05 April 2020

News Flash

Coronavirus: एकही भारतीय उपाशी झोपणार नाही; केंद्र सरकारचं मोठं पाऊल

भारतामधील लॉकडाउनचा आज दुसरा दिवस

Coronavirus News Live Updates

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.

Live Blog

21:48 (IST)26 Mar 2020
राज्यपालांचाही मदतीचा हात; एक दिवसाचं वेतन सहाय्यता निधीला देणार

राज्यातील करोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांनी स्वतः एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

21:30 (IST)26 Mar 2020
राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हाच सध्या एकमेव पर्याय असल्याने राज्याच्या गृहखात्याने या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

20:42 (IST)26 Mar 2020
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार

देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे.

20:26 (IST)26 Mar 2020
करोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच आता भीम जयंती साजरी करु - रामदास आठवले

करोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. करोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. करोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी १४ एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बातमी वाचण्यासाठी लिंक

20:03 (IST)26 Mar 2020
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये करोनाबाधित पहिला रुग्ण आढळला असून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. १८ मार्च रोजी मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील करोनाबाधित रुग्णाशी संपर्क आल्याने या व्यक्तीला लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

19:58 (IST)26 Mar 2020
फूड डिलिव्हरी बॉईजना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही - गृहमंत्री

सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉईजना पोलिसांचा त्रास होणार नाही. त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. संपूर्ण बातमी वाचा...

19:33 (IST)26 Mar 2020
रक्तपेढ्यांमध्ये अवघे दोन आठवडे पुरेल इतकाच रक्तसाठा, मदतीसाठी सिद्धिविनायकाची धाव

राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा आहे. यामुले रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागतील हे लक्षात घेऊन दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

19:05 (IST)26 Mar 2020
मुंबईत आणखी एक मृत्यू; राज्यात दिवसभरातला करोनाचा दुसरा बळी

राज्यात एकीकडे १५ करोनाबाधित रुग्णांना उपचार करुन घरी सोडल्याची दिलासादायक बातमी आल्यानंतर आता अजून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आज दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आम्ही तपास आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

19:01 (IST)26 Mar 2020
संकटकाळातही मुंबईकर पाय घट्ट रोवून उभे
18:58 (IST)26 Mar 2020
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास उघडी राहणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास उघडी राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी परवानगी दिली आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करोनाविषयीच्या उपयाययोजनांच्या संदर्भात एक बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

18:46 (IST)26 Mar 2020
इंडोनेशियात अडकलेल्या भारतीयांची मदतीसाठी हाक

18:46 (IST)26 Mar 2020
Coronavirus : देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय ‘या’ राज्यात उभारणार

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

18:45 (IST)26 Mar 2020
इंडोनेशियात अडकले पुणे, मुंबईतील नागरिकांसह ३३ भारतीय

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून यामुळे अनेक भारतीय देशाबाहेर परदेशात अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेपूर प्रयत्न सुरु असताना इंडोनेशियात ३३ भारतीय अडकले आहेत. लवकरात लवकर आपली सुटका करावी यासाठी ते केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहेत. या सर्वांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून आपल्याकडे ३० मार्चपर्यंत पुरेल इतकाच पैसा असून त्याआधी आपल्याला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. बातमी वाचण्यासाठी लिंक

18:01 (IST)26 Mar 2020
“माशांमुळेही होऊ शकतो करोना”, द लॅन्सेटच्या रिसर्चमधून नवा खुलासा

करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना आता एक नवी माहिती समोर आली आहे. यानुसार माशांमुळेही करोना होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जगविख्यात साप्ताहि‌क द लॅन्सेटच्या संधोधनातून ही माहिती समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने माशीच्या माध्यमातून करोनाची लागण होऊ शकते यासंबंधी माहिती दिली आहे. बातमी वाचण्यासाठी लिंक

17:59 (IST)26 Mar 2020
पाकिस्तानी लष्कराची जबरदस्ती

पाकिस्तानी लष्कराची जबरदस्ती, करोनाग्रस्तांना हलवतंय PoK व गिलगिटमध्येस्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत असतानाही पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात हलवत आहे. सविस्तर बातमी वाचा

17:41 (IST)26 Mar 2020
करोना व्हायरसमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची चांदीच चांदी
17:28 (IST)26 Mar 2020
COVID-19: फेसबुक, नेटफ्लिक्स, Hotstar चा निर्णय, १४ एप्रिलपर्यंत केला मोठा बदल

लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि सोशल मीडिया साइट फेसबुकने लॉकडाउन दरम्यान दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्कवर अधिक ताण येऊ नये यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओंची क्वालिटी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय हॉटस्टारनेही स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता युजर्सना कमी Quality चे व्हिडिओ पाहावे लागणार आहेत. (वाचा सविस्तर)

17:18 (IST)26 Mar 2020
Lokcdown मुळे करोनावर प्रभावी ठरणारे ‘ते’ औषध बनवण्यात विलंब

करोना व्हायरसला रोखू शकणारे औषध शोधण्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरु आहे. पण अद्यापपर्यंत संशोधकांना त्यामध्ये यश आलेले नाही. करोना व्हायरसवर परिणामकारक ठरणाऱ्या कुठल्याही ठोस औषधाची निर्मिती झालेली नाही आणि तिच संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान सध्या काही ठराविक औषधे आहेत जी करोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहेत. सविस्तर बातमी वाचा

17:18 (IST)26 Mar 2020
Lokcdown मुळे करोनावर प्रभावी ठरणारे ‘ते’ औषध बनवण्यात विलंब

करोना व्हायरसला रोखू शकणारे औषध शोधण्यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरु आहे. पण अद्यापपर्यंत संशोधकांना त्यामध्ये यश आलेले नाही. करोना व्हायरसवर परिणामकारक ठरणाऱ्या कुठल्याही ठोस औषधाची निर्मिती झालेली नाही आणि तिच संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान सध्या काही ठराविक औषधे आहेत जी करोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहेत. सविस्तर बातमी वाचा

17:16 (IST)26 Mar 2020
'माझ्या घराचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करा', अभिनेत्याने केला मदतीचा हात पुढे

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. यासर्वांसाठी दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी मदतीचा होत पुढे केला आहे. त्यांनी चक्क 'माझ्या घराचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करा' असे म्हटले.

17:14 (IST)26 Mar 2020
केंद्राच्या पॅकेजचं स्वागत; जनतेपर्यंत लाभ पोहोचवणार - अजित पवार

शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील ‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

16:59 (IST)26 Mar 2020
Video : ‘वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करणं बंद करा’; कलाकारांवर वैतागली फराह

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने घरात राहणं पसंत केलं आहे. घरी राहून  सेलिब्रिटी त्यांच्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या ते घरी काय करतायेत हेदेखील सांगत आहेतं. परंतु सेलिब्रिटी सतत त्यांच्या अपडेट्सचे व्हिडीओ शेअर करत असल्यामुळे नृत्यदिग्दर्शिका फराह खान वैतागली असून हे व्हिडीओ शेअर करणं बंद करा असं तिने सांगितलं आहे. पुढे वाचा ...

16:58 (IST)26 Mar 2020
CoronaVirus : व्वा दादा..!! गरीब-गरजुंसाठी गांगुलीकडून ५० लाखांची मदत

२१ दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या समर्थनार्थ गांगुली पुढे आला आहे. त्यामुळेच ५० लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन गांगुलीने दिले आहे.

वाचा सविस्तर - CoronaVirus : व्वा दादा..!! गरीब-गरजुंसाठी गांगुलीकडून ५० लाखांची मदत

16:53 (IST)26 Mar 2020
लॉकडाऊनमध्ये धुमश्चक्री, रस्त्यावर आलेल्या जमावाकडून पोलिसांवर हल्ला, 9 जणांवर गुन्हा

बीड  : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश असताना बीड जिल्ह्यात पोलिस आणि नागरिकांमध्ये चांगलीच धुनश्चक्री उडाली. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी ही घडली. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊन असताना सिरसाळा येथे काही पुरुष आणि महिला रस्त्यावर आले होते. पोलिसांनी त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस आणि नागरिकांमध्ये चंगलीच धुमश्चक्री झाली. यात एक कॉन्स्टेबल जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणात सिरसाळा येथील वडार गल्लीमधील 9 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

16:51 (IST)26 Mar 2020
विनाकारण भटकंतीची हौस असणाऱ्यांसाठी सचिनचा संदेश

राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसते आहे. अशा विनाकारण घराबाहेर भटकणाऱ्यांसाठी मास्टर ब्लास्टर सचिनने एक संदेश दिला आहे.

विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी सचिनचा खास संदेश, म्हणाला…

16:51 (IST)26 Mar 2020
करोनाची दहशत : सलमान, विराटने सोडली मुंबई

२१ दिवसांचा लॉकडाउन असताना काही सेलिब्रिटींनी मुंबई व गर्दीपासून दूरच राहण्यास पसंत केलं आहे. अभिनेता सलमान खान, क्रिकेटर विराट कोहली हे मुंबईपासून दूर फार्महाऊसमध्ये राहत असल्याचं कळतंय. सलमान खान पनवेल येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबीयांसोबत राहतोय तर विराट कोहली व अनुष्का शर्मा अलिबागला गेले आहेत. पुढे वाचा..

16:47 (IST)26 Mar 2020
हार्दिक-नताशाचा 'लॉकडाउन' स्पेशल फोटो

करोनाचा फटका क्रिकेटपटूंनाही बसला आहे. सारे क्रिकेटपटू घरात राहणे पसंत करत आहेत. या दरम्यान क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतचा एक खास फोटो त्याची प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिने शेअर केला. फोटो पाहण्यासाठी क्लिक करा

16:46 (IST)26 Mar 2020
देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९

देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाचे जॉइन्ट सेक्रेट्री लव अग्रवाल यांनी दिली आहे.

16:45 (IST)26 Mar 2020
बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार - अजित पवार

शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने ‘कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातल्या अन्य शहरात देखील 'कम्युनिटी किचन' सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

16:41 (IST)26 Mar 2020
गरीब कल्याण पॅकेजचं माजी मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण पॅकेजचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. हे पॅकेज शेतकरी, कामगार, महिला, वृद्ध यांच्या सगळ्यांचा समावेश असलेले सर्वसमावेशक आहे. हे पॅकेज सामान्यांपर्यंत नेण्यासाठी भाजपा काम करणार असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

16:41 (IST)26 Mar 2020
देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९

देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव अग्रवाल यांनी दिली आहे

16:38 (IST)26 Mar 2020
आता औषधांचीही होणार ‘होम डिलिव्हरी’; सरकारनं दिली परवानगी

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. ही समस्या लक्षात जर कोणाला औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना आता घरपोच औषधं पुरवली जाणार आहेत. केंद्र सरकारनं औषध कंपन्यांना तशी परवागनी दिली आहे.

16:31 (IST)26 Mar 2020
शेतकऱ्यांकडून दूध, भाजी खरेदी करण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करा, पालकमंत्र्यांचा आदेश

करोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी इतर जिल्हा, राज्यातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती २४ तासात जमा केली गेली पाहिजे. त्यांना तात्काळ विलगीकरणाच्या सूचना देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तसेच भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पशुपालकांकडून दूध घेण्यास नकार देण्याऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी असा आदेश वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. बातमी वाचण्यासाठी लिंक

15:54 (IST)26 Mar 2020
भारतामध्ये करोनामुळे जास्त मृत्यू होणार नाहीत असा दावा ICMR च्या माजी अध्यक्षांचा दावा

देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी भारतामध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढणार नाही असा अंदाज इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स रुग्णालयाचे इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉक्टर नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केला आहे. येथे वाचा सविस्त वृत्त

15:53 (IST)26 Mar 2020
Lokcdown मुळे करोनावर प्रभावी ठरणारे 'ते' औषध बनवण्यात विलंब

जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधांचा समावेश होतो. पण सध्या ट्रेन आणि बस सुरु नाहीयत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर येतान अनेक अड़चणी येत आहेत, अशी माहिती हे औषध बनवणाऱ्या भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘सिप्ला’च्या अध्यक्षांनी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण वृत्त

15:49 (IST)26 Mar 2020
गरजू लोकांना अन्नाचे वाटप

तामिळनाडूमध्ये काही स्थानिकांनी गरजूंना अन्नाचे वाटप केलं. करोनामुळे देशामध्ये शटडाउनची घोषणा करण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्यांचे हाल होत आहेत.

15:46 (IST)26 Mar 2020
लॉकडाउन असतानाही घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावाची हत्या, मुंबईतील घटना

करोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांच्या घऱाबाहेर पडण्यावर बंदी आली आहे. लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत लॉकडाउन असतानाही घराबाहेर पडला म्हणून एका व्यक्तीने आपल्याच भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कांदिवलीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

15:01 (IST)26 Mar 2020
राज्यात अनेक ठिकाणी दवाखाने बंद, कुटुंबीय भीतीच्या छायेत

राज्यात अनेक ठिकाणी दवाखाने बंद असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने अनेक डॉक्टरांना आपल्यालाही त्याची लागण होईल अशी भीती वाटत आहे. काही ठिकाणी कुटुंबीय भीतीच्या छायेखाली जगत असून डॉक्टरांना घराबाहेर जाऊ नका अशी विनंती करत आहे. यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. बातमी वाचण्यासाठी लिंक

14:31 (IST)26 Mar 2020
तेलंगण: करोनाग्रस्तांची संख्या ४४ वर

तेलंगणमध्ये तीन नवे करोनाग्रस्त रुग्ण अढळून आल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४४ वर पोहचली आहे.

14:25 (IST)26 Mar 2020
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार दोन हजार

करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी क्षेत्र सोडल्यास सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांसह शेतकरीही अडचणीत आला आहे. देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याची माहिती दिली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

14:19 (IST)26 Mar 2020
Youtube च्या व्हिडिओ क्वालिटीला करोना व्हायरसचा ‘फटका’

लॉकडाउन दरम्यान दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्कवर अधिक ताण येऊ नये यासाठी YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओंची क्वालिटी डिफॉल्ट ‘स्टँडर्ड डेफिनेशन’वर (SD) सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

14:12 (IST)26 Mar 2020
एकही भारतीय उपाशी झोपणार नाही -अर्थमंत्री

गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

14:11 (IST)26 Mar 2020
करोनाशी लढणाऱ्यांना विमा कवच

देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

13:43 (IST)26 Mar 2020
नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण, महाराष्ट्रात १२४ करोनाग्रस्त

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात १२४ करोनाग्रस्त

13:42 (IST)26 Mar 2020
गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा

देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज

 
13:38 (IST)26 Mar 2020
दाक्षिणात्य अभिनेत्याने करोनाग्रस्तांसाठी दिली दोन कोटींची मदत

करोनाग्रस्तांसाठी दिली दोन कोटींची मदत जाहीर केली आहे. यापैकी एक कोटी रक्कम पंतप्रधान सहाय्याता निधीसाठी देण्यात येणार असून प्रत्येक ५० कोटी रुपये आंध्र प्रदेश आणि तेलंगण मुख्यमंत्री सहाय्याता निधीसाठी दिले जाणार आहेत

13:25 (IST)26 Mar 2020
सुसाट…करोनाशी लढाई, F-1 टीम्स बनवणार व्हेंटिलेटर्स

व्हेंटिलेटरच्या उत्पादनासाठी एकूण तीन गट बनवण्यात आले आहेत. २० मार्च रोजी फॉर्म्युला वनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात यूकेमधील टीम्स व्हेंटिलेटर प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फॉर्म्युला वनच्या सर्व टीम्समध्ये बेस्ट डिझायनर आहेत. वाचा सविस्तर बातमी 

12:49 (IST)26 Mar 2020
पश्चिम बंगालमध्ये दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू

लॉकडाउन असतानाही दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पोलिसांनी ३२ वर्षीय व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण कऱण्यात आली. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाने पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. लाल स्वामी असं या व्यक्तीचं नाव असून तो हावडा येथील रहिवासी आहे. लाल सिंह दूध आणण्यासाठी घऱाबाहेर पडले होते. यावेळी गर्दी झाल्याने पोलिसांना केलेल्या लाठीचार्जमध्ये ते जखमी झाले असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.

12:48 (IST)26 Mar 2020
‘फ्लिपकार्ट’च्या ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू, आवश्यक वस्तूंची करणार डिलिव्हरी

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने करोना व्हायरसमुळे देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर काल (दि.२५) आपल्या सर्व सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. पण, आता कंपनीने आपला निर्णय बदलला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरक्षेबाबत हमी मिळाल्यामुळे कंपनीने आपल्या किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा पुरवण्याच्या सेवा पुन्हा सुरू करत असल्याचं कंपनीने म्हटलंय. तर, अ‍ॅमेझॉनकडून अद्याप सरकारसोबत याबाबत चर्चा सुरू सुरू असल्याची माहिती आहे.

<p class="appstext"><img src="https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.png" width="24" height="24" style="margin-right:0;"><strong><em>लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल <a onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );" href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank"> (@Loksatta) </a> जॉइन करण्यासाठी <a href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank" onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );"> येथे क्लिक करा </a> आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.</em></strong></p>
Next Stories
1 धक्कादायक : डॉक्टरला ‘करोना’ची लागण, १००० रुग्णांना संसर्गाचा धोका!
2 Coronavirus: मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’ला यश, भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला
3 Coronavirus : देशातील टोलनाक्यांवर तात्पुरती टोल वसुली बंद; गडकरींची घोषणा
Just Now!
X