Mumbai Maharashtra Breaking Update : मुंब्रा येथील रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईसह ठाणे-डोंबिवलीतील नागरिकांमधून रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाली असून आज मनसे ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन असा धडक मोर्चा काढणार आहे. मुंब्र्यातील घटनेनंतर उमटणारे पडसाद व राजकीय प्रतिक्रियांकडे आपलं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय घडामोडींकडेही आपण लक्ष ठेवणार आहोत. जसे की आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या दौऱ्यांवर गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची आज भेट घेणार आहेत याकडे आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या.

19:22 (IST) 10 Jun 2025

Ajit Pawar : "मी खिशात पैसे घेऊन बसतो काय?", अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावलं

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना शिंदेंच्या काही नेत्यांना देखील अप्रत्यक्ष सुनावल्याचं पाहायला मिळालं. ...अधिक वाचा
18:28 (IST) 10 Jun 2025

छगन भुजबळ पुन्हा नाराज? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला गैरहजर राहिल्याने चर्चा; अजित पवार म्हणाले, “काही नेते…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय कधी व का घेतला? याबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

वाचा सविस्तर

18:09 (IST) 10 Jun 2025

रस्त्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला आई मिळवून देण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

लांजा - काजरघाटी मार्गावरील पूनस संसारे फाटा येथे दि.८ जूनच्या रात्री एक बिबट्या मादी आपल्या बछड्याला तोंडात घेवून रस्ता ओलांडत होती. मात्र या रस्त्यावरील वाहनाच्या वर्दळीमुळे बिबट्या मादीच्या तोंडातून बछडा खाली रस्त्यावर पडला. ...सविस्तर बातमी
17:58 (IST) 10 Jun 2025

वीज वितरण कंपनीच्या चोरीला गेलेल्या पोलांसह १ कोटी ३४ लाख २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत; तिघे अटकेत

या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल आणि गुन्ह्यात वापरलेले तीनही ट्रेलर जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३४ लाख २४ हजार ५८९ रु. इतकी आहे. ...सविस्तर वाचा
17:49 (IST) 10 Jun 2025

दोडामार्ग: मांगेली फणसवाडी येथे फणस काढायला गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

मंगळवारी सकाळी विष्णू गवस हे त्यांच्या घराशेजारील शेतात झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या एका जंगली अस्वलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...सविस्तर बातमी
17:38 (IST) 10 Jun 2025

ठाण्यात वटपौर्णिमेच्या निमित्ताने शिंदेच्या सेनेचा असाही प्रचार

सणांमध्ये राजकारण आणले जात असल्याच्या मुद्द्यावरून या बॅनरबाजीविषयी महिलांसह स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. काही नागरिकांनी या बॅनरबाजीस विरोधही दर्शविला. ...सविस्तर वाचा
17:06 (IST) 10 Jun 2025

"आमचा स्ट्राइक रेट जास्त असल्यामुळे…", दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य

Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले, "आमच्या मूळ विचारधारेशी एकनिष्ठ राहून, त्यावर ठाम राहून आम्ही एनडीएबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे". ...वाचा सविस्तर
17:06 (IST) 10 Jun 2025

"अशी भाषा गावगुंड वापरतात", प्रकाश महाजनांचा नारायण राणेंना टोला

"महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या, केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या नारायण राणे यांनी 'प्रकाश महाजन कुठे बोलवेल तिथे मी येतो', अशा पद्धतीची भाषा करणं त्यांना शोभत नाही. अशी भाषा गावगुंड वापरतात", असं म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. महाजन म्हणाले, "एकटा भेट मग तुला सांगतो, उलटं टांगणं म्हणजे काय असतं ते दाखवतो ही नारायण राणेंची धमकी आहे. ते आणि त्यांचे कार्यकर्ते मला मारण्याची धमकी देत आहेत. माझं त्यांना एकच सांगणं आहे, मी इथे उभा आहे. मला मारायचे असेल तर मी पुणे किंवा कणकवलीत यायला तयार आहे. माझी कुठेही यायची तयारी आहे. मी कधी नारायण राणे यांना आव्हान दिलेलं नाही. तुम्ही या तुम्हाला बघतो, उलटा टांगतो वगैरे बोललो नाही. कारण मला माहिती आहे ते माजी मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांची पत्रकार परिषद एखाद्या वरिष्ठ भाजपा नेत्याने पाहिली तर त्यांना काय वाटेल?"

17:02 (IST) 10 Jun 2025

वटपौर्णिमेनिमित्त कुडाळमध्ये पुरुषांनी पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पुरुष मंडळींनी गेली सोळा वर्षे या परंपरेला एक नवा आयाम दिला आहे. पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे. ...अधिक वाचा
16:48 (IST) 10 Jun 2025

संत साहित्याचे अभ्यासक वामन देशपांडे यांचे डोंबिवलीत निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रसारक वामन अच्युत देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले, ते ८१ वर्षाचे होते. ...वाचा सविस्तर
16:28 (IST) 10 Jun 2025

अमृत स्नानासाठी धरणातून गोदावरीत पाणी सोडण्यास प्रतिबंध, याचिकाकर्त्यांकडून नदी पुनर्जिवित करण्याची मागणी

धरणातून पाणी सोडून गोदावरीचे प्रदूषण कमी करण्याऐवजी गोदावरीला पुनर्जिवित, स्वयंप्रवाहीत करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी याचिका दाखल करणारे राजेश पंडित यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 10 Jun 2025

नागपुरातील हुक्का पार्लरवर मध्यरात्री छापा… उच्चभ्रू कुटुंबातील मुलींनाही…

पोलिसांच्या माहितीनुसार, हा छापा पहाटे तीन वाजता टाकण्यात आला, खरे तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की हे पार्लर रात्रभर बेकायदेशीरपणे चालवले जात आहे ...वाचा सविस्तर
16:18 (IST) 10 Jun 2025

प्रवाशांना अर्ध्या रस्‍त्‍यातच सोडून एसटी परतली माघारी; एसटीचा रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या जीवाशी खेळ

महिला प्रवाशांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्यांनी अरेरावी केली. ‘आम्हाला वरुन आदेश आहेत. गाडी मांढळपर्यंतच न्या’ असे चालक आणि वाहक बोलू लागले. ...वाचा सविस्तर
16:12 (IST) 10 Jun 2025

मोबाइलवर खेळायला विरोध… गोरेगाव मध्ये १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

आई - वडिलांनी मोबाइलमध्ये गेम खेळण्यास विरोध केल्याने १४ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली. ...वाचा सविस्तर
16:06 (IST) 10 Jun 2025

"कोणाचाही बाप काढणं…", मुख्यमंत्री फडणवीसांची नितेश राणेंना समज; म्हणाले, "मी त्यांना सांगितलंय…"

Devendra Fadnavis on Nitesh Rane : धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी 'राज्यात भाजपाचे सरकार असल्याचे लक्षात ठेवावे', असा इशारा सर्वपक्षीयांना दिला होता. ...अधिक वाचा
16:01 (IST) 10 Jun 2025

सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे मत

दुदैवाने घरणेशाहीची राजकीय कीड लागलेला कोणता जिल्हा असेल तर तो आमचा सांगली जिल्हा असेल, असे मत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले. ...सविस्तर वाचा
15:43 (IST) 10 Jun 2025

हा चित्रपट समाजात मोठा बदल घडवू शकतो, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’बद्दल सुधा मूर्ती नेमके काय म्हणाल्या ?

चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगनंतर समाजसेविका सुधा मूर्ती यांनी हा चित्रपट समाजातील नागरिकांवर प्रभाव पाडून समाजात मोठा बदल घडवू शकतो, असे मत व्यक्त केले. ...सविस्तर बातमी
15:37 (IST) 10 Jun 2025

मुंब्रा रेल्वे अपघाताच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी का होत आहे?

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे ...अधिक वाचा
15:26 (IST) 10 Jun 2025

भांडुपमध्ये पाच दुचाकी जाळल्या, अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू

भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ...वाचा सविस्तर
15:18 (IST) 10 Jun 2025

पॉलिटेक्निकसाठी ९६ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रामाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला २० मेपासून सुरुवात सुरुवात केली असून नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...सविस्तर वाचा
14:45 (IST) 10 Jun 2025

"आमचा स्ट्राइक रेट जास्त", दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर तटकरेंचं सूचक वक्तव्य

सुनील तटकरे म्हणाले, "निवडणुकीत आमचा स्ट्राइक रेट जास्त होता. त्यामुळे एकत्र येण्याबाबत ज्याच्या त्याचा विचार वेगळा असू शकतो. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही".

13:56 (IST) 10 Jun 2025

मुंबईत स्वच्छता करणारे कामगार एल्गाराच्या तयारीत…

महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात काम करणारे मोटरलोडर कामगार आणि परिवहन खात्यातील कामगारांचे कायमस्वरूपी काम काढून ते कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ...सविस्तर वाचा
13:48 (IST) 10 Jun 2025

मनसेच्या मोर्चामध्ये प्रवासी महिलेची व्यथा

महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात केवळ १३ आसने आहेत. मात्र,यातून दररोज ६० ते ७० महिला प्रवासी प्रवास करतात. दररोज जागेवरून महिलांची भांडणे होतात. याचा त्रास इतर प्रवाशांना होत असतो, अशी तक्रार एका महिला प्रवाशांनी केली. ...वाचा सविस्तर
13:39 (IST) 10 Jun 2025

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक, मशाल मोर्चा काढणार

पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी मोदींच्या ११ वर्षांच्या काळाचे वर्णन ‘बोलायचा भात, बोलाची कढी’ असे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्यावतीने मोदींच्या कामाचा लेखाजोखा मांडला पाहिजे. ...सविस्तर बातमी
13:32 (IST) 10 Jun 2025

Supriya sule : "हगवणे कुटुंब सुसंस्कृत, काँग्रेसच्या विचारांचं, पण…", राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya sule on Hagawane Family : सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, "माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात काम केलं पाहिजे. मी देखील लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे". ...अधिक वाचा
13:31 (IST) 10 Jun 2025

मुंबई बॉम्ब ब्लास्ट करेन, पुणे पोलिसांना दूरध्वनीनंतर यंत्रणा सतर्क

पुण्यातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने मालकाला गोळ्या घालण्याची व मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी दिल्यांनतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. ...वाचा सविस्तर
13:19 (IST) 10 Jun 2025

ट्रान्स हार्बर मार्गाची प्रवासी क्षमता आवाक्याबाहेर ?

पूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर बिघाड झाल्यास त्याचा परिणाम इतका होत नव्हता. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांचा भार वाढण्यासोबतच येथील बिघाडाच्या समस्यांमध्ये देखील वाढ झाली आहे ...अधिक वाचा
13:17 (IST) 10 Jun 2025

पत्राद्वारे अपघाताची शक्यता वर्तवली तरी दुर्लक्ष का?

ज्या वळणावर हा अपघात घडला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाला दिली होती. ...वाचा सविस्तर
12:53 (IST) 10 Jun 2025

निर्गुण-निराकार हे हिंदू धर्माचे स्वरूप भाजपला मान्य आहे का?, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आम्ही म्हणतो. निर्गुण निराकार हे हिंदू धर्माचे स्वरुप त्यांना मान्य का, असा सवालही त्यांनी केला. ...सविस्तर वाचा
12:38 (IST) 10 Jun 2025

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पक्षाच्या मेळाव्याआधी रोहित पवार म्हणाले...

आमदार रोहित पवार म्हणाले, "दोन पक्ष एकत्र येणार असल्याची केवळ चर्चा ऐकायला मिळतेय. हे केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे. त्यावर आपण सर्वांनी बोलून वेळ का घालवावा? बैठकांसाठी, शेतकरी प्रश्नांवर चर्चेसाठी शरद पवार अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येतात, मात्र त्याचा पक्षांशी संबंध नसतो. विलिनीकरणाबाबत शरद पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे कधीच काही बोलल्या नाहीत. आम्ही देखील या मोठ्या नेत्यांना भेटल्यावर केवळ शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगारांच्या प्रश्नांवर चर्चा करतो. शरद पवार आम्हाला विचारतात, शेतकऱ्यांसाठी काय करणार आहात? युवकांसाठी काय करणार आहात? बाकी विलिनीकरणाच्या चर्चा केवळ माध्यमांवर रंगतायत.