Lok Sabha Election 2024 Updates : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ४ एप्रिल रोजी संपल्यानंतर आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी जागावाटपाची चर्चा संपून जनतेच्या प्रश्नावर राजकीय पक्ष बोलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ९ एप्रिल रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यादिवशी राज ठाकरे मनसेची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाने दोन खासदारांचा पत्ता कापल्यानंतर आता नाशिक, मुंबई उत्तर पश्चिम आणि कल्याण लोकसभेसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Maharashtra News Updates 05 April 2024

19:06 (IST) 5 Apr 2024
सोलापूरची जागा लढविण्यावरून एमआयएममध्ये मतभेद

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपच्या तुल्यबळ लढतीत वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता एमआयएम पक्षाचाही उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. मात्र उमेदवार उभा करण्यावरून एमआयएम पक्षात मतभेद निर्माण झाले असले तरी या पक्षाचा निवडणूक लढण्याचा निर्णय पक्का असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा सोलापूर लोकसभा जागेसाठी एमआयएम पक्षाकडे चार संभाव्य उमेदवार विचाराधीन असून त्याबाबतचा अहवाल हैदराबाद येथे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला आहे. संभाव्य चार उमेदवार कोण, हे गूपित असल्याचे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी सांगितले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्ळात अडकलेले तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ येथील माजी आमदार रमेश कदम यांचेही नाव एमआयएमकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यांच्याशी लवकरच चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही शाब्दी यांनी दिली.

तथापि, एमआयएम पक्षाकडून सोलापुरात उमेदवार उभा करण्यावरून पक्षात मतभेद निर्माण झाले असून पक्षाचे सरचिटणीस कोमारो सय्यद यांनी, एमआयएम पक्षाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू भाजप असताना मतविभागणीचा फायदा पुन्हा भाजपला मिळू नये. त्यासाठी भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यासाठी एमआयएमने उमेदवार उभा करू नये, अशी आग्रही मागणी केली आहे.

18:48 (IST) 5 Apr 2024
वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश

पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोला येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्षप्रवेशाआधी वसंत मोरे यांनी एक्सवर याची माहिती दिली होती.

18:44 (IST) 5 Apr 2024
आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी

पुणे : राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये एका खेकड्याला लटकवून त्याचा गैरवापर केल्याचा निषेध दर्शवत ‘पेटा इंडिया’ने (पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठविले आहे.

सविस्तर वाचा…

18:33 (IST) 5 Apr 2024
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

कोल्हापूर : संत बाळूमामा भंडारा उत्सवाअंतर्गत शुक्रवारी रथोत्सव मिरवणुक हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष, भंडाराच्या मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या निनादात दीड किलोमीटर अंतरावर रथोत्सव चार तास सुरु होता.

वाचा सविस्तर…

18:32 (IST) 5 Apr 2024
कोल्हापुरात खून; संशयित ८ आरोपी २४ तासात जेरबंद

कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरात काल सायंकाळी दोन गटातील वर्चस्वातून खून केल्याप्रकरणी ८ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हेने शाखेच्या पथकाने तासात जेरबंद केले आहे.

वाचा सविस्तर…

18:32 (IST) 5 Apr 2024
सोलापूरचा तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे

सोलापूर : सोलापुरात उन्हाळा अधिकच तीव्र होत असून यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान शुक्रवारी ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये चार अंशांनी वाढ झाली आहे.

चालू एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. आता पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. सकाळपासूनच उन्हाची तलखी जाणवत आहे. वाढत्या उष्म्यामुळे दुपारी रस्त्यावरील वर्दळ रोडावली असून डोक्यावर परिधान केलेल्या टोप्याही गरम होत आहेत.

गेल्या वर्षी ५ एप्रिल २०२३ रोजी सोलापूरचे ४०.३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले होते. परंतु आज हे तापमान ३.१ अंशांनी म्हणजेच ४३.१ पर्यंत वाढले आहे. ही माहिती हवामान विभागाने दिली आहे.

18:31 (IST) 5 Apr 2024
सोलापुरात काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांची ‘मॉर्निग वॉक’मधून मतपेरणी

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांवर स्थानिक विकासाच्या मुद्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालविले असतानाच या दोन्ही उमेदवारांनी भल्या सकाळी ‘मॉर्निग वॉक’च्या माध्यमातून मतदारांना थेट भेटून आणि संवाद साधून मतांची पेरणी केली.

सोलापुरात सकाळचा पायी चालत फेरफटका मारण्यासाठी सिध्देश्वर तलाव परिसरासह हुतात्मा बाग, होम मैदान, नेहरू नगर शासकीय मैदान, कर्णिक नगर शासकीय मैदान, जुळे सोलापूर आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. यापैकी सिध्देश्वर तलाव परिसरात काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी फेरफटका मारून पादचारी नागरिकांशी मुक्त संवाद साधला.

18:11 (IST) 5 Apr 2024
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

18:08 (IST) 5 Apr 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही : नीलम गोऱ्हे

पुणे : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या राहिल्या आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना तिकीट नाकारून, पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

18:01 (IST) 5 Apr 2024
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात एका महिलेने न्यायालयात एका विनयभंगाच्या आरोपीविरोधात साक्ष देऊ नये म्हणून तिला घाबरवण्यासाठी आरोपीने महिलेचा चक्क वेगवेगळ्या पद्धतीने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आहे.

सविस्तर वाचा…

17:54 (IST) 5 Apr 2024
पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला अजित पवार येणार?

पुणे : अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. या पराभवाचे खापर तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी लाटेवर फोडले होते. अजित पवारांसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची होती. मात्र त्यात बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला. तेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार आहेत.

वाचा सविस्तर…

17:53 (IST) 5 Apr 2024
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप

भाईंदर : गेल्या सव्वा महिन्यांपासून फरार असणारे मिरा भाईंदर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मोहन पाटील यांना शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर अटक करण्यात आली आहे. मोहन पाटील यांना ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

वाचा सविस्तर…

17:52 (IST) 5 Apr 2024
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

वसई: वसई पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्यातील संरक्षित वनक्षेत्र व इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये मागील काही वर्षापासून अतिक्रमण, बेकायदेशीरपणे उभे राहत असलेले प्रदूषणकारी कारखाने याचा मोठा परिणाम या वनक्षेत्रावर होऊ लागला आहे.  या वाढत्या अतिक्रमणामुळे संरक्षित वन धोक्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

17:51 (IST) 5 Apr 2024
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

नाशिक : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुटख्याची होणारी वाहतूक आणि विक्री करण्यासाठी होणारे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले. दोन्ही घटनांमध्ये एकूण २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा सविस्तर…

17:39 (IST) 5 Apr 2024
निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर : भाजपाचे स्थानिक उमेदवार लक्ष्मीदर्शन करून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहे.तेव्हा निवडणुकीत येणारी लक्ष्मी स्वीकारा आणि मतदान करा असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

सविस्तर वाचा…

17:37 (IST) 5 Apr 2024
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल

दहिसर येथे १८ वर्षांच्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 5 Apr 2024
वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर सातत्याने माझा अपमान करित असले तरी संविधान वाचविण्यासाठी व मतविभाजन टाळण्यासाठी दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र या प्रस्तावावर ॲड.आंबेडकर यांच्याकडून अजूनही उत्तर आलेले नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे दिली.

सविस्तर वाचा….

16:56 (IST) 5 Apr 2024
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…

पुणे : जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. एका नव्या संशोधनानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले. याचवेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढल्याचेही समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 5 Apr 2024
यवतमाळात वंचितला धक्का! उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने निवडणुकीपासून राहणार ‘वंचित’

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी गाजावाजा करत जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलविला. मात्र, नामांकनाच्या अखेरच्या दिवशी वंचितकडून ज्या उमेदवाराने अर्ज दाखल केला, त्यात त्रुटी निघाल्याने तो बाद झाला. त्यामुळे ‘वंचित’ निवडणुकीपासून वंचित राहणार आहे.

सविस्तर वाचा…

16:19 (IST) 5 Apr 2024
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…

नागपूर : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि नागपूर विद्यापीठातील माजी प्राध्यापिका शोमा सेन यांचा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अटींसह जामीन मंजूर केला आहे. नक्षलवादांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली होती. न्या.अनिरुद्ध बोस आणि न्या.ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 5 Apr 2024
मुंबई: अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक

अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

सविस्तर वाचा…

15:58 (IST) 5 Apr 2024
सरकारी बाबूंनाही मोफत धान्याचा मोह! रायगडात १ हजार ६५६ सरकारी बाबूंनी घेतला मोफत धान्य योजनेचा लाभ, चौकशी समितीचे गठन

रायगड जिल्ह्यात शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचल करणारे १ हजार ६५६ नोकरदार सापडले आहेत.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 5 Apr 2024
नवनीत राणा पती रवी राणांपेक्षा श्रीमंत, पाच वर्षांत ४१ टक्‍क्‍यांनी वाढली संपत्‍ती….

अमरावती : लोकसभा निवडणुकीतील अमरावतीच्‍या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथून भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा रिंगणात आहेत, काँग्रेसने आमदार बळवंत वानखडे यांना तर प्रहार जनशक्‍ती पक्षाने दिनेश बुब यांना नवनीत राणांच्‍या विरोधात उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांनी नुकताच भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे.

सविस्तर वाचा…

15:36 (IST) 5 Apr 2024
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच सोन्याने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडले असून, चांदीच्या दरानेही विक्रमी पातळी गाठली आहे.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 5 Apr 2024
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे विभागात सरलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी ५७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येत १८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात विभागात तिकीट तपासणी मोहिमेअंतर्गत फुकट्या प्रवाशांकडून २७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 5 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी, कल्याण मधील महिलेचा पर्यावरणपूरक गुढीचा व्यवसाय

एक पर्यावरणपूरक देखणी गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या घरी चैत्र पाडव्याच्या दिवशी उभारण्यासाठी पाठविली आहे.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 5 Apr 2024
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कोणतीही चर्चा न करता घेतला. यंदा निवडणूक वर्ष असल्याने या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य घटकांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, अशा सूचक शब्दांत इशारा देऊन निर्णय किमान एक वर्ष स्थगित करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.

सविस्तर वाचा…

15:09 (IST) 5 Apr 2024
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:53 (IST) 5 Apr 2024
काँग्रेसने अकोल्यात RSS च्या माणसाला तिकीट दिलं, वंचितची टीका

काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता वंचितकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करण्यात आली आहे. डॉ. अभय पाटील आणि त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचा चेहरा उघडा पडला आहे, अशी टीका वंचितने केली आहे.

14:34 (IST) 5 Apr 2024
स्कायवॉकचा पत्रा डोक्यावर पडून तरुणी जखमी, मिरा रोड मधील घटना

स्काय वॉकला लावण्यात आलेला पत्रा कोसळून खालून जाणारी एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:34 (IST) 5 Apr 2024
नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी, कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

14:33 (IST) 5 Apr 2024
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

काही विषयांवर विद्युतवेगाने निर्णय घेणारे राज्य सरकार देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेताना मात्र हात आखडते घेते. हे स्वीकारार्ह नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.

सविस्तर वाचा…

14:03 (IST) 5 Apr 2024
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत, असेच हे सर्व पाहून वाटत असल्याचे सांगून त्यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 5 Apr 2024
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

मुंबई : व्हीआयपीस् ग्रुप – ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्याशी संबंधित २४ कोटी ४१ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालयानाय (ईडी), मुंबईने टाच आणली आहे. त्यात ५८ बँक खात्यांमधील २१ कोटी २७ लाख रुपये व तीन कोटी १४ लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 5 Apr 2024
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

पुणे : आयआयटी-मुंबईचे ३६ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही काहीसे तसेच चित्र आहे. २०२२ मध्ये झालेल्या सर्वाधिक कॅम्पस प्लेसमेंटनंतर गेल्या दोन वर्षांत प्लेसमेंटला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ३० ते ४० टक्के घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 5 Apr 2024
उन्हाळ्यातील संभाव्य रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

मुंबई : एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना असणाऱ्या सुट्ट्या आणि सुट्टीनिमित्त बरेच रक्तदाते बाहेरगावी जातात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या नियोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पुढील दोन महिन्यांतील संभाव्य रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना केल्या आहेत.

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा असता. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यांमध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवा वर्गाची संख्या मोठी आहे. एकंदर बहुतांश रक्तदाते बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण घटते. दरवर्षी एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यातच यंदा असलेल्या निवडणुकांमुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून रक्त संकलनाचे नियोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभरात ८४७ रक्तदान शिबिरांमार्फत ७८ हजार २२१ युनिट रक्त संकलित झाले. राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रक्तदान कमी झाल्यास रक्ताचा संभाव्य तुटवडा होण्याची शक्यता आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, धार्मिक संस्थांना संपर्क साधून स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने केल्या आहेत.

13:27 (IST) 5 Apr 2024
कपिल पाटलांनी हस्तक्षेप करुन खोटे गुन्हे दाखल केले – सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 5 Apr 2024
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

पुणे : विमाननगर भागातील एका माॅलमधून महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास तरुणीचा खून करण्याची धमकी अपहरणकर्त्याने दिल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 5 Apr 2024
“एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अधूनमधून कायमच रंगत असते.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 5 Apr 2024
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य पादचारी, प्रवाशांना या गुन्हेगारीचे सर्वाधिक चटके बसत आहेत.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 5 Apr 2024
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

मुंबई : मुंबईत मानवी जीवनाची किंमत काय आहे, अर्थसंकल्पीय मर्यादा हे नागरी कामांदरम्यान किमान सुरक्षा उपलब्ध करण्यातील अपयशाचे कारण असू शकते का, असा प्रश्न वडाळा येथे पाण्याच्या टाकीत पडून दोन अल्पवयीन भावांच्या झालेल्या मृत्यूची स्वत:हून दखल घेताना गुरुवारी महापालिकेला केला. तसेच, महापालिकेला नोटीसही बजावली.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 5 Apr 2024
“भाजपानं असंच रडत राहावं..”, बाळ्यामामा म्हात्रेंवरील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा’कडून भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळताच बाळ्यामामा म्हात्रे यांच्या गोदामांवर केलेली कारवाई ही पराभवाच्या भीतीतून महाशक्तीने खेळलेला रडीचा डाव आहे. पण भाजपने असंच रडत रहावं, आम्ही मात्र दडपशाहीच्या विरोधात लढत राहू, अशी आक्रमक भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1776141257515094058

12:36 (IST) 5 Apr 2024
बोरिवलीतील उद्यानात गुजराती भाषेतील नामफलक, पोयसर जिमखाना संस्थेला महानगरपालिकेची नोटीस

बोरिवलीतील मुंबई पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात उद्यानाच्या दर्शनी भागात गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:27 (IST) 5 Apr 2024
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल

स्वदेशी बनावटीच्या दहा मोनोगाड्यापैकी पहिल्या मोनोरेल गाडीचे तीन डबे मुंबईत दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 5 Apr 2024
गडचिरोली : निवडणुकीतून आदिवासी, ओबीसींचे प्रश्नच बाद ? समाजात नाराजीचा सूर

गडचिरोली : २००८ नंतर झालेल्या पुनर्रचनेनंतर देशात अनुसूचित जमातीसाठी ४७ लोकसभा क्षेत्र आरक्षित करण्यात आले. त्यात गडचिरोली-चिमूरचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान येथील आदिवासींचे आणि ओबीसींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेऊन राजकीय पक्षांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडणे अपेक्षित होते.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 5 Apr 2024
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा..

11:45 (IST) 5 Apr 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती

काही जाणत्या प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. परंतु, खासदारांचा रोष नको म्हणून रेल्वे अधिकारी त्याकडे काणाडोळा करत होते.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 5 Apr 2024
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसमधील इच्छुकांनी बंडाची तयारी सुरू केल्याचे समजते.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 5 Apr 2024
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

चंद्रपूर: उन्हाळ्याला सुरूवात होताच जिल्ह्याची तहान भागविणारे जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जलसंकट कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यामध्ये ८ धरणामध्ये केवळ २६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरण ५७.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून एक दिवसाआड शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा….

11:33 (IST) 5 Apr 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे.

सविस्तर वाचा…

सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाटय़, अनेक मतदारसंघांत बंडखोरी