Maharashtra Breaking News Update : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघाताप्रकरणी अद्यापही राज्यभरात संतापाची लाट आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पब मालक यांना अटक केलेली. तर अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. याबरोबरच देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार आहेत. तसेच भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेतं? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच मालेगावात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तसेच पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

Live Updates

Marathi News Updates 27 May 2024

19:48 (IST) 27 May 2024
शेतकऱ्यांची अगतिकता व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

जी जाळी दीड ते दोन हजार रुपये जाते, ती आम्ही ३०० रुपये दराने विकत आहोत. त्यातही व्यापारी हापूस, केशर घेऊन जात आहे, असे सहारे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

19:31 (IST) 27 May 2024
कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती

कोकण रेल्वेने भारत-नेपाळ रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. आता केनियातील रेल्वेचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी कोकण रेल्वेने तयारी दर्शवली.

सविस्तर वाचा…

19:31 (IST) 27 May 2024
मनमाड: युनियन बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची बनावट मुदत ठेव व इतरही मार्गाने कोट्यवधींची फसवणूक झाली.

सविस्तर वाचा…

18:29 (IST) 27 May 2024
दारूची नशा अन् पैशांचा वाद; वकिलाने पक्षकारावरच घातले कुऱ्हाडीने घाव, हत्याकांडात मुलाचाही समावेश

वकिलाने पैशाच्या वादातून पक्षकाराचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या हत्याकांडात वकिलाच्या मुलानेही सहभाग घेतला.

सविस्तर वाचा…

18:01 (IST) 27 May 2024
भयंकर…धावत्या बसवर वीज कोसळली, महिला वाहक…..

निसर्गाच्या तांडवाने काही तासांतच बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचे बळी घेतले तसेच १० पाळीव जनावरेही दगावली.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 27 May 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: दोन वर्षांआधी वडील गेले, दहावीचा तिसरा पेपर असताना आईचेही निधन, डोळ्यात अश्रुच्या धारा असताना प्रत्युशने दहावीमध्ये…..

Maharashtra Board Class 10th Result Success Story मार्च महिन्यात प्रत्युशची दहावीची परीक्षा सुरू असताना आईचे आजारपण वाढल्याने त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा…

17:35 (IST) 27 May 2024
सांगली: आंबा महोत्सवात ४७ जातींचे आंबे

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत सांगलीतील कच्छीभवन येथे तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

17:23 (IST) 27 May 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: बारावीची कसर भरून काढली! बुलढाणा जिल्हा विभागात तिसरा

Maharashtra Board Class 10th Results 2024 Announced: बारावीच्या निकालात थेट तळाला फेकल्या गेलेल्या बुलढाणा जिल्ह्याला दहावीच्या निकालाने काहीसा दिलासा दिला आहे.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 27 May 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: यवतमाळमध्ये दहावीतही मुलींचीच बाजी; विभागात चौथ्या स्थानावर, निकाल ९४.५७ टक्के

Maharashtra Board Class 10th Results 2024 Announced महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 27 May 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: मुलांपेक्षा मुलीच अव्वल! चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९४.०५ टक्के

Maharashtra Board Class 10th Results 2024 Announced ९१.३७ टक्केच मुले दहावीच्या परीक्षेत पास झाले आहे. मुलांपेक्षा मुलींवर वरचढ ठरल्या आहे.

सविस्तर वाचा…

17:16 (IST) 27 May 2024
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे घर कोसळून चौघांचा मृत्यू

जळगाव – जिल्ह्यात दोन दिवस वादळी पाऊस कोसळल्याने शेतीपिकांसह घरांची पडझड, पशुधनाचे नुकसान झाले असून, रविवारी रात्री यावल तालुक्यातील आंबापाणी गावानजीक थोरपाणी या पाड्यात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. कुटुंबातील आठ वर्षाचा मुलगा या अपघातात वाचला.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 27 May 2024
ठाणे जिल्ह्यात दहावीचा ९५.५६ टक्के निकाल, ९६. ७९ मुली तर, ९४.३९ टक्के मुल उत्तीर्ण

ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज, जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५६ टक्के लागला आहे.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 27 May 2024
सट्टा बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ७ लाखांची फसवणूक

नवी मुंबई: केवळ समाज माध्यमातील जाहिरातीला भुलून एका महिलेने सट्टा बाजारात तब्बल १ कोटी ७ लाख ९ हजार रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली. मात्र परतावा मिळालाच नाही शिवाय ज्यांच्या सल्ल्याने पैसे गुंतवले त्यांची पैशांची मागणी संपत नसल्याने शेवटी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 27 May 2024
चोरी दडवण्यासाठी कल्याणमध्ये अंधेरीतील तरुणीने रचला ॲसिड फेकल्याचा बनाव

कल्याण – स्वताची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने अंंधेरीतील एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीचा लॅपटाॅप त्याला अंधारात ठेऊन घाटकोपर येथे विकला. हा चोरीचा बनाव दडपण्यासाठी या तरुणीने कल्याणमध्ये येऊन स्वताच्या अंगावर ब्लिचिंग पावडर टाकून आपणास दोन भामट्यांनी लटून जवळील लॅपटॉप चोरून नेल्याचा बनाव रचल्याचा प्रकार कोळसेवाडी पोलिसांनी उघडकीला आणला आहे.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 27 May 2024
भुजबळांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘भाजपा सर्वात मोठा पक्ष…’

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. तेवढ्या जागा मिळायला हव्यात, असं विधान छगन भुजबळांनी आज सकाळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना केलं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. ‘विधानसभेमध्ये तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाला सर्वाज जास्त जागा मिळतील’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

17:10 (IST) 27 May 2024
शीव रुग्णालय अपघात प्रकरण : डॉ. ढेरे यांना रुग्णालयात येण्यास बंदी घालण्याची मागणी

मुंबई : शीव रुग्णालयाच्या परिसरात एका महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शव विच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणाचे पुरावे जमा करण्यात पोलिसांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे जामिनीवर असलेले डॉक्टर ढेरे यांच्याकडून सर्व पुरावे नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना रुग्णालय प्रवेशास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

16:09 (IST) 27 May 2024
जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, आमदार मकरंद पाटील यांची मागणी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसहित १३ जणांनी अत्यल्प दरात जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.

सविस्तर वाचा…

15:39 (IST) 27 May 2024
आयपीएलमध्ये विदर्भातील खेळाडुंनी कशी कामगिरी केली? वाचा….

दरवर्षी प्रमाणे यंदाचा आयपीएलचा १७ वा हंगाम देखील चुरसपूर्ण होता. यामध्ये विविध संघाकडून विदर्भातील सहा खेळाडुंनी सहभाग घेतला.

सविस्तर वाचा…

15:29 (IST) 27 May 2024
नागपूर विभागाच्या दहावीच्या निकालात वाढ, मात्र क्रमवारीत घसरण; गोंदिया जिल्हा अव्वल

नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ५१ हजार २ परीक्षार्थींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 27 May 2024
‘लोकसभेसारखी खटपट विधानसभेला होता कामा नये’, छगन भुजबळांचं विधान

“लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली, ती खटपट विधानसभेच्या निवडणुकीत होता कामा नये. विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा आपल्याला महायुतीत मिळाल्या पाहिजेत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

15:03 (IST) 27 May 2024
“शरद पवारांचं २००४ बाबतचं ते विधान धादांत खोट”, अजित पवारांचं विधान

“शरद पवार २००४ बाबत जे बोलले, ते धादांत खोट आहे. तेव्हा मला वाटलं होतं की, छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील. २००४ साली मुख्यमंत्रीपदाची संधी होती. मात्र, आता वरिष्ठ जे सांगत आहेत, त्यावेळी काहीजण नवखे होते, तसं काहीही नव्हतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं. ते आज राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात बोलत होते. तसेच राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

14:02 (IST) 27 May 2024
सुवर्णवार्ता : सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याच्या दरात वाढ होऊन ते २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २०० रुपयापर्यंतच्या उंचीवर पोहचले होते.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 27 May 2024
अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९५.५८ टक्‍के; राज्यात पाचवे स्‍थान

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 27 May 2024
चिंताजनक : ४ महिन्यांत १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; मृत्यूनंतरही कुटुंबीयांचा मदतीसाठी संघर्ष

सरत्या वर्षात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षातील केवळ ४ महिन्यात १८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 27 May 2024
शरद पवार यांना धक्का, धीरज शर्मा यांचा अजित पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस<a rel="noamphtml" id="event-213650" data-post-id="event-213650" data-event-category="Keyword_To_URL_widget" data-event-action="click" data-event-label="Desktop_4393933" class="ie-click-event" href="https://www.loksatta.com/about/ajit-pawar/"> अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा धक्का समजला जात आहे.

12:11 (IST) 27 May 2024
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर मविआचं आंदोलन

पुण्यात पोर्श कार अपघात प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आली असून या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली. पबच्याविरोधात महाविकास आघाडीचे पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर सहभागी झाले आहेत.

11:58 (IST) 27 May 2024
पोर्श कार अपघात प्रकरण : आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दोन डॉक्टरांना अटक

पुण्यात पोर्श कार अपघात प्रकऱणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुन्यात फेरफार करण्यात आली असून रक्ताचे नमुने केराच्या डब्यात फेकले असल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

11:56 (IST) 27 May 2024
भिवंडीतील ऑर्क्रेस्टा बारवर क्राईम ब्रांचची कारवाई, मॅनेजरसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी येथील रांजनोली भागातील ‘सी रोझ बार अँड रेस्ट्राॅरंट’ या ऑर्क्रेस्टा बारवर भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 27 May 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: राज्यात लातूरची मुलं हुश्शार… १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के!

Maharashtra Board Class 10th Results 2024 Announced यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

सविस्तर वाचा…

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघाताप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्यासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.