Mumbai News : महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही. उलट महायुतीत बिघाडी आहे त्यामुळेच त्यांना उमेदवार सापडत नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी कंगनावर गोमांस खाण्याचा जो आरोप केला होता त्यावर कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा अशी आठवणही करुन दिली आहे. महाविकास आघाडीत त्यामुळे सगळं काही ऑल इज वेल आहे का? हा प्रश्नही चर्चेत आहे. अशात आता संजय राऊत यांनी आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकू, आघाडी म्हटलं की काही गोष्टी होत असतात मात्र बिघाडी नाही असं म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. आज दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra News Live Updates 08 April 2024|लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस, यासह महत्त्वाच्या बातम्या

19:41 (IST) 8 Apr 2024
लोकहितासाठी अखेरपर्यंत समाजकारणच – उदयनराजे; कराडमध्ये महायुतीचा एकजुटीने भव्य मेळावा

लोकहितासाठी अखेरपर्यंत समाजकारणच करणार असल्याचा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

सविस्तर वाचा…

19:30 (IST) 8 Apr 2024
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नितीन गडकरींच्या भेटीला

यंदा तिसऱ्यांदा निवडणूकीदरम्यान ते शहरातील विविध भागात फिरून मतदारांना आशीर्वाद मागत आहेत.

सविस्तर वाचा…

19:22 (IST) 8 Apr 2024
गडचिरोलीत महाविकास आघाडीत अंतर्गत कलह; काँग्रेसच्या एककल्ली कारभारावर निष्ठावंतांसह मित्र पक्षांची नाराजी

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसवर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला व पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

सविस्तर वाचा…

19:06 (IST) 8 Apr 2024
‘ठाकूर, जय-वीरू, बसंती कुठयं? गेले सगळे भाजपमध्ये’, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

लोकसभेच्या या चढाओढीमध्ये समाज माध्यम मागे नाही. समाज माध्यमांवर भाजप प्रवेशाच्या अनेक मिम्सचा पाऊस सुरू आहे.

सविस्तर वाचा…

18:55 (IST) 8 Apr 2024
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ कुणावर? ईश्वरचिठ्ठीवर लागला चिन्हाचा निकाल…

सिलिंडरसाठी इच्छूक असलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या चिन्हाचा निकाल ईश्वर चिठ्ठीद्वारे लागला.

सविस्तर वाचा…

18:45 (IST) 8 Apr 2024
पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; शरीरावर मारहाणीचे व्रण

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

18:35 (IST) 8 Apr 2024
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी

सोलापूर : मोहोळ तालुक्यात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बलाढ्य ताकदीला टक्कर देणारे आणि यापूर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर यांनी यंदा पक्षातून बाहेर पडत सोलापूर लोकसभेसाठी यशवंत सेना संघटनेची उमेदवारी घेतली आहे. मात्र त्यांचा हा निर्णय भाजपकडून बेदखल झाला असून त्यावर चर्चा टाळली जात आहे.

सविस्तर वाचा…

18:34 (IST) 8 Apr 2024
नाशिक: भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोन जखमी

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा संघटक केदा आहेर यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा…

18:00 (IST) 8 Apr 2024
मुख्यमंत्र्यांसमोर रामटेकवरून भाजपविरोधी खदखद

तुमाने पुढे म्हणाले, त्यांना (भाजपला ) आपली ताकद दाखवा. आपला पक्ष जिवंत आहे, हे दाखवा, असा टोलाही तुमाने यांनी लगावला.

सविस्तर वाचा…

17:43 (IST) 8 Apr 2024
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना

सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी उतरविले.

सविस्तर वाचा…

17:35 (IST) 8 Apr 2024
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित

तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील.

सविस्तर वाचा…

17:27 (IST) 8 Apr 2024
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार

नागपूर : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या ११ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा घेत आहेत. ही सभा उत्तर नागपूरमधील बेझनबाग मैदानावर दुपारी ३ वाजता होणार आहे.

वाचा सविस्तर…

17:20 (IST) 8 Apr 2024
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

अलिकडेच हरयाणा येथील रोहतकमध्ये खेलो इंडिया स्पर्धेच्या अंतर्गत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

17:08 (IST) 8 Apr 2024
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार : म्हणाले, ‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद…’

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्या वयावरून टिप्पणी केली जाते. याबाबत शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांना टोला लगावला आहे..

सविस्तर वाचा…

17:05 (IST) 8 Apr 2024
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल

अलिबाग : अलिबागचे नाव बदलण्याची मागणी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे.

सविस्तर वाचा…

15:57 (IST) 8 Apr 2024
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या सेवा निवासस्थानात राहणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे देय दावे उपप्रमुख लेखापालांकडून मागील वर्षभरापासून देण्यास टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हेकेखोर आणि मनमानी कारभाराविरोधात म्युनिसिपल मजदुर युनियनतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

15:49 (IST) 8 Apr 2024
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

भाईंदर : – मिरारोड येथे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट घडला. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सविस्तर वाचा…

15:38 (IST) 8 Apr 2024
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आता ‘ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे….उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली…’ असे रॅप गाणे तयार केले असून त्यामाध्यमातून ठाकरे गटाने शिंदे गटावर एकप्रकारे अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ब्रँड ठाकरे असल्याचा उल्लेख केला आहे.

सविस्तर वाचा..

14:57 (IST) 8 Apr 2024
अजित पवार स्पष्टच म्हणाले, ‘मावळचा उमेदवार मी पाठविलेला…’

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय मेळावा सोमवारी (८ एप्रिल) काळेवाडी येथे पार पडला.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 8 Apr 2024
आली रे आली, आता… गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा; दीड हजारावर गुन्हेगारांवर…

यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी सक्रिय गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

14:47 (IST) 8 Apr 2024
भाजप नेते विजयराज शिंदेंचे बंड ठरले औट घटकेचे! म्हणाले, “अबकी बार…”साठी माघार

बुलढाणा: दोन दिवसापासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आज आपली तलवार म्यान केली! भाजपच्या बहुचर्चित ‘अब की बार ,चार सौ पार’ या उद्दिष्टासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले.

वाचा सविस्तर…

14:27 (IST) 8 Apr 2024
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळेच्या आरक्षित भूखंडावर कल्याण पूर्वेत आडिवली ढोकळी गावात स्थानिकांंनी चार माळ्याची तीस सदनिका असलेली बेकायदा इमारत उभारली होती. याप्रकरणी तक्रारी प्राप्त होताच, आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने मागील पाच दिवसांच्या काळात आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारत शुक्रवारी भुईसपाट केली.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 8 Apr 2024
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

वर्धा : भाजपच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा म्हणजे तुरूपचा एक्का समजली जाते. मतदारसंघात त्यांचे आगमन झाले की पावले, अशी मानसिकता भाजप उमेदवार ठेवून असतो. वर्धा मतदारसंघातही आता तसेच वातावरण आहे. वरिष्ठ पातळीवरून निरोप आला की पंतप्रधान मोदी हे वर्ध्यात सभा घेऊ शकतात. तयारी ठेवा. पण अधिकृत दौरा आलेला नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

12:59 (IST) 8 Apr 2024
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश

जळगाव : पोलीस दल लोकसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त असताना दुसरीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. जळगाव आणि जामनेर येथील दोघांना सायबर गुन्हेगारांनी सुमारे १९ लाख रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 8 Apr 2024
उमेदवारांचं चांगभलं! प्रचार साहित्याच्या दरात अखेर कपात; लोकसभा निवडणुकीत…

वर्धा : विशिष्ट मर्यादेतच खर्च करण्याचे बंधन निवडणूक आयोग घालून देतो. त्यातच खर्च भागविण्याची ‘कसरत’ उमेदवार कशी करतो, हे मात्र लपून नाही. एकीकडे अशी मर्यादा असतानाच प्रत्येक प्रचार साहित्याचे तसेच अन्य बाबींचे दरही ठरवून देण्यात येतात.

वाचा सविस्तर…

12:45 (IST) 8 Apr 2024
पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य बघायला मिळालं. आरपीआय आठवले गटाच्या शहराध्यक्षाला व्यासपीठावर न बोलवल्याने आणि त्यांचा नामोल्लेख न केल्याने आरपीआय आठवले गटाने काढता पाय घेत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 8 Apr 2024
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 8 Apr 2024
बुलढाण्यात ठाकरे की शिंदे गट बाजी मारणार ?

बुलढाणा: बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत नव्हे रणसंग्राम रंगला आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 8 Apr 2024
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

कल्याण – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गद्दारी करून ज्यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले. अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही. आमच्या सर्व निष्ठा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आहेत, असे सांगत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी पूर्वाश्रमीच्या मनसेच्या पदाधिकारी आता महाविकास आघाडीतून कल्याण लोकसभेत निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांना मनसे कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे माध्यमांना स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 8 Apr 2024
जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणास सुरुवात

मुंबई : दक्षिण मुंबईतील १४ हजार जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून हे सर्वेक्षण करण्यात येत असून महिन्याभरात सर्वेक्षण पूर्ण करत मेच्या तिसऱ्या आठवड्यात अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जण्याची शक्यता आहे.

मुंबईतील १४ हजाराहून अधिक उपकरप्राप्त इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर आहे. या सर्व इमारती धोकादायक असल्याने या इमारतींची दुरुस्ती मंडळाकडून नियमितपणे केली जाते. ज्या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत त्यांना अतिधोकादायक इमारती घोषित करून त्या रिकाम्या केल्या जातात. अशा इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सर्वात आधी मंडळाकडुन इमारतींचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यातून अतिधोकादायक इमारतींचा शोध घेतला जातो.

11:45 (IST) 8 Apr 2024
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

लोणावळा: बंगल्याच्या प्रारंगणात रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीर साउंड सिस्टम लावून मुलींकडून अश्लील नृत्य करून घेणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या नृत्यांगनावर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी नऊ जनांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वाचा सविस्तर…

11:43 (IST) 8 Apr 2024
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या युवकांना भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना केसनंद-थेऊर रस्त्यावर घडली. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

11:43 (IST) 8 Apr 2024
लोकसभा निवडणूक : उमेदवारांचा समाज माध्यमावर आक्रमक प्रचार

चंद्रपूर : मोठ मोठे होर्डींग, पोस्टर, बॅनर, प्रचार पत्रक तथा घर चलो अभियानाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत सर्व पक्षीय प्रचारक पोहचत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच समाज माध्यमाचा अतिशय आक्रमकपणे प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येका पर्यंत पक्षीय उमेदवाराला पोहचणे सहज शक्य झाले आहे.

वाचा सविस्तर…

11:41 (IST) 8 Apr 2024
बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका

नागपूर : राज्यात गेल्या अडीच वर्षात ‘लेना’ बँक होती आता महायुतीचे सरकार आल्यानंतर ‘देना’ बँक झाली आहे. पूर्वी शिवसेनेत मालक होते, बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे. हे ( उद्धव ठाकरे) मात्र घरगडी समजत होते. आमच्या शिवसेनेत कोणी मालक नाही. जो काम करणार तो आपल्या पक्षात राजा असणार, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

वाचा सविस्तर…

11:40 (IST) 8 Apr 2024
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…

वर्धा : भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहल्या जाते. या १५ दिवसात हा उत्सव साजरा करण्यात राजकीय पक्ष कसलीच कसर ठेवत नाही.

वाचा सविस्तर…

"संजय राऊत यांनी नाटके बंद करावी," नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, "त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…" ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )<br />

महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही. उलट महायुतीत बिघाडी आहे त्यामुळेच त्यांना उमेदवार सापडत नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी कंगनावर गोमांस खाण्याचा जो आरोप केला होता त्यावर कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे.