुकीतही उमटले असून, वैभव मित्र मंडळाने कोयता गँग बाबत जनजागृतीपर देखावा साकारला आहे.

सविस्तर वाचा…

20:42 (IST) 28 Sep 2023
Ganesh Visarjan 2023 : मानाच्या पाच गणपतींचे उत्साहात विसर्जन !

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाचे पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.सकाळी १०: १५ वाजता पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. सविस्तर वाचा…

20:23 (IST) 28 Sep 2023
मिरवणुकीतील आवाजाने दोघांचा हृदयविकाराने मृत्यू ; ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

गणेश विसर्जन मिरवणुकीमधील ध्वनीवर्धकांच्या तीव्र क्षमतेने जिल्ह्यात सोमवारी रात्री दोन तरूणांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर दुधारीतील मिरवणुकप्रकरणी ११ जणांविरुध्द विनापरवाना ध्वनीवर्धकाचा वापर करुन सार्वजनिक शांतताभंग केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा…

19:43 (IST) 28 Sep 2023
पुणे: विसर्जन मार्गावर दणदणाट…स्पीकर, ढोल ताशांचा आवाज मर्यादेबाहेर

विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत आहे. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा…

18:56 (IST) 28 Sep 2023
Ganesh Immersion: उद्योनगरीत जलाभिषेकात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

पिंपरी-चिंचवड उद्योगनरीत जलाभिषेकात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. सायंकाळी पाचनंतर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मार्गावर येण्यास सुरुवात झाली.

सविस्तर वाचा…

18:38 (IST) 28 Sep 2023
अनंत चतुर्थीच्या दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचे आगमन

मुंबईसह महाराष्ट्रात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाचे विसर्जन होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सुरू असतानाच आता मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई पश्चिम उपनगरातील सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोबतच विजांचा कडकडाटही ऐकायला मिळत आहे. यामुळे मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहू समुद्रावर गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनीही आपल्या बाप्पाचे विसर्जन त्वरित करून घराकडे निघणे पसंत केले. यामुळे सध्या जुहू चौपाटी वरील गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

18:27 (IST) 28 Sep 2023
Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ

भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित वेळेपूर्वी गुरूवारी मार्गस्थ झाला.

सविस्तर वाचा…

17:52 (IST) 28 Sep 2023
Pune Ganesh Visarjan 2023 Live : मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन

पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीतील मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन झाले.

सविस्तर वाचा…

17:38 (IST) 28 Sep 2023
Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थायलंडच्या पर्यटकांची हजेरी

थायलंडमध्ये मुख्यत्वे बौद्ध धर्माचे पालन केले जाते. मात्र, तेथे गणेशभक्तांची संख्यादेखील प्रचंड आहे. दरवर्षी थायलंड देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.

सविस्तर वाचा…

17:36 (IST) 28 Sep 2023
Pune Ganesh Visarjan 2023 Live : यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला….दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी चार वाजताच विसर्जन मिरवणूक मार्गावर!

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पहिल्यांदाच दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा…

17:32 (IST) 28 Sep 2023
हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे प्रतीक; तब्बल बारा वर्षांपासून मुस्लिम बांधावाकडून होते बाप्पाचे विसर्जन !

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…चा जय घोष करीत ढोल ताशांच्या गजरात आणि डिजेच्या निनादात लाडक्या बाप्पाला आज अखेरचा निरोप दिला जात आहे. वाशीम शहरात देखील बाप्पाला अखेरचा निरोप दिला जात आहे. सविस्तर वाचा…

17:32 (IST) 28 Sep 2023
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार

अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काल रात्री अरोमिरा कॉलेजच्या संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा…

17:31 (IST) 28 Sep 2023
अकोल्यात ‘शुन्य कचरा’ उपक्रम; महापालिकेकडून १४ ठिकाणी…

स्वच्छता पंधरवाड्यांतर्गत अकोला महानगर पालिकेकडून १ ऑक्टोबरला ‘एक तारीख, एक तास स्वच्छता’मध्ये शुन्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १४ ठिकाणी नियोजन करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा…

17:30 (IST) 28 Sep 2023
जळगाव सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

जळगाव भिलपुरा चौकी परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांकडून भव्य पुष्पवृष्टी करण्यात येऊन गणपतीची आरती करण्यात आली. हिंदू बांधवांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून मुस्लीम बांधवांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडवणारी ही ७० वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळाले.

17:30 (IST) 28 Sep 2023
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरूद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ‘पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या’ असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एका बैठकीत दिला.

सविस्तर वाचा…

17:29 (IST) 28 Sep 2023
बियाणे उगवले नाही; कृषी अधिकाऱ्याला दणका, शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश

शेतकऱ्याने पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे एका तालुका कृषी अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. तक्रार करूनही नुकसानीचा पंचनामा झाला नाही. शेतकरी  नुकसानभरपाईपासून वंचित राहिला. सविस्तर वाचा…

17:27 (IST) 28 Sep 2023
Video : अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही-अजय कुमार मिश्रा

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही .राज्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे ते महायुतीत आल्यामुळे प्रादेशिक स्वरूपाच्या छोट्या-मोठ्या पक्षांना फरक पडेल असे उपरोधीकपणे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा साताऱ्यात म्हणाले. सविस्तर वाचा…

17:06 (IST) 28 Sep 2023
विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात मेघगर्जना आणि पावसाच्या सरी

पाऊस सुरू झाल्यानंतर ढोलताशाच्या तालावर नाचण्याचा आनंद पुणेकर घेत आहेत.

सविस्तर वाचा…

16:48 (IST) 28 Sep 2023
नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पालकमंत्री दादा भुसेही ढोल वादनात मग्न

शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणुकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली.

सविस्तर वाचा…

16:25 (IST) 28 Sep 2023
मुंबईत तरुणाला मारहाण

मुंबईत कामावरुन घरी जाणाऱ्या मराठी तरुणाला परप्रांतीयांनी चोप दिला. हा मुलगा घरी जात असताना त्याला मारहाण करण्यात आली आहे. तसंच त्याला जय श्रीरामचे नारे देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने या संदर्भातलं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे मुंबईत चाललं आहे? हाच प्रश्न पडतो आहे. कारण मुंबईत एका महिलेला घर नाकारण्यात आलं. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. घर नाकारत असताना तिला मराठी म्हणून हिणवलं गेलं. तसंच तिच्याबरोबर अरेरावीही करण्यात आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता ही नवी घटना समोर आली आहे.

16:24 (IST) 28 Sep 2023
‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…’ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी

गुलालाने माखलेला रीलस्टार अथर्व सुदामे त्याच्या पवन वाघुलकर,डॅनी पंडित व इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाला.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 28 Sep 2023
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परदेशी नागरिकांची हजेरी

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परदेशी नागरिकांची हजेरी, थायलंडहून गणेश विसर्जन पाहण्यासाठी पर्यटक पुण्यात दाखल, दरवर्षी गणेश विसर्जनासाठी भारतात येतात, आधी मुंबईत, मग अष्टविनायक करून विसर्जनाला पुण्यात

15:40 (IST) 28 Sep 2023
तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुक…

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुक महाकाल रथा मधून काढण्यात आली. २८ फुट उंच असा रथ फुलांनी सजवलेली होता.तर त्यावर १२ फुट उंचीची महाकालची पिंड साकारण्यात आली होती. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. अघोरी महाराज अणि बाहुबली महादेव मुख्य आकर्षण होते.लोणकर बंधूंच नगारा वादन, स्वरूप वर्धनी, गजलक्ष्मी,शिवमुद्रा वाद्य पथक सहभागी झाले होते. तर यावेळी शिवमुद्रा पथकाने भस्माची उधळण देखील केली.

15:39 (IST) 28 Sep 2023
“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

चंद्रपूर: राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

वाचा सविस्तर…

15:34 (IST) 28 Sep 2023
गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज

नवी मुंबई शहरामध्ये आज दहा दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे अनेक गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या तलावांवर मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. झोन वन वाशी येथे आज २१९ सार्वजनिक गणपती, ६४ सोसायटीचे गणपती, ८ हजाराच्या आसपास खासगी गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी २ डीसीपी, ४ एसीपी, २२ व पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, १२५ पीएसयूपीआय, ८०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. आरसीपी प्लाटूम तसेच होम गार्डसह वेगवेगळ्या स्वयंसेवा संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे आजचा गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पूर्णपणे सुरळीत नियोजन केले आहे.

15:31 (IST) 28 Sep 2023
वर्धा : पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांची गणेश विसर्जन केंद्रास पसंती; नद्या, तलाव ओस

वर्धा: नद्या, तलाव,ओढे विहिरी येथे मुर्त्या विसर्जन केल्यास जल प्रदूषण वाढते.ते टाळावे म्हणून स्वयंसेवी संस्थांनी सिमेंटचे टाके, मोठे ड्रम , कृत्रिम हौद गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्याची चळवळ सुरू केली. त्यास आता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

वाचा सविस्तर…

15:20 (IST) 28 Sep 2023
नांदेडमध्ये गणपती विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

नांदेड शहरात आज गणपती विसर्जनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरात आसना नदी पात्रात भाग्यनगर, विमानतळ भागातील गणपतीचे मंदिर विसर्जन होत आहेत. झरी या ठिकाणी मोठ्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. भाग्यनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मोठ्या गणपतीचे विसर्जन पुयणी भागातील तलावात करण्यात येणार आहे. गोवर्धन घाट याठिकाणी घरगुती गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पोलीस बंदोबस्तासाठी विसर्जन ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पुर्ण पोलीस कर्मचारी, बाहेरुन आलेले एक हजार पोलीस कर्मचारी, क्युआरटी, एस. आर. पी., आर. सी. पी. असा मोठा पोलीस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी सांगितले.

15:18 (IST) 28 Sep 2023
ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नवरात्र उत्सव मंडपाचं भूमीपूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमीपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव धुमधडाक्यात पार पडणार आहे. यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.

15:11 (IST) 28 Sep 2023
नागपूर : पुस्तके भिजली, वाचन, अभ्यास करायचा कसा?जिल्हा ग्रंथालयातील चार हजार पुस्तकांना फटका

शनिवारी पहाटे आलेल्या पुरामुळे नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने फक्त घरगुती साहित्याचेच नुकसान झाले नाही तर विद्यार्थ्यांची अभ्यासांची पुस्तके, वह्यासुद्धा भिजल्या. धंतोलीतील शासकीय जिल्हा ग्रंथालयातील चार हजारावर पुस्तके पाण्यात भिजली आहेत.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 28 Sep 2023
वर्धा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आता नव्याने मतदार नोंदणी, जाणून घ्या सविस्तर…

मुंबई व कोंकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०२४ मध्ये निवडणुका होत आहे.यासाठी पूर्णपणे नवी मतदारयादी तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य शासनास दिले आहे. सविस्तर वाचा

15:09 (IST) 28 Sep 2023
वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…

शेतातील हिरव्या शेंगा सोलून टरफले ताटात टाकली. तेव्हाच महिलेच्या गळ्यातील अंदाजे तीन ते साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ ताटात तशीच राहिली. हेच टात म्हशी समोर ठेवले. तीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ फस्त केली. मात्र ही बाब लक्षात येताच घरातील सर्वांची एकच धांदल उडाली. सविस्तर वाचा

15:06 (IST) 28 Sep 2023
अकोला : १४ विद्या आणि ६४ कलांच्या अधिपतीला अनोखे वंदन; चित्र, गीत, नृत्यातून….

गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने प्रभात किड्स स्कूलच्या सांस्कृतिक विभागाने यावर्षी ‘सृजनात्मक गणेश पूजन’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला. बालचित्रकारांनी गणेशाच्या छायाचित्र रेखाटले. सविस्तर वाचा

15:05 (IST) 28 Sep 2023
गोंदिया: ‘स्मार्ट मीटर’ फोडणार नागरिकांना घाम! मोजावे लागणार १२ हजार रुपये, दिवाळीनंतर सुरुवात

मोबाईलसारखेच विजेचे मीटर रिचार्ज करण्याची सुविधा आता गोंदियाकरांना लवकरच मिळणार आहे. नागपूर, चंद्रपूरसह गोंदियातही स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्याचे कंत्राट मॉन्टेकार्लो कंपनीला देण्यात आले आहे. सविस्तर वाचा

15:04 (IST) 28 Sep 2023
ईद मिलादुन्नबीनिमित्त बुलढाण्यात ‘जुलूस’! गणेश विसर्जनामुळे यंदाचा उत्सव मर्यादित; मुस्लीम बांधवांचे सामंजस्य

मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी बुलढाण्यात दिमाखादार जुलूस काढण्यात आला. गणेश विसर्जन, पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ साजरा केला.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 28 Sep 2023
अमरावती: प्रवाशांसाठी आनंदवार्ता; विशेष रेल्‍वेगाड्यांच्‍या ४२ फेऱ्या वाढल्‍या

पुणे-अमरावती आणि मुंबई-बल्‍लारशाह या मार्गावर रेल्‍वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्‍य रेल्‍वेने या मार्गावरून धावणाऱ्यादोन विशेष रेल्‍वेगाड्यांना मुदतवाढ देण्‍यासोबतच या गाड्यांच्‍या तब्‍बल ४२ फेऱ्या वाढविण्‍यात आल्‍या आहेत. सविस्तर वाचा

15:02 (IST) 28 Sep 2023
गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक; एक गंभीर, पाच जखमी, संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला

बुलढाणा: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक व्यक्ती गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. यानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला.

वाचा सविस्तर…

15:00 (IST) 28 Sep 2023
जळगाव शहर बससेवेचा मार्ग मोकळा, जुन्या स्थानकाची जागा देण्यास एसटीची तत्त्वतः मान्यता

केंद्र सरकारतर्फे पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत जळगावात शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:45 (IST) 28 Sep 2023
अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

अमरावती : ई चलान प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणणे शक्य होत आहे. या प्रणालीत तांत्रिक व्‍यवस्‍थेमुळे अमरावती पोलिसांनी चोरीचे वाहने जप्त केले असून ते चोरणाऱ्या आणि वापरणाऱ्यांचीही ओळखही पटवली आहे.

वाचा सविस्तर…

14:32 (IST) 28 Sep 2023
देवेंद्र फडणवीसांच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी अमृता फडणवीसांसह त्यांची मुलगीही उपस्थित होती.

14:31 (IST) 28 Sep 2023
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

14:19 (IST) 28 Sep 2023
विसर्जन मिरवणुकीत मनमोहक रांगोळी, ढोलताशांचे वादन, पालकमंत्री दुचाकीवरून पोहोचले मंडईत

मिरवणुकीत सहभाग घेत दुचाकीवरून एका चौकातून दुसऱ्या चौकाकडे जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सविस्तर वाचा…

14:16 (IST) 28 Sep 2023
सांगली : दारुड्या भावाचा खून

सांगली : दारुच्या नशेत भावानेच भावाचा खून केल्याची घटना नांद्रे (ता.मिरज) येथे बुधवारी रात्री घडली. संशयिताला पोलीसांनी आज पहाटे ताब्यात घेतले आहे. दत्तात्रय कुंभार (वय३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री भाऊ राहूल कुंभार याच्याशी भांडण झाले. त्यावेळी दोघेही दारुच्या नशेत होते. या भांडणात राहूलने लाकडी दांडके व धारदार हत्याराने दत्तात्रयवर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी प्रकाश कुंभार यांनी सदोष मनुष्यवधाची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संशयिताला आज पहाटे पोलीसांनी ताब्यात घेतले.

14:03 (IST) 28 Sep 2023
धक्कादायक! प्रसूतीनंतर दोन महिला दगावल्या, उपचारात हयगय केल्याचा नातेवाईकांचा आरोप

गडचिरोली : शहरातील महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जंतुसंसर्गामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असून, मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे.

वाचा सविस्तर…

14:02 (IST) 28 Sep 2023
यंदा विसर्जन सोहळा किती तास?…‘दगडूशेठ’ मंडळ पहिल्यांदाच दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत प्रथमच दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदा मिरवणूक लवकर संपेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

सविस्तर वाचा…

13:58 (IST) 28 Sep 2023
विसर्जन मिरवणुकीत चंद्रकांत पाटील यांचे ढोलवादन

पुणे : पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होत आहेत. लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा पथकांचे वादन सुरू आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे.

प्रमुख रस्ते बंद असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील मेट्रोने प्रवास करून येत विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मिरवणुकीच्या या उत्साही वातावरणामुळे चंद्रकांत पाटील यांनाही राहावले नाही. त्यांनीही उत्साहाने ढोलपथकात सामील होऊन भगवा ध्वज नाचवला, तसेच ढोलवादनही केले.

13:41 (IST) 28 Sep 2023
सणासुदीच्या काळात दोन विशेष रेल्वेला मुदतवाढ, उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी…

अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-बिकानेर या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना डिसेंबरअखेर व जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

Public Ganeshotsav Mandals assured police procession proceed time, fixed number ganesha visrjan nashik

मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Ganpati visarjan 2023 live mumbai pune maharashtra ganesh visarjan traffic updates anant chaturdashi latest news pbs

First published on: 28-09-2023 at 10:44 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×