राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध झाल्याने सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी मोर्चाची घोषणा केली होती, परंतु सरकारने निर्णय मागे घेतल्याने मोर्चा रद्द केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे, तसेच आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र आले. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांनीही या एकत्र येण्याबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.