Mumbai News Today : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. घटक पक्षातील मतभेदांमुळे जागा वाटप निश्चित होत नाही. गेल्या काही वर्षांत आयाराम-गयाराम यांची संख्या वाढल्याने कोणाला उमेदवारी द्यायची, असा तिढा निर्माण झाला आहे. येत्या एक-दोन दिवसांत आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

Live Updates

Maharashtra News Updates 03 April 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

17:50 (IST) 3 Apr 2024
आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

अमरावती : आम्‍हाला धमक्‍या मिळताहेत की जास्‍त बोलाल, तर तुरुंगात पाठवू, उखडून फेकून देऊ, मी त्‍यांना म्‍हणतो, जा तुमच्‍या बापाला पाठवा, आजोबा कुणी असतील, तर त्‍यांना पाठवा. बच्‍चू कडूंवर शेतकरी, दिव्‍यांगांच्‍या प्रश्‍नांसाठी साडेतीनशे गुन्‍हे दाखल आहेत. बच्‍चू कडूंनी चार महिने तुरुंगात दिवस काढले आहेत. आला दुपट्टा घातला, आणि नेता झाला, असा बच्‍चू कडू नाही. अजूनही तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर, सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी आम्‍ही आवाज उठवत राहणार, असा इशारा आमदार बच्‍चू कडू यांनी बुधवारी येथे एका जाहीर सभेत दिला.

सविस्तर वाचा…

17:50 (IST) 3 Apr 2024
“काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 3 Apr 2024
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्यासाठी उद्या गुरुवार, ४ एप्रिल हा अखेरचा दिवस आहे. आताच्या क्षणापर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील नागरिकांची उमेदवाराबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महायुतीकडून कोण उमेदवारी दाखल करणार हे गुलदस्त्यात असले तरी, अर्ज दाखल करण्याची, सभेची आणि रॅलीची संपूर्ण तयारी महायुतीने केली आहे.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 3 Apr 2024
प्रतिभा धानोरकरांनी ‘हातउसने’ घेतले ३९ कोटी! निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणातील तपशील

नागपूर : काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विविध व्यापारी, कंत्राटदार कंपन्या आणि खासगी कंपन्यांकडून तब्बल ३९ कोटींहून अधिक रक्कमेचे तात्पुरते कर्ज (हातउसने) म्हणून घेतले आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरण पत्रातून ही बाब उघड झाली आहे.

सविस्तर वाचा…

17:39 (IST) 3 Apr 2024
पुणे: आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत फ्लॅटमध्ये दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सविस्तर वाचा…

16:17 (IST) 3 Apr 2024
आर्थिक लाभासाठी २५ लाखांस जिवंत शंख खरेदी करणे पडले महागात, महाराजासह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी एका तथाकथित महाराज आणि महिलेसह पाचजणांविरूद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 3 Apr 2024
सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांची नवीन प्रणाली

शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा…

15:31 (IST) 3 Apr 2024
नाशिक : शेततळ्यात बुडून बालकाचा मृत्यू

नाशिक : शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षाच्या बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील यशवंत नगरातील गणेश गायकवाड हा अल्पवयीन मुलगा शेतात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. एक शेळी शेततळ्याजवळ चरत असतांना पाण्यात पडली. शेळीला पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करत असताना गणेशही शेततळ्यात पडला. बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

15:23 (IST) 3 Apr 2024
मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी

मुंबई : मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याविरोधात आणि समर्थनार्थ करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्याबाबतची नोटीस उच्च न्यायालय प्रशासनाने बुधवारी प्रसिद्ध केली.

वाचा सविस्तर…

15:08 (IST) 3 Apr 2024
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब

जनसंपर्क कार्यालयात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

15:01 (IST) 3 Apr 2024
‘स्वाभिमानी’कडून लढून लोकसभा निश्चितपणे जिंकू; राजू शेट्टी यांचा विश्वास

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढून लोकसभा निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकू; असा विश्वास शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 3 Apr 2024
सांगली जागेबाबत महाविकास आघाडीत मतभेद नाहीत – रोहित पाटील

पिंपरी चिंचवड: सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. यावर आज बैठक होणार असून यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात सकारात्मक निर्णय येईल असं विधान रोहित पाटील यांनी केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रोहित पाटील यांनी शहराचे शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या घरी भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पाटील म्हणाले, सांगलीच्या जागेवरून नाराजी आहे. सांगली जागेच्याबाबत आमच्यात मतभेद नाहीत. काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी अस वाटतं तर चंद्रहार पाटील देखील तयारी करत आहेत. यासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. सांगली आणि इतर एक- दोन जागेबाबत निर्णय होणार आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही ठरवलं आहे, की महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याचं चांगलं काम करायचं आहे. चांगलं मताधिक्य महाविकास आघाडीला द्यायचं आहे.

14:31 (IST) 3 Apr 2024
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयालगत बंद पडलेल्या मफतलाल गिरणीत नव्याने बांधण्यात आलेला दहा हजार यंत्रमाग विभाग बंद करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव करून गिरणी कामगारांना दिलासा दिला आहे. शिवाय, राज्य सरकार, महापालिका आणि विकासक यांना हा विभाग पाडण्यास आणि त्याचे चटई क्षेत्रफळ (एफएसआय) वापरण्यासही न्यायालयाने मज्जाव केला आहे.

वाचा सविस्तर…

14:11 (IST) 3 Apr 2024
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कामाला अजून वेळ लागणार असून यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सब-वेमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम असेल. यावर्षीही अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच पर्याय असणार आहे.

वाचा सविस्तर…

14:11 (IST) 3 Apr 2024
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

मुंबई : पावसाळ्यात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेने मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कामाला अजून वेळ लागणार असून यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सब-वेमधून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसमोर आव्हान कायम असेल. यावर्षीही अंधेरी सब वेमध्ये पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच पर्याय असणार आहे.

वाचा सविस्तर…

13:56 (IST) 3 Apr 2024
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

मुंबई : सर्वसामान्यांसह उच्च उत्पन्न गटालाही परवडणाऱ्या दरात हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रत्येक सोडतीत म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांकडून केला जातो. पण यापुढे मात्र म्हाडाच्या सोडतीत उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश नसण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 3 Apr 2024
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांची नवी मुंबईत भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा भोईर समर्थकांमध्ये सुरू आहे.

वाचा सविस्तर…

13:53 (IST) 3 Apr 2024
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार; शुक्रवारपासून मात्र पावसाचाही अंदाज

नागपूर : राज्यात तापमान वाढीला लागले असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान वाढत असून विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 3 Apr 2024
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत एका सावजी हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून तोडफोड केली. तसेच हॉटेलमालकाला मारहाण केली.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 3 Apr 2024
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातल घोषणा केली.

13:17 (IST) 3 Apr 2024
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

दोन्ही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तेव्हा बेकायदेशीर व्याजाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 3 Apr 2024
२२ लाखांचे एलएसडी पेपर जप्त

नवी मुंबई : अमली पदार्थविरोधी पथकाने एलएसडी या अमली पदार्थप्रकरणी एका आरोपीस अटक केली होती. त्याच्या चौकशीतून नुकतेच अन्य तीन आरोपींनाही जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण १.६० मिली वजनाचे ६४ एलएसडी पेपर अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ज्याचे मूल्य २२ लाख ८० हजार आहे. २८ मार्चला एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून वहाळ येथे एका आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे १० लाख रुपयांचे १.२६ ग्रॅम वजनाचे एकूण ५० एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ आढळून आला होता. या प्रकरणी त्याला अटक केल्यावर त्याची चौकशी केली. त्यातून अन्य तीन आरोपींचा तपास करून त्यांनाही अटक केली आहे. या तीन आरोपींकडे १२ लाख ८० हजार रुपयांचे १.६० मिली वजनाचे ६४ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले.

13:05 (IST) 3 Apr 2024
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

एरवी प्रवेश मिळण्यासाठी पालकांना ताटकळत ठेवणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आता पालकांची मनधरणी करण्याची वेळ येऊ लागली आहे. खासगी शाळांतील पूर्वप्राथमिक, पहिलीचे प्रवेश बहुतांशी डिसेंबर, जानेवारीमध्ये पूर्ण होतात. सविस्तर वाचा…

13:02 (IST) 3 Apr 2024
“रश्मी बर्वे यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र,” उदय सामंत यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेस महिलांवर अन्याय..”

नागपूर : काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचा नामनिर्देशन पत्र जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. सर्वकाही माहीत असतानाही पक्षातील महिलेची बदनामी करत त्यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली. 

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 3 Apr 2024
“सत्ताबदल अटळ, नंतर भाजपाची अवस्था काय होणार, हे स्पष्टच” नाना पटोले यांचे विधान; म्हणाले, “अनेक नेते शिफ्टिंगच्या…”

गोंदिया : जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. अहंकार आणि आम्ही जे केले तेच बरोबर, अशी भाजपाची मानसिकता झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:51 (IST) 3 Apr 2024
कुटुंबीयांना सैनिक भत्ता नाकारण्याचे प्रकरण : लोकसभा निवडणुकांमुळे शहीद पत्नीच्या मागणीवर निर्णय नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहीद मेजर अनुज सुद यांच्या कुटुंबियांच्या मागणीवर निर्णय घेता आलेला नाही, असे राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सूद यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेवर राज्य सरकारच सुयोग्य निर्णय घेऊ शकते. तसेच, हा निर्णय सकारात्मक असावा आणि उच्च पातळीवर घेण्यात यावा, या आपल्या वक्तव्याचाही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने पुनरूच्चार केला.

वाचा सविस्तर…

12:33 (IST) 3 Apr 2024
अटक करण्यात आलेले सात सोमाली चाचे अल्पवयीन? विशेष न्यायालयाचे चौकशीचे आदेश

मुंबई : सोमालियाच्या किनारपट्टीवरील कारवाईत अटक करण्यात आलेले ३५ पैकी सात सोमाली चाचे अल्पवयीन असल्याच्या दाव्याची चौकशी करा, असे आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी बाल न्याय मंडळाला दिले. या सातही चाच्यांना सध्या डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

12:26 (IST) 3 Apr 2024
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

नागपूर : शहरात गेल्या चार वर्षांत २२० तरुणी देहव्यापाराच्या दलदलीत लोटल्या गेल्या. यामध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींचा टक्का मोठा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 3 Apr 2024
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ३१ टक्क्यांवर

एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 3 Apr 2024
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार

मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. मंगळवारपासून पालिकेच्या ‘ए’ विभागात स्वच्छतेसंदर्भातील प्रकल्प सुरु करण्यात आला असून आता स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार आहे.

वाचा सविस्तर…

11:46 (IST) 3 Apr 2024
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत एकदा गँगवॉर भडकले. कारागृहातील बॅरेक क्रमांक तीनमध्ये कुख्यात गुंड चेतन हजारे याच्यावर दुसऱ्या एका कैद्याने टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात हजारे जखमी झाला.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 3 Apr 2024
“मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार”, वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना विश्वास

प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 3 Apr 2024
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी

पाणी टंचाईने भीषण स्वरुप धारण केले असून सात तालुक्यांतील २०३ गावे आणि ४३६ वाड्यांना २१० टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 3 Apr 2024
सुधीर मुनगंटीवार म्हणतात,’ जोरगेवारांनी आता मदत केली नाही तर मी त्यांना…

चंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महायुती सरकार मध्ये सहभागी आहे. मात्र राज्याचे वनमंत्री तथा लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारापासून दूर आहे. जोरगेवार यांनी मला आता मदत केली नाही तर पुढे मी त्यांना मदत करणार नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांना इशारा दिला.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 3 Apr 2024
चंद्रपूर : पुगलिया असे काय म्हणाले की राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ २०१९ मध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी चंद्रपूर येथे आले होते. या सभेला ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी खासदार या नात्याने मलाही मंचावर स्थान देण्यात आले.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 3 Apr 2024
पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, राज्यात तीन महिन्यात ११ वाघांचा मृत्यू

नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वाराजवळ पूर्व पेंच वनक्षेत्राच्या कुटुंबा बीटमधील कक्ष क्र. ५३१ मध्ये वाघिणीचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी ती अतिशय अत्यवस्थ होती आणि ओकारी करत होती. पर्यटकांसमोरच तिने प्राण सोडला.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 3 Apr 2024
डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्या लगतच्या सर्वाधिक वर्दळीच्या गांधीनगर रस्त्यावर जुना जकात नाका भागात भूमाफियांनी पदपथ, नाल्याला अडथळा होईल आणि रस्तारुंदीकरणाला बाधा येईल अशा पध्दतीने पाच गाळ्यांची उभारणी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 3 Apr 2024
वंचितच्या धुळे येथील उमेदवाराची स्वेच्छानिवृत्तीची मागणी, मागणीला केंद्र सरकारचा विरोध

मुंबई : धुळे येथून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुल उर्फ अब्दुर रहमान यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीला केंद्र सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात विरोध केला. तसेच, रहमान यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयानेही केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

वाचा सविस्तर…

11:25 (IST) 3 Apr 2024
महापालिका मालामाल…पिंपरी- चिंचवडकरांनी भरला कोट्यवधींचा कर

महापालिकेला सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, बांधकाम परवानगी, अग्निशमन, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह व परवाना, भूमी जिंदगी, प्राधिकरण भूखंड हस्तांतरण या विभागांतून दोन हजार ५३ कोटी ९८ लाखांचा महसूल मिळाला आहे. सविस्तर वाचा…

11:22 (IST) 3 Apr 2024
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना

प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…

11:20 (IST) 3 Apr 2024
घोडबंदरकरांची अवजड वाहतूकीच्या कोंडीतून सुटका? पुल कामासाठी अतिअवजड मालवाहू वाहनांना बंदी

घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात उड्डाणपूल निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे येथील मार्गिका अरुंद झाली असून अतिअवजड मालवाहू वाहने (ओडीसी) रस्त्यामध्ये अडकून कोंडी होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

11:19 (IST) 3 Apr 2024
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

ठाणे : भिवंडी येथील केजीएन चौक भागात मंगळवारी क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. या वादात जुबेर शेख (४८) यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी १४ जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:19 (IST) 3 Apr 2024
महायुतीचा उमेदवार जाहीर नाही पण, निवडणूक समिती जाहीर

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेवर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी येथील महायुतीच्या नेत्यांनी निवडणुक प्रचार नियोजनासाठी संयुक्त समिती गठीत केली आहे.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 3 Apr 2024
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

नाशिक : थेट दिल्लीहून भाजपने नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सुचविल्याने आपली हक्काची जागा स्वत:कडे राखण्यात शिवसेना शिंदे गटाची दमछाक होत आहे. या जागेसाठी भाजप आणि राष्ट्र्रवादी आग्रही असले तरी जागा सेनेकडे राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिंकून येण्याची क्षमता या निकषावर निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 3 Apr 2024
विमानाने येऊन पुण्यातील मॉलमध्ये चोरी… राजस्थानातील टोळी गजाआड

पुणे : विमानाने येऊन शहरातील मॉलमधून महागडे कपडे, पादत्राणे चोरी करणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून चार लाख १७ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने देशातील विविध शहरांत चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वाचा सविस्तर…

11:12 (IST) 3 Apr 2024
विश्लेषण: ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचे पद धोक्यात? ताज्या निवडणूक सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

ब्रिटनमध्ये या वर्षअखेरीस किंवा २०२५च्या सुरुवातीला पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहासाठी (हाऊस ऑफ कॉमन्स) निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी आजवरचे सर्वात मोठे सर्वेक्षण अलीकडेच झाले. सविस्तर वाचा…

11:10 (IST) 3 Apr 2024
अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?

अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने मांडण्यात आला आहे. अकोल्यात सलग पाचव्यांदा भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपने अनुप धोत्रे व काँग्रेसने डॉ. अभय पाटील हे नवीन उमेदवार दिले आहेत. सविस्तर वाचा…

11:03 (IST) 3 Apr 2024
“ठाकरे गटातील ८ आमदार माझ्या संपर्कात”, उदय सामंत यांचा दावा

ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत. हवं तर त्यांची नावेही सांगतो. या आठ आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर भेट घालून देणार आहे – उदय सामंत

Maharashtra News Updates 03 April 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी