Mumbai Breaking News Today 07 May 2025 : माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या २ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आंदोलन केले जाणार आहे.  तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.  तसेच बुधवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने भारतीय सशस्त्र दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा नेतृत्व संपवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी ही ठिकाणे निवडली. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 26 April 2025

22:18 (IST) 7 May 2025

पुणे विभागात ४६ कोटी थकविणाऱ्या ४१ हजार ग्राहकांची वीज ‘महावितरण’कडून बंद

‘पुणे विभागातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांकडे गेल्या मार्चमध्ये ६९ कोटी रुपयांची थकबाकी होती ...वाचा सविस्तर
21:22 (IST) 7 May 2025

युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबईत ऑपरेशन अभ्यास

सुमारे हजार स्वयंसेवक या सरावात सहभागी झाले होते. ...वाचा सविस्तर
21:11 (IST) 7 May 2025

‘एबीसी आयडी’अभावी १६ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, मुंबई विद्यापीठाच्या ‘बी.कॉम.’ सहाव्या सत्र परीक्षेमध्ये ५५.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

४४.५३ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण ...सविस्तर बातमी
20:36 (IST) 7 May 2025

राष्ट्रीय उद्यानातील नोटिसा मिळालेले झोपडीधारक पुनर्वसनासाठी पात्र की अपात्र? पात्रता सिद्ध करण्यासाठी त्यांना सुनावणी द्या, उच्च न्यायालयाचे आदेश

न्यायालयानेही झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तीक सुनावणी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. ...सविस्तर वाचा
20:19 (IST) 7 May 2025

प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीची प्रतीक्षाच, वायूवाहिनीचे काम रखडल्याने दहनवाहिनी सुरु होण्यात विलंब

महानगरपालिका प्रशासनाने मालाड येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांच्या कलेवराचे दहन करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित दहनवाहिनी सुरू केली. ...सविस्तर बातमी
18:51 (IST) 7 May 2025

करेगुट्टा चकमकीत २२ नक्षलवादी ठार, ‘ऑपेरेशन संकल्प’ अंतिम टप्प्यात….

या मोहिमेदरम्यान ५० हून अधिक जवानांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. मोहिमेवरील जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
17:37 (IST) 7 May 2025

बारावीत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मेला कृष्णाचा वाढदिवस होता. पण त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने हाच त्याचा मृत्यू दिवस ठरला. मुलाच्या निर्णयामुळे शिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ...अधिक वाचा
17:32 (IST) 7 May 2025

दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्याने डोंबिवलीत शिवसेनेकडून आनंदोत्सव

भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून त्यात काही दहशतवादी मारले गेले असल्याचे नागरिकांना पहाटे समजले. ...अधिक वाचा
17:30 (IST) 7 May 2025

कौटुंबिक वादातून साडूचा खून करुन मृतदेह वरंधा घाटात फेकला; ग्रामीण पोलिसांकडून दोघे अटकेत

बेवारस अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. ...वाचा सविस्तर
17:13 (IST) 7 May 2025

रेल्वे डब्यांची संख्या वाढेना…महिलांच्या डब्यात घुसखोरी करणारे धडधाकड पुरुष अनेकदा….

महिला आणि अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित डबे असतात. या डब्यामध्ये फक्त महिला आणि अपंगांनाच प्रवेश असला तरी बरेच प्रवासी सर्रास या डब्यांमध्ये घुसखोरी करतात. अनेक रेल्वे स्थानकावर हे चित्र दिसते. ...सविस्तर वाचा
16:58 (IST) 7 May 2025

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची ‘या’ क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक….

सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
16:44 (IST) 7 May 2025

खेळाडूंनी जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले

रामबाग ग्राउंड येथे मागील एक आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. शहरातील फुटबॉल , क्रिकेट तसेच इतर खेळासाठी एकमेव क्रीडांगण आहे. चांदा क्लब ग्राउंड शहरात असले तरी त्या ग्राऊंडवर नेहमीच विविध शासकीय कार्यक्रम, तसेच इतर कार्यक्रम, मेळावा सुरू असतो. ...अधिक वाचा
16:30 (IST) 7 May 2025

चला, सीताबर्डी किल्‍ला पाहायला ! पर्यटन विकास महामंडळाची १० मे रोजी सहल

महामंडळामार्फत सीताबर्डी किल्ला सहल नियमितपणे प्रत्येक महिन्याचा दुस-या शनिवारी आयोजित केली जाणार असल्‍याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी कळवले आहे. ...सविस्तर बातमी
16:20 (IST) 7 May 2025

एकाकी पडलेल्या महिलेने शोधला मैत्रीचा आधार…पण मुलाने घातला खोडा, भरोसा सेलने सोडवला नाजूक नात्याचा गुंता

दोघेही वयाचे बंधन विसरुन एकमेकांना आधार द्यायला लागले. मात्र, आईचा मोबाईल मुलाच्या हाती लागला आणि घरातील वातावरण बिघडले. या नाजूक प्रकरणात भरोसा सेलने समूपदेशातून अलगद गुंता सोडवला. ...वाचा सविस्तर
16:15 (IST) 7 May 2025

चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ‘सोशल क्लब’च्या आड जुगारअड्डे!

नागपूर परिक्षेत्रातील काही जिल्ह्यात ‘सोशल क्लब’ आणि ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरू असून चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हा सध्या आघाडीवर आहे. ...सविस्तर बातमी
16:06 (IST) 7 May 2025

'कटर'ने हल्ला, तिघे बापलेक गंभीर, चिखलीतील थरार

यातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...अधिक वाचा
15:46 (IST) 7 May 2025

पुण्यातील मटका किंग नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल, कारागृहातून बाहेर पडताच मटका अड्डा सुरू

गुन्हेगारी वर्तुळात तो ‘मटका किंग’ नावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती. ...वाचा सविस्तर
14:15 (IST) 7 May 2025

"अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन, " बच्चू कडूंची घोषणा

गेल्या काही दिवसांत शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण ढवळून निघाले असताना शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत ...सविस्तर वाचा
13:57 (IST) 7 May 2025

रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात १४३.९३ कोटी…

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचा विविध मार्गाने उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच त्याला यश मिळाले. भुसावळ मंडळाने प्रवासी महसुलातून ७५.४१ कोटी, इतर महसूल १०.२९ कोटी, माल वाहतुकीतून ५६.५५ कोटी, विविध उत्पन्नातून ०१.६८ कोटी, तिकीट तपासणी मोहिमेद्वारे १०.९२ कोटींचा महसूल मिळवला. ...वाचा सविस्तर
13:37 (IST) 7 May 2025

दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवण्यावर स्थगनादेश; उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना…

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका क्र.२४०३/२०२५ ची सुनावणी घेत ५ मे रोजी या प्रकरणी हस्तांतरित झालेल्या निधी वितरणाला स्थगनादेश दिला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात याचिकेत नमूद सर्व मुद्द्यांवर शपथपत्र दाखल करण्यास निर्देश दिले आहेत, असे वंचितचे पदाधिकारी म्हणाले. ...सविस्तर वाचा
13:23 (IST) 7 May 2025

मोठी बातमी: एमपीएससीच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या नावाचे पत्र संकेतस्थळावर

ही प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एमपीएससीने मुंबई विद्यापीठाला पत्र पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ञ द्यावेत अशी मागणी केली आहे. हे पत्र मुंबई विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. ...सविस्तर वाचा
13:05 (IST) 7 May 2025

भारताच्या नागरी संरक्षणाचे शिल्पकार नागपूरकर ई. राघवेंद्र राव देशातील एकमेव नागरी संरक्षण महाविद्यालय नागपूरमध्ये

दुसरे महायुद्ध सुरू असताना, २२ जुलै रोजी इंग्लडच्या संसदेत झालेल्या चर्चेत भारताच्या वसाहतीला युद्धाशी जोडण्याची सरकारची योजना काय होती यावर एक प्रश्न विचारण्यात आला. लॉर्ड एच स्नेल यांनी उत्तर दिले की भारतात ते 'नागरी संरक्षण तयारी' नावाचा एक नवीन उपक्रम राबवतील आणि नागपूरचा रहिवासी. ई. राघवेंद्र राव यांना त्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 7 May 2025

पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर 'आरएसएस'ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “न्याय मिळाला…”

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे म्हणाले, पहलगाम मधील पीडित लोकांना न्याय मिळणे सुरू झाले आहे. ''ऑपरेशन सिंदूर” न्याय मिळाला. राष्ट्राचे समर्थन. जय हिंद. भारत माता की जय । अशा शब्दांत या कारवाईचे स्वागत केले आहे. ...सविस्तर वाचा
12:24 (IST) 7 May 2025

'एचएसआरपी' नंबर प्लेटसाठी अवैध वसुली, नागपूर आरटीओने एक केंद्र बंद पाडले

शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी ३० जून २०२५ पर्यंत बसवणे बंधनकारक केले आहे. त्याबाबत राज्याच्या परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना निर्देश दिले आहेत ...अधिक वाचा
12:01 (IST) 7 May 2025

पुण्यातील हडपसर भागात गांजा विकणाऱ्या सराइताला पकडले, तीन किलो गांजा जप्त

पोलिसांच्या पथकाने दुचाकी थांबविली. दुचाकीस्वार सूर्यवंशीची चौकशी केली. दुचाकीची डिकी उघडून पाहिली. तेव्हा डिकीत गांजा सापडला. डिकीतून ६० हजार रुपयांचा तीन किलो ५६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ...वाचा सविस्तर
11:56 (IST) 7 May 2025

Thane Rain News: ठाणे, नवी मुंबईत वाऱ्यासह पावसाच्या सरी

जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनीटे पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. ...अधिक वाचा
11:41 (IST) 7 May 2025

Mumbai Rain Latest News: मुंबईत काही ठिकाणी पावसाची हजेरी; राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
11:29 (IST) 7 May 2025

मुंबई : एका मेसेजमुळे उलगडले हत्येचे रहस्य, मालाडच्या हॉटेलमध्ये व्यापाऱ्याचा मृतदेह

मिरा रोड मधील एका व्यापाऱ्याने केलेली आत्महत्या ही हत्या असल्याचे एका इंग्रजी भाषेतील मेसेजमुळे उघड झाले आहे. ...अधिक वाचा
11:21 (IST) 7 May 2025

"धर्म देख कर मारा था, धर्म बता कर मारा है, भारतीय लष्कराचे अभिनंदन", केदार दिघे यांची प्रतिक्रिया

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. ...अधिक वाचा
11:18 (IST) 7 May 2025

आता फुकटात अतिक्रमण काढून मिळणार, पोलीसांचे संरक्षण पण मिळणार

गृहखात्याने पोलीस महासंचालकांना एका आदेशातून अतिक्रमणबाबत सूचित केले आहे. शेत व पाणंद रस्त्याचे अतिक्रमण काढतांना पोलीस संरक्षण पुरविण्याबाबत ही सूचना आहे. ...अधिक वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे