मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत अनाजीपंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला असे म्हटले. फडणवीसांनी पंढरपुरात राज ठाकरेंचे आभार मानले, पण उद्धव ठाकरेंना ‘रुदाली’ असे संबोधले. फडणवीसांनी मुंबईच्या विकासाचे श्रेय मोदींना दिले आणि मराठी माणसांसाठी केलेल्या कामांची यादी दिली.